पाकिस्तानात एक हिंदू मंदिर आहे ते पाच हजार वर्षांपूर्वीचे आहे. भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर महाभारताच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. कटासराज मंदिर पाकिस्तानातील चकवाल जिल्ह्यापासून जवळजवळ ४० किमी दूर आहे. या परिसरात सात किंवा त्यापेक्षा अधिक मंदिर आहेत. त्याला सतग्रह असे म्हटले जाते. या मंदिराचा इतिहास शंकराचे अश्रू आणि महाभारतातील पांडवांच्या वनवासासंदर्भातील आहे. (Lord shiva temple)
कटासराज मंदिर जहभरातील हिंदूंसाठी फार महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. असे मानले जाते की, ज्या तलावाच्या चहूबाजूंना कटास मंदिर बनवण्यात आले आहे ते भगवान शंकरांच्या अश्रूंनी भरले आहे. असे ही म्हणतात की, भगवान शंकर आपली पत्नी सतीसोबत येथे रहायचे. मात्र तिच्या मृत्यूनंतर ते फार रडले होते. त्यामुळेच त्यांच्या अश्रूंनी दोन तलावाची निर्मिती झाली.एक म्हणजे कटारसराजमध्ये तर दुसरे राजस्थानच्या पुष्करमध्ये. मंदिराच्या येथे असलेल्या या कुंडाला कटाक्ष कुंड असे सुद्धा म्हटले जाते. तलाव आणि मंदिराचे नाव सुद्धा अशाच शब्दापासून घेतला गेला आहे, जो त्यांचे दु:ख व्यक्त करतो. कटासचा अर्थ डोळ्यांमध्ये अश्रू असा होतो.
अन्य एका कथेनुसार, कटासराज तेच ठिकाण आहे जेथे पांडवांनी आपल्या वनवासादरम्यान तेथे राहिले होते. वनांमध्ये भटकताना जेव्हा त्यांना तहान लागली तेव्हा ते त्यापैकी एका कटाक्ष कुंडाजवळ पाणी पिण्यासाठी आले होते. त्यावेळी या कुंडावर यक्षचा अधिकार होता. त्याने पाणी घेण्यासाठी आलेल्या पांडवांना असा प्रश्न केला की, उत्तर दिले तरच पाणी मिळेल. उत्तर न दिल्याने यक्षने त्यांना बेशुद्द केले. अखेर युधिष्ठिर आले आणि त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा परिचय देत सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य दिली. यक्ष ऐवढे प्रसन्न झाले की, त्यांनी पांडवांना शुद्धित आणत त्यांना पाणी पिण्याची परवानगी दिली.
तसेच बौद्ध शासन आणि हिंदू शाही वंशादरम्यान जवळजवळ ९०० वर्षांपूर्वी बौद्ध स्तूप, रजवाडे आणि मंदिरांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश मंदिर ही शंकराला समर्पित आहेत. तर काही मंदिर ही हनुमान आणि रामाला समर्पित आहेत. परिसरात एक प्राचीन गुरुद्वाराचे अवशेष सु्द्धा आहेत. जेथे गुरु नानक यांनी ९१ व्या शतकात जगभराच्या प्रवासादरम्यान येथे राहिले होते. (Lord shiva temple)
हेही वाचा- श्रावणात शंकरांच्या ‘या’ मंदिरांना नक्की भेट द्या
येथील मंदिराची स्थापत्य कला कश्मीरी आहे. या मंदिराचा शिखर टोकदार आहे. मंदिर चौकोनी आकाराचे आहे, त्यात रामचंद्रजींचे मंदिर सर्वात मोठे आहे. सुंदर कोरीव कामांसोबतच येथील मंदिरांच्या भिंतींवर भित्तिचित्रेही पाहायला मिळतील.