प्रत्येक देशाची आपले एक चलन असते. मात्र असे कधी झाले आहे का, की एखाद्याने देशाने अन्य देशाचे चलन छापले असेल. असे होणे शक्यच नाही. परंतु एक काळ असा होता जेव्हा जापानने भारतीय चलन छापले होते. कारण तेव्हा परिस्थिती अशी निर्माण झाली होती की, जापानला हे पाऊल उचलावे लागले होते. खरंतर गोष्ट अशी की, या नोटा भारत नव्हे तर आजच्या म्यान्यमार आणि तेव्हाच्या बर्मासाठी छापण्यात आल्या होत्या. याच मागील खरं कारण काय होते हे आपण जाणून घेऊयात.(Japanese Indian Rupee Notes)
याचा संबंध हा दुसऱ्या महायुद्धाशी आहे. कारण भारताप्रमाणेच बर्मा सुद्धा ब्रिटेची एक कॉलोनी होती. युद्धावेळी जापान आणि ब्रिटेन २ वेगवेगळे गट होते. 1939 मध्ये जपानमध्ये महायुद्ध सुरू झाले आणि 1942 मध्ये जपानने ब्रिटीश सैन्याला बर्मामध्ये मागे टाकत आपल्या ताब्यात घेतले. १९४४ पर्यंत बर्मा त्यांच्याच ताब्यात होता. याच दरम्यान तेथे व्यापाराच्या हालचाली किंवा सामान खरेदी विक्रीसाठी चलनाची आवश्यकता होती. बर्मामध्ये खुप वर्षांपर्यंत ब्रिटिशांचे शासन असल्याने तेथे सुद्धा भारतीय रुपयांत ट्रेड केले जायचे. जेव्हा जापानने तेथे ताबा मिळवला तेव्हा एक अस्थाई सराकर तयार केले. तेव्हा त्यांनी भारतीय चलानाचा वापर करणे सुरु ठेवले.
जापानने छापल्या भारतीय नोटा
जापानने बर्मामध्ये चलन सुरळीत रहावे म्हणून १९४२ मध्ये १,५ १० पैसे, १,५ आणि १० रुपयाच्या नोटा छापून बर्माला दिल्या, १९४४ मध्ये १०० रुपयांच्या नोटा सुद्धा छापल्या. दरम्यान, १९४५ मध्ये जापानने सरेंडर केले. या चलनाच्या नोटेवर B असे लिहिलेले होते. याचा अर्थ बर्मा असे होते. याच दरम्या, जापानच्या प्रत्येक चलनाच्या नोटोवर एक कोड लिहिलेला असायचा. बर्माच्या रुपयांचा कोड B असा होता.
कशी होती नोट
प्रत्येक नोटेच्या खाली ‘Government of Great Imperial Japan’ असे लिहिलेले असायचे. या व्यतिरिक्त जापानच्या अर्थ मंत्रालयाकडून एक प्रतीक सुद्धा छापले होते. या नोटांवर बुद्ध धर्माची झलक दिसते. यावर मंदिर किंवा बुद्ध मठांचे फोटो सुद्धा छापले होते.(Japanese Indian Rupee Notes)
हे देखील वाचा- ब्रिक्स करेंसी म्हणजे काय?
सरेंडर केल्यानंतर मुल्य राहिले नाही
१९४५ मध्ये जापानवर युएसने परमाणून हल्ला केला आणि जापानला आत्मसमर्पण करावे लागले. अशा प्रकारे दुसऱ्या महायुद्धाचा अंत झाला. युद्ध संपले आणि जापानने सरेंडर केल्यानंतर बर्मामध्ये त्यांच्या द्वारे जारी करण्यात आलेल्या चलानाचे काही मुल्यच राहिले नाही. परंतु असे मानले जाते की, आज हे चलन फार किंमती आहे.