महाराष्ट्र हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. सध्या महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून तांदळाची लावणी जोरात सुरु आहे. कोकणात तर प्रामुख्यानं भाताची लागवड होते. तिथे लावणीची कामे सुरु झाली आहेत. महाराष्ट्रात भाताच्या अनेक जाती असल्या तरी त्यात इंद्रायणी तांदळाची सर्वात जास्त मागणी असते. यातही हा तांदूळ मावळमधील असेल तर त्याचा भाव जरा चढाच असतो. पचायला सोप्पा आणि अनेक प्रथिनांनी युक्त असलेल्या या तांदळाची ओळख त्याच्या सुवासात आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या भागात इंद्रायणी तांदळाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. हा मावळचा सुवासिक इंद्रायणी तांदूळ गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही सर्वाधिक खपाचा तांदूळ ठरला आहे. (Indrayani Rice)
पुणे जिल्ह्यात इंद्रायणी तांदळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील सुवासिक इंद्रायणी तांदूळ हा चवीला उत्तम असतो. थोड्या लहान आकाराचा हा तांदूळ जेवढा जूना तेवढा अधिक महाग होत जातो. कारण या तांदळाचा भात होतो, तेव्हा त्याचे आकारमान हे दुप्पटीनं किंवा तिप्पटीनंही वाढते. त्याला असलेला मंद सुवास खाणा-याला समाधान देतो. त्यामुळेच गेल्या काही वर्षात या सुवासिक इंद्रायणी तांदळाला मागणी वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या भागात गेल्या काही वर्षापासून या इंद्रायणी तांदळाची शेती वाढली आहे.
हा मावळचा इंद्रायणी तांदूळ एवढा प्रसिद्ध झाला आहे की अनेक व्यापारी थेट हा तांदूळ येथील शेतक-यांकडून विकत घेतात. कृषी विद्यापीठातील संशोधकांच्या मतानुसार मावळमधील जमीन ही या इंद्रायणी तांदळासाठी सर्वोत्तम आहे. त्यामुळेच या तांदळाचा सुवास आणि चवही अविट गोडीची होते. या इंद्रायणी तांदळाची गोडी सर्वांनाच आवडते, त्यामागे कारण सांगितले जाते की, ही शेती पारंपारिक पद्धतीनं केली जाते. भातपिकासाठी कुठलीही अतिरक्त खतांचा वापर करता येत नाही. त्यामुळेच इंद्रायणी तांदूळ अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. (Indrayani Rice)
आरोग्यासाठीही हा तांदूळ उत्तम असल्याचे या भातपिकाच्या बियाणावर संशोधन करणा-या संशोधकांचे मत आहे. हा तांदूळ पचायला चांगला असतो. सेंद्रिय तांदूळ म्हणून या तांदळाचा उल्लेख कऱण्यात येतो. या पिकाला कुठल्याही हानिकारक रसायने आणि कीटकनाशकांचा वापर न करता तयार केले जाते. त्यामुळे त्याची गुणवत्ता ही उत्तमच असते. अर्थात याचा सर्व परिणाम त्याच्या चवीवर होतो.
इंद्रायणी तांदळाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात भरपूर पोषक असतात. हा तांदूळ म्हणजे, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा चांगला स्रोत आहे. या तांदळापासून तयार होणा-या भातामध्ये चरबीचे प्रमाण कमी असते आणि त्यात कोलेस्टेरॉल नसते. त्यामुळे हा भात खाल्ला तरी वजन नियंत्रणात रहाते, असे संशोधक सांगतात. त्यामुळेच अलिकडे इंद्रायणी तांदळाला मागणी वाढली आहे. मावळ भागातील हा इंद्रायणी तांदूळ गेल्या काही वर्षापासून जागेवर खरेदी केला जात आहे. यातही ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे या तांदळाला चांगलाच भाव आला आहे. (Indrayani Rice)
====================
हे देखील वाचा : तुम्हाला माहित आहेत का ग्रीन टी सेवनाचे ‘हे’ फायदे
====================
त्यातही साठवणुकीसाठी हा इंद्रायणी तांदूळ वापरला जातो. हा तांदूळ जेवढा जुना तेवढे त्यातील पोषक मुल्य वाढते. त्यामुळेच अनेकजण हा तांदूळ साठवणुकीसाठीही घेतात. जेवढा जुना इंद्रायणी तांदूळ असेल तेवढी त्याची किंमत ही जास्त होते. सेंद्रिय इंद्रायणी तांदूळ हा सुपरफूड सारखा आहे. प्रथिने, फायबर आणि आवश्यक खनिजानी युक्त असलेल्या इंद्रायणी तांदळाची लागवड मावळ भागात वाढली आहे. ही इंद्रायणी तांदळाची शेती बघण्यासाठीही अनेक पर्यटक कृषी पर्यटनाच्या नावानं या भागात जातात.
अलिकडच्या काही वर्षात नाशिक नंदुरबार, नगर, सातारा, कोल्हापूर येथील शेतकरीही मावळच्या इंद्रायणी तांदळाचे वाण मोठ्या प्रमामात खरेदी करत आहेत. महाराष्ट्राच्या शेती उद्योगात या इंद्रायणी तांदळाचे प्रस्थ वाढते आहे. या इंद्रायणी तांदळला वाढती मागणी पाहता, या मावळ भागात अत्याधुनिक असे कृषी संशोधन केंद्र सुरु करावे अशी मागणीही होत आहे. (Indrayani Rice)
सई बने