Home » Android फोन वापरणाऱ्यांनी व्हा सावध! युट्युब सारख्या App मध्ये ‘या’ वायरसचा धोका

Android फोन वापरणाऱ्यांनी व्हा सावध! युट्युब सारख्या App मध्ये ‘या’ वायरसचा धोका

by Team Gajawaja
0 comment
Alert for android users
Share

बाजारात विविध कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध असतात. परंतु अॅन्ड्रॉइड फोनवर मॅलवयेर धोक्याच्या गोष्टी सुद्धा समोर येतात. याच दरम्यान एक प्रकरण अशाच पद्धतीचे समोर आले आहे. खरंतर मेटाने अॅन्ड्रॉइड आणि टॅबलेट युजर्ससाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामध्ये असे सांगितले आहे की, नव्या प्रकारचे अत्यंत धोकादायक मॅलवेयर याचा शोध लागला आहे. जो व्हॉट्सअॅप आणि युट्युब सारख्या प्रसिद्ध अॅपमध्ये लपवला जात आहे. मेटाने तिमाही अॅडवर्सारियर थ्रेट रिपोर्ट २०२२ मध्ये Dracarys मॅलवेयरचा उल्लेख केला आहे. जो प्रसिद्ध अॅपमच्या क्लोन वर्जनमध्ये लपवला जातो. रिपोर्टमध्ये असे ही म्हटले आहे की, हा वायरस फक्त व्हॉट्सअॅप किंवा युट्युबच नव्हे तर सिग्नल, टेलिग्राम आणि काही कस्टम चॅट अॅप्लिकेशनमध्ये ही लपवला जात आहे.(Alert for android users)

लेटेस्ट रिपोर्टनुसार, ड्राकारिस मॅलवेयरचे नाव गेम ऑफ थ्रोन्स बॅटल क्राइच्या ड्रॅगनवरुन ठेवले आहे. जे ATP हँकिंग ग्रुपद्वारे चालवले जाते. असे सांगितले जाते की, हे हँकिंग ग्रुप UK, New Zealand, India आणि Pakistan च्या युजर्सवर अटॅक करतात. हा मॅलवेयर अॅन्ड्रॉइड फोनमध्ये असलेल्या Accessibility फिचरचा वापर केला जातो. जसे की बनावट अॅपला आपोआप परवानगी मिळते.

Alert for android users
Alert for android users

अॅन्ड्रॉइडमध्ये आढळून येणारा हा वायरस युजरची खासगी माहिती चोरु शकतात. त्याचसोबत युजर्सचे कॉल डिटेल्स, फोनमधील क्रमांकाची माहिती, एसएमस, लाइव्ह लोकेशन आणि युजरच्या डिवाइसची माहिती मिळवण्यास सक्षम आहे ऐवढेच नव्हे तर मॅलवेयर फोन मधून गुप्तपणे फोटो क्लिक करणे किंवा मायक्रोफोनच्या वापर करण्यासह युजरच्या माहितीचे अॅप इंस्टॉल करु शकतात.(Alert for android users)

हे देखील वाचा- वर्च्युअल मोबाईल क्रमांक म्हणजे काय? कसा करतो काम जाणून घ्या

कसे ठेवाल स्वत: ला यापासून दूर
या धोक्यापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. असा सल्ला दिला जातो की, कधीच व्हॉट्सअॅप, युट्युब, टेलिग्राम सारख्या अॅपचे अनधिकृत किंवा बनावट अॅप डाऊनलोड करु नये. तसेच मॅलवेयरचा धोका थर्ट पार्टी अॅपच्या वेबसाइटवर ही असतो. तज्ञ असे सांगतात की, अॅन्ड्रॉइड युदर्सने नेहमीच गुगल प्ले स्टोरच्या माध्यमातूनच काही अधिकृत अॅप डाऊनलोड करावेत. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल तर वरील काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा. त्याचसोबत आपल्या मोबाईलवर जर तुम्ही सोशल मीडियाच्या अकाउंट्सचे पासवर्डस सेव्ह केले असतील तर ते वेळोवेळी बदलण्यास विसरु नका.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.