आपल्या घरात आपली आजी, आई देवाचे नामस्मरण करण्यासाठी जप माळ वापरतात, हे आपण नेहमीच बघत असतो. हीच माळ वारकरी संप्रदायातील लोकांच्या गळ्यात देखील असते. या माळेलाच तुळशी माळ असे म्हणतात. या माळेचे खूपच मोठे महत्व आहे. अगदी देवाचेच स्थान या माळेला देखील देण्यात आले आहे. या माळेला सर्वात जास्त महत्व वारकरी संप्रदायात असल्याचे आपण बघतो. वैष्णव लोकांची ओळख असलेली ही माळ साधारण गळ्यात घालण्याची माळ नाही तर देवाचा आशीर्वाद समजला जातो. (Tulshi Mal)
विठुरायाला प्रिय असणाऱ्या तुळशीच्या झाडाच्या लाकडापासून ही १०८ मण्यांची ‘तुळशीमाळ’ तयार केली जाते. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं तुळशीमाळ म्हणजे, त्यांचे सर्वस्व असते. ज्या प्रमाणे मंगळसूत्र ही विवाहित महिलांची ओळख असते, त्याच प्रमाणे तुळशी माळ ही वैष्णवांची ओळख असते. देवाला तुळस प्रिय म्हणूनच त्याच औषधी तुळशीच्या लाकडापासून बनविलेली माळ ही वारकऱ्यांचे दैवत असते. (Marathi Latest News)
हिंदू धर्मात तुळस ही वनस्पती फार महत्वाची आहे. देवपूजेमध्ये या तुळशीला वरचे स्थान प्राप्त आहे. त्यामुळे या तुळशीपासून बनवलेली माळ तेवढीच महत्वाची आणि पूजनीय आहे. पंढरपूरमध्ये काशीकापडी समाज हा शेकडो वर्षांपासून तुळशीमाळा बनवण्याचा व्यवसाय करतो आहे. तुळसीच्या लाकडाचे तुकडे राट नावाच्या यंत्रावर कातले जाते आणि त्यांचे मणी बनवले जातात. तुळशीच्या १०८ मण्यांची माळ घातल्या खेरीज कोणालाही वारकरी होता येत नाही. त्यामुळे वारकऱ्यासाठी वारी ही महत्त्वाची आहे. (Marathi Trending News)
तुळशी माळ गळ्यात घालताच शरिरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शिवाय घरात सुख-शांतीचं वातावरण नांदतं. मानसिक तणाव दूर करण्यासाठी विविध आजारांवर आराम मिळावा यासाठी तुळशीची माळा उपयुक्त असते. शिवाय त्वचा रोगांवर देखील ही माळ फायदेशीर ठरते. तुळशीमाळ ही सर्व अशुद्ध कर्म, वाईट शक्ती आणि वाईट विचारांना शुद्ध करते. नकारात्मक विचार, चंचल मन, अहंकार, राग आणि इतर अनियंत्रित भावनांवर नियंत्रण ठेवते. तुळशीची माळ परिधान केल्यास कोणत्याही वास्तुतील दोष दूर होतात. (Marathi Top News)
तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक लाभ होतात. याच तुळशीपासून बनवलेली तुळशीची माळ घातल्याने देखील अनेक फायदे आपल्याला होत असतात. तुळशीची जपमाळ धारण केल्यानंतर अनेक फायदे होतात. तुळशीची माळ धारण केल्याने व्यक्तीला विशेष लाभ मिळू शकतो हे जाणून घेऊया. (Top Stories)
तुळशीची माळ धारण करण्याचे नियम
> तुळशीची माळ घालण्यापूर्वी ती गंगाजलाने धुवावी आणि ती सुकल्यानंतरच घातली पाहिजे.
> जे लोक तुळशीची जपमाळ धारण करतात त्यांनी दररोज जप करावा. यामुळे भगवान विष्णूची कृपा अबाधित राहते.
> जे लोक तुळशीची माळ घालतात त्यांनी सात्विक अन्न खावे. सात्विक अन्न म्हणजे कांदा, लसूण, मांस, मासे इत्यादी पदार्थांचे सेवन करू नये.
> कोणतीही परिस्थिती असो, तुळशीची जपमाळ शरीरापासून वेगळी करू नये.
तुळशीची माळ फायदे
– तुळशीची माळ गळ्यात घातल्यानं मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात.
– माणसाची आध्यात्मिक प्रगती होते ज्यामुळे तो स्वतःला देवाच्या जवळ अनुभवतो.
– तुळशीची माळ घातल्यानं सन्मान आणि सौभाग्य लाभतं.
– मनात सकारात्मकता विकसित होते. मानसिक शांतता प्राप्त होते.
– तुळशी शुद्धीकरण गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. तुळशीची माळ धारण केल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर राहतात. ही माळ जीवनात सकारात्मकता आणते.
– तुळशीच्या लाकडामध्ये एक विशिष्ट प्रकाराचा द्रव आढळतो जे मानसिक ताणाला दूर करतो. या मुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते.
– तुळशीची माळ शरीरास स्पर्श झाल्यामुळे कफ आणि वातदोषां पासून आराम मिळतो.
=======
हे देखील वाचा : Virat-Anushka : विराट-अनुष्काच्या हातात दिसली ‘इलेक्ट्रॉनिक जपमाळ’
RTO : महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्यात होणार नवीन आरटीओ ऑफिस
=======
खरी तुळशीची माळ कशी ओळखावी?
तुळशीची योग्य माळ ओळखण्यासाठी अर्ध्या तासासाठी ही माळ पाण्यात ठेवा. जर त्यांचा रंग सुटला तर समजून घ्या की ही एक बनावट माळ आहे.
तुळशीचे दोन प्रकार
श्यामा तुळशी आणि राम तुळशी असे तुळशीचे दोन प्रकार आहेत. श्यामा तुळशीच्या बीजारा हार घातल्यास मानसिक शांती मिळते आणि सकारात्मक विचार मनात निर्माण होतात. यामुळे आध्यात्मिक आणि कौटुंबिक प्रगती होण्यास मगत होते. राम तुळशीची माळ गळ्यात घातल्याने आत्मविश्वास वाढतो आणि सात्विक भावना, विचार मनात निर्माण होतात. (Social News)