तामिळनाडूच्या समुद्री सीमेपासून जवळ असलेल्या कच्चाथीवू बेटांवरुन काही दिवसापूर्वी मोठे वादविवाद सुरु होते. भारताच्या ताब्यात असलेले हे बेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७४ मध्ये श्रीलंकेला भेट दिल्याचा आरोप करण्यात आला. आता या बेटाचा वाद क्षमतो ना क्षमतो तोच कोको बेटेही दाखल झाली आहेत. ही कोको बेटे (Coco Islands) म्हणजे बंगालच्या उपसागरात असलेल्या लहान बेटांचा समूह आहे. बंगालच्या उपसागरातील ही बेटे आता म्यानमार या देशाचा भाग आहेत. हीच बेटं म्यानमारनं चीनला भाडेतत्त्वावर दिली आहेत. मात्र या बेटांवर चीननं स्वतंत्र लष्करी जाळं उभारल्याचे पुढे आले आणि भारताची चिंता वाढली आहे.
२०२३ मध्ये ब्रिटीश थिंक टँक हाऊसने केलेल्या खुलाशामुळे ही गोष्ट स्पष्ट झाली आणि भारतात एकच खळबळ उडाली. चीनने या कोको बेटांवर धावपट्टी आणि विमान हँगर उभारला आहे. यामुळे भारताला धोका निर्माण झाला आहे. काही वर्षापूर्वी ही बेटे भारताच्या अविभाज्य भाग होती. मात्र या बेटांना तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुन यांनी म्यानमारला भेट म्हणून दिले. नेहरुंच्या या निर्णयानं भारताचे नुकसान झाल्याची टिका करण्यात येत आहे. अंदमानमधून निवडणूक लढवणा-या उमेदवारांनी हा कोको बेटाचा प्रश्न उपस्थित केला आहे. भारताची कोको बेटे म्यानमारच्या ताब्यात देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितल्यावर आता हा मुद्दा राजकीय झाला आहे. मात्र असे असले तरी या बेटांवर वाढणा-या चीनच्या लष्करी हालचाली दुर्लक्षित करता येणार नाहीत.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी म्यानमारला कोको बेट भेट दिली होती. नेहरु यांच्या या चुकीच्या निर्णयामुळे भारताची डोकेदुखी वाढल्याचा आरोप अंदमान आणि निकोबार बेटांचे भारतीय जनता पक्षाचे नेते बिष्णू पदा रे यांनी केला आहे. ही कोको बेटे म्यानमारच्या किनाऱ्यापासून सुमारे ३०० किलोमीटर दक्षिणेला बंगालच्या उपसागरात आहेत. एप्रिल २०२३ मध्ये, ब्रिटिश थिंक टँकने या कोको बेटांबाबत एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आणि कोको बेटांचा मुद्दा भारतामध्ये गाजू लागला. मात्र आता निवडणुकीच्या प्रचारातही या कोको बेटांचा मुद्दा उठवण्यात आला आहे. एकेकाळी भारताचा अविभाज्य भाग असलेली ही बेटे नेहरुंनी म्यानमारला भेट दिली, ही चूकच असल्याचे भाजपा उमेदवारानं सांगितल्यामुळे याविरोधात कॉंग्रेसनी टिका केली आहे. त्यामुळे एखाद्या गावाएवढी लहान असलेली कोको बेटे प्रसिद्धीच्या झोकात आली आहेत.
कोको बेटे एकेकाळी उत्तर अंदमान बेटांचा भाग होती. तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी उत्तर अंदमान बेटांचा भाग असलेली कोको बेटे म्यानमारला भेट म्हणून दिली. पुढे ही बेटे म्यानमारनं भाडेतत्त्वावर चीनच्या ताब्यात दिली आहेत. आता या बेटांचा पूर्णपणे ताबा चीनकडे आहे. याच कोको बेटांवर चीन नवीन बांधकाम करीत असल्याचे भारतीय उपग्रहांनीही टिपले आहे. दक्षिण आशिया आणि हिंदी महासागर क्षेत्रामध्ये चीनचा प्रभाव वाढत आहे. त्यासाठी याच कोको बेटांवर चीनने लष्करी तळ उभारला आहे. हा तळ म्हणजे भारताच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरू शकतो. याच तळावर चीनच्या लष्करी हालचाली वेगात सुरु आहेत. (Coco Islands)
भारतीय सरकारने म्यानमारच्या लष्करी अधिका-यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. मात्र म्यानमारमध्ये असलेली लष्करी सत्ता आणि त्यांच्यात होणारे वाद पहाता चीन याचा फायदा घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा लाभ चीन आपल्या फायद्यासाठी करुन घेत आहे. अंदमान आणि निकोबार बेटापासून ही कोको बेटे अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावर आहेत. याच कोको बेटांवर चीनने रडार यंत्रणा बसवल्याची माहिती आहे. या सर्वांची पाहणी करण्याची मागणी भारताने केली असली तरी चीनचे तेथील वर्चस्व पहाता भारताची मागणी मान्य होणार नाही हे स्पष्ट आहे.
===========
हे देखील वाचा : मानसिक आणि फिजिकल ब्रेकची का गरज भासते? जाणून घ्या फायदे
===========
या बेटांवर काही लष्करी हालचाली झाल्या तर त्याचा पहिला फटका अंदमान निकोबार बेटांना बसणार आहे. आणि नंतर भारताच्या सागरी किनारपट्टीलाही मोठा धोका उत्पन्न होणार आहे. चीनकडे १९९४ पासून या बेटांचा ताबा असल्याने त्यांनी येथे मोठ्या प्रमाणात बांधकाम केले आहे. त्यात रडार यंत्रणा प्रमुख आहे. (Coco Islands)
या कोको बेटांवर सुरुवातील पोर्तुगीजांचे वर्चस्व होते. येथे नारळ भरपूर असल्यानं त्यांनी बेटांना कोको बेट (Coco Islands) असे नाव दिले. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने कोको बेटांवर वर्चस्व मिळवले. दुस-या महायुद्धातही या बेटांचा वापर झाल्याचा उल्लेख आहे. आता हिच बेटं भारताच्या राजकारणात एक वादळ घेऊन आलेली आहेत.
सई बने