Home » Emmanuel Macron : मॅक्रॉन आणि कोकेन !

Emmanuel Macron : मॅक्रॉन आणि कोकेन !

by Team Gajawaja
0 comment
Emmanuel Macron
Share

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असतांना दुसरीकडे फ्रान्स, इंग्लड आणि जर्मनीचे नेते वेगळ्याच वादात सापडले आहेत. या तिनही देशांचे नेते युक्रेनची राजधानी किव येथे जात होते. त्यांच्या या प्रवासादरम्यानच काही पत्रकारांनी त्यांना गाठलं. आंतरराष्ट्रीय प्रश्न, रशिया-युक्रेन युद्ध अशा अनेक विषयांवर ही पत्रकार परिषद झाली. मात्र यातून बाहेर आलेली बातमी वेगळीच होती. या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या पत्रकारांना अशी एक वस्तू दिसली की त्यावरुन फ्रान्स, इंग्लड आणि जर्मनी या तीन देशांच्या प्रमुखांवर आरोप करण्यात येत आहेत. हा आरोप चक्क कोकेन ड्रग्जचे सेवन करण्याबाबत आहे. या पत्रकरांनी जगातील मान्यवर अशा फ्रान्स, इंग्लंड आणि जर्मनीचे नेते उघडपणे कोकेन घेत असल्याचे सांगितले, आणि सगळीकडे खळबळ उडाली. (Emmanuel Macron)

याबाबत नुसतीच बातमी आली नाही तर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला. त्यात ते कोकेन ड्रग्जसारखी वस्तू लपवतांना दिसत आहेत. हा वाद वाढल्यावर संबंधित देशांचे प्रसिद्धी प्रमुख पुढे आले, आणि त्यांनी ही वस्तू म्हणजे, टिश्यू पेपर आहे असे सांगितले, तर अन्य एका अधिका-यांनी या वस्तू म्हणजे, चष्म्याचे कव्हर असल्याचे सांगितले. पण या खुलाशानंतरही हा कोकेन वाद क्षमलेला नाही. यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याजवळ पडलेली कोकेन सदृश्य वस्तू दिसत आहे. त्यामुळे मॅक्रॉन अधिक वादात सापडले आहेत. पण त्यांच्यासोबत असलेले अन्य दोन देशांचे नेतेही कोकेन सेवन करत असावेत, अशा बातम्या आल्यानं हा वाद पुन्हा उफाळून आला. याबाबत मॅक्रॉन यांनी स्पष्टीकरण दिले असून हा सर्व वाद रशियाच्या प्रचार माध्यमांनी मुद्दाम तयार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. आतंरराष्ट्रीय समुदाय युक्रेनच्या पाठिशी उभा रहात असल्यानं रशियानं आता नेत्यांच्या बदनामीसाठी वेगळी खेळी सुरु केल्याचा आरोप त्यांनी ब्लादेमिर पुतिन यांच्यावर केला आहे. (International News)

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मॅक्रॉन एक पांढरे पॅकेट लपवताना दिसत आहेत. भर पत्रकार परिषदेत मॅक्रॉन ही लपवा छपवी करत असतांना ती नेमकी पत्रकारांनी कॅमे-यात टिपली आणि रशिया युक्रेन युद्धाच्या बातमीपेक्षा ही कोकेनची बातमी हिट ठरली. मुख्य म्हणजे, मेक्रॉन जेव्हा आपल्या समोरील पांढ-या रंगाचे पाकीट लपण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांच्याबरोबर जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्झ आणि ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर हे दोन नेतेही उपस्थित होते. हे तिनही नेते युक्रेनची राजधानी किव येथे ट्रेननं जात होते. त्याच ट्रेन प्रवासात हा धक्कादायक व्हिडिओ शूट करण्यात आला. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन हे आपल्यासमोरील पाऊच हळूच कागदामागे लपवतांना दिसत आहेत. यावेळी फ्रेडरिक मर्झ आणि ब्रिटिश केयर स्टारमर हे दोन्हीही नेते काही काळ स्तब्ध झाल्याचे दिसत आहेत. त्यावरुनच इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अन्य दोन्ही नेते कोकेन सेवन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Emmanuel Macron)

==============

हे देखील वाचा : Virat Kohli : किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

Tulshi Mal : तुळशीची माळ म्हणजे काय? ती घालण्याचे फायदे कोणते?

==============

हा वाद वाढल्यावर फ्रान्स सरकारचे प्रसिद्ध प्रमुख पुढे आले आहेत. त्यांनी हा सर्वात मोठा कट असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मतानुसार ही अफवा रशियन परराष्ट्र मंत्रालयाने सुरू केली आहे. मात्र रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी यामागे रशियाचा कट असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. त्यांच्यांमते मॅक्रॉन, मर्झ आणि स्टारमर हे तिन्ही नेते जे पांढ-या रंगाचे पाऊच लपवत होते, त्यात काय आहे, हे माध्यमांनीच स्पष्ट केले आहे. रशियान माध्यमांच्या मते, एक फ्रेंच, एक इंग्रज आणि एक जर्मन यांनी कोकेन वापरले होते आणि पत्रकार येण्यापूर्वी ते वस्तू काढायला विसरले होते. रशियान प्रवक्त्या झाखारोवा यांनी या तीनही नेत्यांसोबत युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावरही टिका केली आहे. झेलेन्स्की हे कोकेनचे नित्यनेमानं सेवन करतात. त्यामुळे त्यांना मदत करणारे सहकारीही त्यांच्यासारखेच असल्याचा आरोप रशियन प्रवक्त्यानं केला आहे. या सर्व आरोपांमुळे किवमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत उपस्थितांचे सर्वच फ्रान्स, इंग्लड आणि जर्मनीच्या नेत्यांकडे लागले होते. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.