Home » 2024 च्या निवडणूकीची AI कडून केली जाणार भविष्यवाणी …?

2024 च्या निवडणूकीची AI कडून केली जाणार भविष्यवाणी …?

by Team Gajawaja
0 comment
AI impact on 2024 election
Share

२०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीत आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर हा चुकीची माहिती पसरवण्यासाठी केला जाऊ शकतो. एआयची सुविधा उपलब्ध झाल्याने बनावट आणि दिशाभूल केल्या जाणाऱ्या बातम्या या वेगाने पसरण्याचा फार मोठी शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र यावर नियंत्रण कसे मिळवावे हे फार कठीण काम असणार आहे. असे गुगलचे माजी सीईओ एरिक श्मिट यांनी म्हटले आहे. त्यांनी एका कार्यक्रमात स्क्वॉक बॉक्स मध्ये ही भविष्यवाणी केली आहे. ते श्मिट फ्युचर्सचे सह-संस्थापक सुद्धा आहेत.(AI impact on 2024 election)

श्मिट यांनी असे म्हटले की, २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीत फार मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. याचे कार म्हणजे एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पसरवले गेलेले बनावट कंन्टेट आणि यावर सोशल मीडियातील युजर्सला कंट्रोल करण्याचा कोणताही मार्ग नाही. चुकीची माहिती सोशल मीडियात वेगाने व्हायरल होते. मात्र त्यावर आता कंट्रोल कसा मिळवावा या संदर्भात अद्याप कोणताही ठोस पर्याय मिळालेला नाही. सत्य असे आहे की, विश्वास आणि सुरक्षित ग्रुप्स वाढण्याऐवजी ते आणखी कमी होत चालले आहेत.

एआयच्या दीर्घकालीन धोक्यांबद्दल विचारल्यास त्यांनी असे म्हटले की, सर्वजण याच्या दीर्घकालीन प्रभावाबद्दल बोलत आहेत. मात्र चुकीची माहिती किंवा बातमी असा धोका आहे सर्वात प्रथम आपल्या समोर असणार आहे. समाजावर एआयचा विविध प्रकारे प्रभाव पडणार आहे.

गुगलने नुकत्याच २०२० मध्ये अमेरिकेत झालेल्या निवडणूकीत कथित फसवणूकीच्या दाव्यांना युट्युबवरुन काढण्यास सुरुवात केली होती. कंपनीने असे म्हटले होते की, त्यांनी हा निर्णय समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतला आहे. तसेच युट्युबला ओपन डिस्कशन फोरमच्या रुपात कायम ठेवण्यासाठी घेतला गेला.

या व्यतिरिक्त फ्री स्पीच बद्दल श्मिट यांनी असे म्हटले की, बोलण्याचे स्वातंत्र्य हे प्रत्येक व्यक्तीला दिले जाऊ शकते, पण कंप्युटर्सला नाही. त्यामुळे सोशल मीडियातील सर्व कंटेट मार्क केले पाहिजेत. प्लॅटफॉर्मला माहिती पाहिजे की, युजर कोण आहे. जर कायद्याचे उल्लंघन केले तर त्याला त्यासाठी जबाबदार ठरविले पाहिदे. मात्र यामुळे चुकीच्या बातम्या थांबल्या जाणार नाहीत. पण हे कळेल की, अखेर असे दावे नक्की कोणाकडून केले जातायत.(AI impact on 2024 election)

हेही वाचा- नासा मंगळावर माणसाला पाठवणार…

काही दिवसांपूर्वी ओपनएआयने एक रिपोर्ट जारी केला होता. त्यात असे म्हटले होते की, चॅटजीपीटीमुळे नोकऱ्यांवर गदा येऊ शकते आणि कोणाच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील हे सुद्धा सांगितले गेले होते. ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन हे सिनेट पॅनलसमोर आले होते. त्यावेळी त्यांनी असे म्हटले की, आर्टिफिशियल इंटेलिजेंन्सपासून समाजाला धोका आहे. त्यामुळे या संदर्भात सरकारने कठोर धोरण आखले पाहिजे. खासकरुन निवडणूका आणि एआय संदर्भातील नियम. यासाठी गाइडलाइन्स ही तयार केल्या पाहिजेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.