Home » Google Map : बायको सोबत भांडण झालं आणि त्याने गूगल मॅप तयार केलं!

Google Map : बायको सोबत भांडण झालं आणि त्याने गूगल मॅप तयार केलं!

by Team Gajawaja
0 comment
Google Map
Share

24 नोव्हेंबर 2024 ची घटना आहे. उत्तर प्रदेशात तीन व्यक्ती कारने जात होते. एका अर्धवट कोसळलेल्या पुलावरून नदीत कोसळून या तिघांचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र गुगल मॅप्सने त्यांना तो रस्ता दाखवला होता,असा त्यांना संशय आहे. पण आपल्या एखाद्या अपघातासाठी आपण मोबाईलमधल्या दिशा दाखवणाऱ्या ॲपला जबाबदार ठरवू शकतो का? या अपघातानंतर असा प्रश्न उपस्थित केला गेला. पूर्वी घरातून बाहेर पडल्यानंतर रस्ता चुकल्यावर आपण वाटेतल्या एखाद्या माणसाला पत्ता विचारायचो. पण आता आपण सरळ मोबाइल काढून गूगल मॅप्सची मदत घेतो. इतक्या इंट्रेस्टिंग ॲपचा म्हणजे गूगल मॅपचा शोध कसा लागला तुम्हाला माहितेय का ? जाणून घ्या ! (Google Map)

आपण एखाद्या नवीन शहरात गेलो आणि त्या ठिकाणी आपल्याला रस्ता शोधायचा असेल तर आपण गुगल मॅपचा वापर करतो. गुगल मॅपमुळे आपला प्रवास सुखकर होतो. पण या गूगल मॅपचा शोध लागला होता एक घटनेमुळे जी अनेकांना माहीतच नाहीये. गुगल मॅपचा शोध लावला गुगलचे CEO सुंदर पिचई यांनी. त्याचं झालं काय, अमेरिकेत राहणाऱ्या सुंदर पिचई यांना एकदा आपल्या बायकोसोबत एका ठिकाणी जेवायला जायचं होतं. सुंदर पिचईनी घरून निघण्याआधी बायकोला सांगितलं की, तू थेट हॉटेलमध्ये पोहोच, मी तुला तिकडेच भेटतो. सुंदर पिचई यांची बायको अंजली बरोबर ८ वाजता डिनर प्लेसला येऊन पोहचल्या. पिचईसुद्धा टाईमिंगमध्ये ऑफिसमधून निघाले खरे, पण मध्ये ते रस्ता हरवले. त्या हॉटेलचा रस्ता शोधता शोधता पिचईना रात्रीचे १० वाजले. आता कुठल्या बायकोने हे असं वागणं सहन केलं असत का ? तर नाही. पिचईंच्या बायकोनेसुद्धा तुमच्या आमच्यासारखीच या action वर रिऍक्शन देत त्या तिथून निघून गेल्या. योग्य वेळी न पोहचल्याने पिचईंची बायको प्रचंड संतापलेली होती आणि पिचईंवर नाराज होती. सुंदर पिचई घरी पोहचले आणि त्यांचात कडाक्याचं भांडणं झाल. (Unknown facts)

आता बायकोबरोबर भांडण झाल्यामुळे ऑफिसला जाऊन पिचई विचार करू लागले की, असं काय बनवता येईल जेणेकरून माणूस रस्ता हरवणार नाही. आणि मग रात्रभर विचार केल्यानंतर त्यांना एक आयडिया सुचली आणि ती कन्सेप्ट त्यांनी त्यांच्या टीमसमोर मांडली. हि आईडिया एका ॲप ची होती ते ॲप म्हणजे गूगल मॅप ! हि आयडिया त्यांनी मांडली खरी, पण सगळ्या टीमने सुंदर पिचईना नकार दिला. पण पिचईनी अक्ख्या टीमला आपली आयडिया व्यवस्थित समजावून सांगितली आणि अखेर २००५ साली अमेरिकेमध्ये गुगल मॅपची सुरवात झाली. गुगल मॅप्स लाँच करताना गुगलने सांगितल होतं की, ही सुविधा हळूहळू अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आता कंपनीचं हे म्हणणं निश्चितच खरं होताना पाहायला मिळतय. पुढे, अमेरिकेनंतर २००८ साली गुगल मॅपने भारतातसुद्धा प्रवेश केला. (Google Map)

पण सुरुवातीला गुगल मॅप भारतात फ्लॉप झाला होता, याचं कारण म्हणजे अमेरिकेत प्रत्येक रस्त्याला मेन स्ट्रीट, चर्च स्ट्रीट अशी नावं असतात. पण भारतात रस्त्यांची नाव कमी वापरली जातात. त्यामुळे गुगल मॅप इथे कार्य करू शकत नव्हते. पण त्यानंतरही गुगलने हार मानली नाही आणि आपल्या एका रिसर्च टीमच्या मदतीने इथे मार्ग कसे शोधले जातात हे भारतीयांकडून समजून घेतलं. थोडक्यात, त्यांनी रस्त्यांच्या नावांऐवजी लँडमार्कवर आधारित दिशानिर्देश देण्यास सुरुवात केली.आपल्या नकाशात अनेक बदल केले आणि त्यानंतर भारतात गुगल मॅप यशस्वी झालं. यादरम्यान, नोव्हेंबर 2007 मध्ये गुगलने या अप्लिकेशनमध्ये एक बदल केला. हा बदल म्हणजे सर्वांना सोयीस्कर व्हावं यासाठी ह्या ॲपची सुविधा मोबाइलमध्ये उपलब्ध करून दिली गेली. थोडक्यता मोबाइल ॲप सुरू करण्यात आलं. याचा लोकांना खूप फायदा झाला. पुढे गुगल मॅपच पहिल अँड्रॉइड ॲप हे 2008 मध्ये लाँच झाले होते आणि त्यानंतर 2012 मध्ये iOS ॲप लाँच करण्यात आल होत. (Unknown facts)

===============

हे देखील वाचा : 

Nirmala Devi : काय आहे ग्रीन आर्मी ?

Rohit Sharma : बुमराह ठरतोय हुकुमी एक्का ! रोहितची कॅप्टनसी जाण्याच्या मार्गावर ?

==================

आज तुम्ही गुगल मॅपवर संपूर्ण जगाचे रस्ते आणि मार्ग सहज पाहू शकता. आपण एखाद्या नवीन शहरात गेलो आणि त्या ठिकाणी आपल्याला रस्ता शोधायचा असेल तर आपण गुगल मॅपचा वापर करतो. गुगल मॅपमुळे आपला प्रवास सुखकर होतो. आता गुगल मॅपने इतकी सोय केलीय पण गुगल मॅप हा दरवेळी योग्यच रस्ता दाखवत नाही तर कधी कधी जिथं अर्जंट पोहचायचं असतं तिथं तिसराच रस्ता दाखवून माणूस हरवतो. पण आज गुगल मॅपचं मार्केट इतकं आहे कि जगातला प्रत्येक दहावा माणूस गुगल मॅपचा वापर करतो. Ola, Uber पासून Rapido पर्यंत सगळे गुगल मॅप वापरतात. म्हणजे मंडळी बायकोसोबत झालेल्या भांडणाचा परिणाम म्हणून सुंदर पिचई यांनी गुगल मॅपचा शोध लावला त्याचा आपल्याला इतका फायदा होतोय. थोडक्यात काय दोघांचं भांडण आणि तिसऱ्याच लाभ होतो तो हा असा ! (Google Map)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.