चीनमधील वुहान शहरात डिसेंबर 2019 मध्ये एका नव्या रोगाची लक्षणे दिसून आली. या रोगाचे नाव होते कोरोना(Corona) . त्यानंतर अल्पावधीतच या कोरोना (Corona) नावाच्या नव्या रोगानं आपले हातपाय पसरले. एवढे की, अवघं जग या कोरोनाच्या विळख्यात आलं. सर्दी, खोकला, ताप आणि नंतर श्वास घेण्यासाठी त्रास सुरु झाला. लाखो नागरिकांचा या महामारिनं बळी घेतला. चीनमधून जगभर पसरलेल्या या रोगानं काही वर्ष जगाला अक्षरशः एका जागी थांबवून ठेवलं. काही जणांनी तर या रोगाची एवढी धास्ती घेतली, की सर्व नातेसंबंध तोडून एकांतवास स्विकारला. काहींचा या रोगानं मृत्यू झाला, त्यापेक्षा अनेकांचा या कोरोनाच्या धास्तीमुळे मृत्यू झाला. 23 जानेवारी 2020 रोजी, जागतिक आरोग्य संघटनेने या महामारीला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले. सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाला.
मुख्य म्हणजे, या रोगाला अटकाव करण्यासाठी कुठलेही औषध तेव्हा बाजारात उपलब्ध नव्हते. औषध येईपर्यंत आवश्यक ती काळजी घेण्यात आली. वर्षभरात कोरोनावर(Corona) लस उपलब्ध झाली. भारतासह काही देशांनी या लसींचे उत्पादन केले आणि कोरोनासारख्या (Corona) महामारीवर विजय मिळवला. सुरुवातीला कोरोनाची (Corona) एक लस उपलब्ध होणार होती. मात्र कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता अनेक देशांनी कोरोनाच्या दोन लसी नागरिकांना दिल्या. अमेरिका, इस्त्राईलसारख्या देशात कोरोनाच्या (Corona) आणखी एखादी लस वयोवृद्ध नागरिकांना दिल्या. मात्र आत्ताच काही दिवसांपूर्वी जर्मनीमध्ये एका व्यक्तीनं या कोरोनाच्या एक-दोन-तीन नव्हे तर चक्क 217 लसींचे डोस घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
एवढ्या मोठ्याप्रणात लस घेतल्यावर या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. कारण कोरोनाच्या लसीचे घातक परिणाम आहेत, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या (Corona) लसी घेतल्यावर संबंधिक व्यक्तीची प्रकृती कशी आहे, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.
कोरोना (Corona) या महामारीवर मात करण्यासाठी अनेक देशांनी लस तयार केली. मात्र आता कोरोनाची महामारी कमी झाल्यावर या लसींमुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण झाल्याची ओरड करण्यात येत आहे. विशेषतः मनुष्याच्या ह्दयावर आणि फुफ्फुसावर या लसींचा वाईट परिणाम झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र या सर्व चर्चांना विराम मिळेल, अशी बातमी जर्मनीहून आली आहे. एका जर्मन व्यक्तीनं कोरोना (Corona) लसींची 217 डोस घेतले आहेत. या वक्तीचे वय 60 वर्षाच्या पुढे असून त्याची प्रकृती ढणढणीत आहे. आता या व्यक्तीवर संशोधन करण्यात येत आहे.
जर्मनीत राहणाऱ्या एका 62 वर्षीय व्यक्तीला 29 महिन्यांत 217 वेळा कोविड 19 ची लस देण्यात आली आहे. एवढ्या कमी कालावधीत एवढ्या लस घेऊनही या व्यक्तीच्या शरीरावर त्याचा कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. तसेच या व्यक्तीची रोग प्रतिकारशक्तीही कमकुवत झालेली नाही. जर्मनीमधील या व्यक्तीची माहिती ‘द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज’मध्ये प्रकाशित करण्यात आल्यापासून सर्वत्र एकच खळबळ उडाली. आरोग्य क्षेत्राला यामुळे आव्हान मिळाले. सुरुवातीला याच व्यक्तीवर एवढ्या लस घेतल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
=================
हे देखील वाचा : किम जोंग उन याचा वारसा कोणाकडे जाणार ?
=================
जेव्हा सर्वसामान्यांना एक लस घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती, तेव्हा या व्यक्तीनं 217 लस घेतल्या, हा जर्मन सरकारच्या लेखी गुन्हा झाला आहे. पण त्यासोबतच ही व्यक्ती संशोधकांसाठी आव्हानात्मक ठरली आहे. कोविड-19 चा बूस्टर डोस किती दिवसात द्यावा यावर काही नियम घालून देण्यात आले होते. मात्र संबंधित व्यक्तीनं हे सर्व नियम बाजुला ठेऊन एकावर एक 217 लस घेतल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लस घेऊनही या व्यक्तीची प्रकृती उत्तम आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा ह्दयाचा किंवा अन्य त्रास जाणवत नाही. त्यामुळेच वैद्यकीय दृष्टीकोनातून आता त्याच्यावरसंशोधन सुरु करण्यात आले आहे.
कोव्हिडची लस घेतल्यावर रोग प्रतिकारशक्ती कमी होते, असे काहींनी सांगितले होते. मात्र आता जर्मनीमधील प्रकरण पुढे आल्यावर त्यावर नव्यानं संशोधन सुरु झाले आहे. संशोधकांनी या व्यक्तीचे रक्ताचे आणि लाळेचे नमुने तपासासाठी घेतले आहेत. तसेच या व्यक्तीची आधुनिक साधनांनी संपूर्ण तपासणी करण्यात येणार आहे. मात्र जेव्हा कोरोनाचा(Corona) उद्रेक झाला होता, तेव्हा एकाच व्यक्तीला एवढ्या मोठ्या प्रमाणात लस मिळावी, हा गुन्हा ठरला असून यातील सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे.
सई बने….