Home » Bhopal : त्या विषारी कच-याची विल्हेवाट आणि नकोशा आठवणी

Bhopal : त्या विषारी कच-याची विल्हेवाट आणि नकोशा आठवणी

by Team Gajawaja
0 comment
Bhopal
Share

2 डिसेंबर 1984 ही तारीख मध्यप्रदेशच्या भोपाळमधील नागरिक कधीही विसरणार नाहीत. 2 आणि 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळमधील युनियन कार्बाइड कारखान्यात मिथाइल आयसोसायनेट (MIC) गॅसची गळती झाली. सुमारे 40 वर्षापूर्वी झालेल्या या गॅस दुर्घटनेत 5 हजाराहून अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला. भारतातीलच नाही तर मानवी इतिसाहासातील सर्वात मोठी शोकांतिका म्हणून या दुर्घटनेची नोंद झाली. या युनियन कार्बाइड कारखान्याचे संचालक यातून सहिसलामत विदेशात निसटले. मात्र येथील जनतेवर अद्यापही या विषारी वायूच्या दुर्घटनेची दहशत आहे. कारण या युनियन कार्बाइड कारखान्यात अनेक टन घातक कचरा असून यामुळे या भागातील जमिनीची पोतही खराब झाली आहे. शिवाय या भागातील पाण्याच्या साठ्यांवरही या घातक कच-याचा परिणाम झाला असून जे नागरिक या दुर्घटनेतून वाचले आहेत, त्यांना अनेक घातक आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच या घातक कच-याचे काय करावे याचा प्रश्न प्रशासनासमोर होता. (Bhopal)

यासाठी मध्यप्रदेश सरकारनं ऑगस्ट 2024 मध्ये काही प्रयोग करुन हा कचरा नष्ट करण्यासाठी एक योजना तयार केली. यानुसार हा कचरा जाळला तरी त्यामुळे वायुप्रदूषण होणार नाही, याची खात्री करण्यात आली. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेपासून सुमारे 377 टन घातक कचरा या कारखान्यातून काढण्यात आला असून पिथमपूरमध्ये हा कचरा नेण्यात आला आणि तिथे त्याला नष्ट कऱण्यात येणार आहे. या कारखान्यातील कचरा नष्ट झाला तरी कारखाना ज्या जमिनीवर उभा आहे, त्या सर्व भागालाही विषारी 2-3 डिसेंबर 1984 ची मध्यरात्र ही मध्य प्रदेशची राजधानी भोपाळसाठी काळरात्र ठरली. या रात्री येथील युनियन कार्बाइड कारखान्यानं 5 हजार नागरिकांचा बळी घेतला. या कारखान्यात झालेल्या या दुर्घटनेची दहशत अशी आहे की, याला 40 वर्ष होऊनही येथील घातक कच-याचे विघटनही करण्यात आले नाही. भोपाळचे नागरिक गेल्या 40 वर्षांपासून या घातक कचऱ्यासोबत जगत आहेत. आता हा कचरा वैज्ञानिकांची मदत घेत नष्ट करण्यात येत आहे. (Marathi News)

या घातक कच-यामुळे भोपाळ येथील भूजल पातळीही प्रदुषित होत असल्याचा अहवाल आल्यामुळे मध्यप्रदेश सरकारनं युद्धपातळीवर या कच-याचे विघटन करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, म्हणजेच निरीनं याबाबत अहवाल दिला आहे. या अहवालानुसार या भागातील सुमारे 42 वसाहतींच्या भूजलात मानवी आरोग्यासाठी हानिकारक पदार्थ आढळून आले आहेत. हा अहवाल आल्यामुळे येथील नागरिकांना हा घातक कचरा नष्ट करावा अशी मागणी सरकारकडे केली. त्यानुसार गेल्या वर्षी, ऑगस्ट महिन्यात भोपाळ गॅस ट्रॅजेडी रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन डिपार्टमेंट आणि पिथमपूर इंडस्ट्रियल वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात एक करार झाला. त्यानुसार हा कचरा किमान 377 दिवसात नष्ट करण्याचे निश्चित कऱण्यात आले. (Bhopal)

यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान मंत्रालयाचीही मदत घेण्यात येत आहे. या कामी काही वैज्ञानिक मार्गदर्शन करीत असून शास्त्रोक्त पद्धतीने कचरा नष्ट करण्यात येत आहे. हा रासायनिक कचरा असून तो जाळल्यानं पर्यावरण हानी होणार नाही आणि भूजलावर त्याचा परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. याची सुरुवात 1 जानेवारीपासून झाली. 12 सीलबंद कंटेनर ट्रकमधून कचरा भोपाळपासून 250 किमी अंतरावर असलेल्या धार जिल्ह्यातील पिथमपूर औद्योगिक क्षेत्रात नेण्यात आले. या कंटेनरसाठी ग्रीन कॉरिडॉर बनवण्यात आला आहे. यासाठी 100 तज्ञांची टिम बनवण्यात आली आहे. डिसेंबर 1984 च्या मध्यरात्री युनियन कार्बाइड कीटकनाशक कारखान्यातून मिथाइल आयसोसायनेट नावाच्या विषारी वायूने 5 हजाराहून अधिक नागरिक मरण पावले. (Marathi News)

========

हे देखील वाचा : महिला नागा साधूंची कठोर साधना !

Rohit Sharma : बुमराह ठरतोय हुकुमी एक्का ! रोहितची कॅप्टनसी जाण्याच्या मार्गावर ?

======

मात्र त्याहून अधिक नागरिक दीर्घकाळ गंभीरपणे आजारी झाले. या घटनेनंतर जे जिवंत राहिले, त्यांना अपघातस्थळ खाली करण्याचा आदेश देण्यात आला. पण त्यांच्या शरीरावर झालेल्या या दुर्घटनेचे परिणाम हे कायम राहिले. मध्यंतरी या कारखान्यातील कचरा जाळण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. या कारखान्याच्या आसपासची शेतजमिन प्रदूषित झाली आहे. तसेच भूगर्भातील पाणी आणि जलस्रोतही प्रदूषित झाले आहेत. भोपाळमधील दुस-या पिढीवरही या घटनेचे परिमाण दिसून आले आहेत. त्यामुळेच या कारखान्यातील कचराही घातक असल्याची ओरड होत आहे. जिथे हा कचरा नष्ट करण्यासाठी नेण्यात आला आहे, त्या पिथमपूरच्या नागरिकांनीही तिथे कचरा नष्ट करु नये अशी मागणी केली आहे. तसेच त्याची राखही जमिनीवर टाकू नयेत अशी मागणी आहे. ही संपूर्ण प्रक्रिया वर्षभर चालणार असून त्याचा कोणताही परिणाम पर्यावरणावर होणार नाही, असा विश्वास मध्यप्रदेश सरकारनं पिथमपूरच्या नागरिकांना दिला आहे. (Bhopal)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.