देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तयारी सुरु झाली आहे. १५ ऑगस्टला पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवणार आहेत. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. तर स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान आणि प्रजासत्ताक दिनावेळी राष्ट्रपतीच का ध्वजारोहण करतात? याच बद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Independence day)
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनामध्ये आहे फरक
२६ जानेवारीला स्वातंत्र्य दिन या कारणास्तव साजरा केला जातो की, या दिवशी १९५० मध्ये आपले संविधान लागू झाले होते. तर १५ ऑगस्टला देश गुलामगिरीतून मुक्त झाला होता. त्यामुळेच स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. खास गोष्ट अशी १५ ऑगस्टला ध्वजारोहणासाठी झेंडा खाली बांधून रशीच्या मदतीने वरती नेण्यात येतो. त्यानंतर तो फडकवला जातो. असे १५ ऑगस्ट १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याच्या सन्मानार्थ केले जाते. तर प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वरतीच बांधला जातो आणि उघडून फडकवला जातो.
स्वातंत्र्य दिनानिमित्त पीएमच का करतात ध्वजारोहण
स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. खरंतर १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. त्यावेळी देशाचे संविधान लागू झाले नव्हते. ना तेव्हा राष्ट्रपतींना त्यांचा पदभार दिला गेला होता. त्यामुळे पहिल्यांदा तिरंगा झेंडा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फडकवला होता. तेव्हा पासून ही परंपरा चालत आली आहे.
तर प्रजासत्ताक दिन हा संविधान लागू झाल्याच्या कारणास्तव साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी राष्ट्रपती झेंडा फडकवतात. कारण ते देशाचे संविधानिक प्रमुख आहेत. (Independence day)
स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण लाल किल्ल्यावर केले जाते. येथून पंतप्रधान देशाच्या जनतेला संबोधित करतात. मात्र प्रजासत्ताक दिनाचा सोहळा हा कर्तव्य पथावर पार पाडला जातो. त्यावेळी भव्य परेड सुद्धा निघते.
हेही वाचा- लोकमान्य टिळकांवर लागला होता देशद्रोहाचा आरोप…
भारतात २०२३ मध्ये देशाचा ७६ की ७७ वा स्वातंत्र्य दिन?
लोक अशी चर्चा करत आहेत की, नक्की स्वातंत्र्य दिनाचे यंदा कितवे वर्ष आहे. खरंतर या दिवसाची गणना १५ ऑगस्ट १९४७ पासून करावी.ज्यावेळी भारत स्वतंत्र राष्ट्र झाला, किंवा एक वर्षानंतर, जेव्हा त्याने आपला पहिला वर्धापन दिन साजरा केला. तेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मोजल्यास ७७ वे वर्ष असे येते. मात्र जर १५ ऑगस्ट १९४८ पासून मोजल्यास ७६ वा स्वातंत्र्य दिन असे येते.
खरंतर PIB च्या मते, गेल्या वर्षी १५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. आपल्या सरकारद्वारे वापरल्या जाणाऱ्या प्रणालीनुसार हा देशाचा ७७ वा स्वातंत्र्य दिन असणार आहे.