Home » Virat Kohli : किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

Virat Kohli : किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Virat Kohli
Share

भारताचा माजी कर्णधार आणि स्टार बॅट्समन विराट कोहलीने कसोटी क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. मागच्याच आठवड्यात BCCI सोबत चर्चा केल्यानंतर विराटने तो निवृत्ती घेणार असल्याची हिंट दिली होती. मात्र आज त्याने कसोटीतून रिटायर होत असल्याची अधिकृत घोषणा केली. विराटने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या. विराटने त्याच्या तब्बल १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला ‘अलविदा’ केलं. (Virat Kohli)

विराटची पोस्ट

विराटने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “मी १४ वर्षांपूर्वी पहिल्यांदा टेस्ट क्रिकेटसाठी ब्लॅगी ब्लू रंगाचा ड्रेस घातला होता. खरं सांगायचे झाले तर या कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये माझा प्रवास असा असेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉरमॅटने माझी अनेकदा परीक्षा घेतली, मला घडवलं आणि आयुष्यभर उपयोगी पडतील असे धडे सुद्धा शिकवले. (Virat Kohli Retirement)

पांढऱ्या जर्सीत खेळणं हे माझ्यासाठी खासगी आयुष्यात खूप खास होते. मोठ – मोठे दिवस आणि काही छोटे क्षण जे कोणी पाहत नाही मात्र ते कायम तुमच्यासोबत राहतात. या फॉरमॅटमधून निवृत्ती घेणं माझ्यासाठी अजिबातच सोपं नव्हतं. पण मला हा निर्णय योग्य वाटतोय, हीच योग्य वेळ आहे. माझ्याकडे जे होतं ते सगळं मी या कसोटी क्रिकेटला दिलं. मला कायमच माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत मिळालं आहे. आज मी कृतज्ञतापूर्व मनाने निवृत्त होत आहे. हा खेळ, मी ज्या लोकांसोबत मैदानांत खेळलो ते आणि या प्रवासात वाटेत भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो. मी माझ्या कसोटी करिअरकडे कायम हसतमुखाने पाहत राहीन.” (Virat Kohli News)

Virat Kohli

दरम्यान विराट कोहलीने जून २०११ मध्ये किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध त्याचे कसोटी पदार्पण केले होते. विराटने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात १५ धावा केल्या होत्या. तो त्याची शेवटची कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे जानेवारी २०२५ मध्ये खेळला होता. या शेवटच्या कसोटीत विराटने पहिल्या डावात १७ धावा आणि दुसऱ्या डावात ६ धावा केल्या होत्या. (Marathi News)

भारतासाठी १४ वर्ष कसोटी क्रिकेट खेळताना विराटने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. अनेक इतिहास रचले. त्याने १२३ टेस्ट मॅचेस खेळत २१० इनिंग्समध्ये ४६.८५ च्या रनरेटने ९२३० धावा केल्या. ३० शतकं आणि ३१ अर्धशतक झळकावणाऱ्या विराटची, नाबाद २५४ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच जमिनीवर हरवले होते आणि टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता. (Marathi Top News)

विराट कोहलीचे रेकॉर्ड्स

* विराट कोहलीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम आहे. विराटने १२३ सामन्यांच्या २१० डावांमध्ये ९२३० धावा केल्या, ज्यामध्ये त्यानं ७ वेळा द्विशतकी खेळी खेळली. कसोटी क्रिकेटमध्ये ७ वेळा द्विशतक करणारा तो एकमेव भारतीय कसोटी कर्णधार आहे.

* विराट कोहलीने कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करताना ६८ सामने खेळले आणि ४० सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला, तर १७ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत विजय मिळवणारा विराट कोहली हा एकमेव कसोटी  कर्णधार आहे. विराट कोहली हा आशियाई कर्णधार आहे ज्याने सात देशांमध्ये सर्वाधिक कसोटी सामने जिंकले आहेत. (Marathi Trending News)

Virat Kohli

* भारतीय कर्णधार म्हणून विराटने कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने २० शतकांसह ५८६४ धावा केल्या.

* विराट कोहली हा २०१२, २०१५, २०१६ या सालात सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय आहे.

कोहलीकडे किती आहे संपत्ती ?

भारतीय क्रिकेट विश्वातील मोठं नाव असलेला विराट कोहली याची सर्वत्र चर्चा असते. सध्याच्या काळाता तो कमाईच्या बाबतीत जगभरातील श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. तो एखाद्या सेलिब्रिटीपेक्षाही अधिक कमाई करताना दिसतो. त्याची एकूण संपत्ती 1050 कोटी रुपयांच्या आसपास आहे. 2024 मध्ये विराट कोहलीला सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटरचा टॅग मिळाला होता. (Top Stories)

विराट कोहलीच्या कमाईचा मुख्य स्त्रोत क्रिकेट आहे. कोहलीला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून ७ कोटी रुपये मिळतात, तर आयपीएलमध्ये त्याचा पगार १५ कोटींहून अधिक आहे. याशिवाय, तो ब्रँड एंडोर्समेंटमधून भरपूर पैसे कमावतो. क्रिकेटव्यतिरिक्त विराट कोहली अनेकदा त्याच्या सोशल मीडियावर ब्रँड एंडोर्समेंट करताना पोस्ट किंवा व्हिडिओ शेअर करताना दिसतो. कोहलीचे मुंबईत आलिशान घर असून तो कुटुंबासोबत राहतो. कोहलीच्या घराची किंमत ३४ कोटी रुपये आहे. एवढंच नव्हे तर एनसीआरच्या गुरुग्राममध्ये त्याची प्रॉपर्टी असून त्याची किंमत १०० कोटींच्या आसपास असल्याचे समजते. (Social News)

=======

हे देखील वाचा : Buddha Purnima : बुद्ध पौर्णिमा

=======

विराटने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. मान्यवर, एमपीएल, पेप्सी, फिलिप्, फार्स्टट्रैक, बूस्ट, ऑडी, एमआरएफ, हीरो, Puma अशा अनेक ब्रांड्सच्या जाहिराती करून विराट कोट्यवधींची कमाई करतो. यासोबतच त्याने Blue Tribe, Chisel Fitness, Nueva, Sport Convo आणि Digit सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकही केली आहे. (Marathi Latest News)

विराट कोहलीला मिळालेले पुरस्कार

विराट कोहलीला आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विराटला २०१३ मध्ये अर्जुन पुरस्कार, २०१७ मध्ये पद्मश्री आणि २०१८ मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर, कोहलीने २०१२, २०१७, २०१८ आणि २०२३ साली चार वेळा ODI प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. (Top Marathi Stories)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.