पॅन कार्ड धारकांना ३१ मार्च २०२३ पूर्वी पॅन हे आधार कार्डला लिंक करण्याची सुचना दिली गेली आहे. या संबंधित आयकर विभागाने वेळोवेळी सांगितले ही होते. आयकर विभागानुसार पॅन-आधार कार्डला लिंक करण्यासाठी काही शुल्क ही आकारला जात आहे. त्यामुळे पेमेट केल्यानंतरच तुमचे पॅन हे आधार कार्डला लिंक झाल्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.अशातच काही लोकांकडून असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे की, यासाठी शुल्क का भरावा तर याचेच सविस्तर कारण आपण पुढे जाणून घेऊयात.(Aadhar-PAN link)
पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणे का गरजेचे?
इनकम टॅक्स डिपार्टमेंटने पॅन धारकांना आयकर अधिनियम १९६१ च्या नुसार पॅनधारक सूटीच्या श्रेणीत येत नाहीत. त्यामुळे त्यांनी ३१ मार्च पूर्वी पॅन हे आधार कार्डला लिंक करावे असे सांगितले गेले आहे. लिंक न झाल्यास १ एप्रिल २०२३ पासून इनकम टॅक्स अॅक्टच्या कलम १३९एए अंतर्गत तुमचे पॅन रद्द होऊ शकते. त्यानंतर कधीच तुम्ही पॅनचा वापर करु शकणार नाहीत.
आयकर विभागानसार १ जुलै २०२२ पर्यंत पॅनला आधार कार्ड सोबत लिंक करण्याची प्रक्रिया निशुल्क होती. त्यानंतर ३० जून २०२२ पर्यंत लिंक करण्याची संधी ही ग्राहकांना दिली होती. पण फी तेव्हा ५०० रुपये होती. मात्र आता ३१ मार्च २०२३ पर्यंत पॅनला आधार कार्ड लिंक करण्याचा कालावधी वाढवला आहे. परंतु त्यासाठी ग्राहकांना १ हजार रुपये लेट फी म्हणून भरावी लागणार आहे.
पॅन धार लिंकची फी कशी जमा कराल?
सर्वात प्रथम आयकर वेबसाइटनुसार पॅन युजर्सला पॅन आधार कार्डला लिंक करताना १ हजार रुपयांचे पेमेंट कसे करावे याबद्दल जाणून घेऊयात.(Aadhar-PAN link)
हे देखील वाचा- १ एप्रिल पासून UPI च्या माध्यमातून पेमेंट करणे महागणार
-पॅन आधारला लिंक करण्यासाठी युजर्सला NSDL पोर्टला भेट द्यावी लागणार आहे
-पॅन आधार लिकिंग करण्यासाठी Challan nO/ITNS 280 अंतर्गत प्रोसीडवर क्लिक करा
-आता Select Tax Applicable ऑप्शन निवडा
-त्यानंतर सिंगल चलान मधअये १ हजार रुपयांसह पेमेंट शुल्क निश्चित करा
-नेट बँकिंग किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करु शकता
-पॅन क्रमांक दाखल करा, वर्ष आणि पत्ता द्या
-त्यानंतर कॅप्चा कोड टाकून प्रोसीडवर क्लिक करा
-आता पुन्हा एकदा पेमेंट झाल्यानंतर करदाता पॅन-आधार लिंक करु शकतात