Home » दुबईतील पूरपरिस्थितीला ‘Cloud seeding’ कसं ठरतंय कारणीभूत? जाणून घ्या

दुबईतील पूरपरिस्थितीला ‘Cloud seeding’ कसं ठरतंय कारणीभूत? जाणून घ्या

by Team Gajawaja
0 comment
dubaifloods
Share

तिसरं विश्वयुद्ध हे पाण्यासाठीच होणार असल्याचं भाकीत आपणही बऱ्याचदा ऐकलं असेल. पण खरंच तसं होणार आहे का? खरंच इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे का? भविष्यात जगावर खरंच एवढं मोठं संकट ओढवणार आहे का? अशा काही प्रश्नांची उत्तरं ही होकारार्थीच आहेत कारण सध्या बऱ्याच देशात पाण्याची समस्या भेडसावताना दिसत आहे. गेल्याच महिन्यात बेंगलोरसारख्या बड्या मेट्रो सिटीमध्ये पाण्याची समस्या चांगलीच वाढली आहे. बेंगलोरसारख्या राज्यात पिण्याच्या पाण्यापासून वापरायची पाण्याचीही टंचाई जाणवू लागली आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने कावेरी नदीच्या पात्रातही घट झाली आणि यामुळेच पिण्याचे पाणी आणि शेतीमध्ये सिंचनासाठी वापरले जाणारे पाणी यांची कमतरता भासू लागली आहे.

बेंगलोरमध्ये ही अवस्था आहे तर दुबईमध्ये (Dubai Flash Floods) जोरदार पावसाने थैमान घातले असून पुरजन्य परिस्थिती तिथे निर्माण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रखरखीत वाळवंटाच्या मधोमध वसलेल्या पर्यटनात अव्वल असलेल्या या देशात १६ एप्रिल २०२४ पासून जोरदार पाऊस सुरू झाला जो आत्ता कुठे कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसात पाऊस इतका वाढला की एयरपोर्ट, मेट्रो स्टेशन्स, मॉल, रस्ते सगळीकडे पाणी भरलं. शाळा आणि इतर सरकारी यंत्रणा ठप्प झाल्या. सोशल मीडियावर याचे बरेच व्हीडिओज आणि फोटोज व्हायरल झाले. दुबईमधील या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमागील नेमकं कारण काय आहे? याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

===

हेदेखील वाचा: दुबईचा पाऊस की रईसीची हौस…

===

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या २४ तासांत तब्बल १६० मिलीमीटर पाऊस पडला. एवढा पाऊस साधारणपणे २ वर्षात पडला नव्हता. काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हे सगळं क्लाऊड सीडिंग म्हणजेच कृत्रिम पावसा (Artificial Rain)मुळे झाले आहे. दुबई (Dubai Flash Floods) प्रशासनाने सोमवार आणि मंगळवारी विमानातून क्लाऊड सीडिंग केलं. या प्रक्रियेत काहीतरी गडबड झाली असल्याने हा प्रयत्न फसल्याचं सांगितलं जात आहे. गल्फ स्टेट नेशनल सेंटर ऑफ मेटरोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांत या विमानांनी ७ वेळा उड्डाण केलं आहे आणि याचाच फटका देशाला बसला असल्याचं सांगितलं जात आहे.

Dubai-floods

 

क्लाऊड सीडिंग म्हणजे काय?

कृत्रिम पावसासाठी वैज्ञानिक एका ठराविक उंचीवर जाऊन सिल्वर आयोडाइड, कोरडा बर्फ और मीठ ढगात सोडतात. यालाच क्लाऊड सीडिंग म्हंटले जाते. हे क्लाऊड सीडिंग करताना जर ढगांमध्ये पाणी किंवा आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले तर हा प्रयोग फसू शकतो. क्लाऊड सीडिंग तेव्हाच शक्य आहे जेव्हा आकाशात किमान ४०% ढग आवश्यक असतात आणि त्यात मुबलक प्रमाणात पाणीदेखील असावे लागते.

यूएइच्या हवामान विभागाकडून रेन एनहान्समेंट प्रोग्राम राबावला जातो. या प्रोग्रामच्या माध्यमातून यूएइच्या वातावरणातील केमिकल्स आणि इतर घटकांचा अभ्यास केला जातो आणि यानंतरच कृत्रिम ढग बनवायची प्रक्रिया सुरू होते. दुबईमध्ये (Dubai Flash Floods) कायमच पाण्याची टंचाई भासते. इथे भूजलाचा अधिक वापर केला जातो तरी या देशात पाण्याची समस्या कायम पाहायला मिळते. यावर उपाय म्हणूनच कृत्रिम पावसाची मदत घ्यावी लागते. यावेळी मात्र कृत्रिम पावसाचा हा प्रयत्न पुरताच फसल्याचं दिसत आहे. यूएइने सर्वप्रथम १९८२ मध्ये क्लाऊड सीडिंग केले होते.

Cloud-seeding

यामुळे पाऊस प्रचंड प्रमाणात पडतो पण त्यामुळे वेगळ्याच समस्यासुद्धा निर्माण होतात. वाळवंटाच्या प्रदेशात एवढा पाऊस पडला तर फ्लॅश फ्लडसारखी नैसर्गिक आपत्तीही उद्भवू शकते. सध्या दुबईमध्ये (Dubai Flash Floods) जो तूफान पाऊस पडतोय त्याने गेल्या ७५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. आता विमानतळावरुन विमानांचे उड्डाण व्यवस्थित सुरू झाले असले तरी या पूरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. दुबईबरोबरच नजीकच्या देशांमध्येसुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकूणच दुबईची परिस्थिती पाहता Artificial Rain किंवा cloud seeding सारखा मानवी आविष्कार आपलं आयुष्य अधिक सुकर करणार की त्यातून अशाच गंभीर समस्या निर्माण होणार हा प्रश्न साऱ्या जगासमोर निर्माण झाला आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.