Home » कमी खर्चात प्री-वेडिंट फोटोशूट करायचे असेल तर परफेक्ट आहेत भारतातील ‘ही’ ठिकाणं

कमी खर्चात प्री-वेडिंट फोटोशूट करायचे असेल तर परफेक्ट आहेत भारतातील ‘ही’ ठिकाणं

by Team Gajawaja
0 comment
Pre-wedding destination
Share

लग्न हा कोणत्याही कपलसाठी खास क्षण असतो. त्यामुळे असे क्षण नेहमीच लक्षात रहावे आणि त्याच आठवणीत म्हणून आजकाल बहुतांश कपल्स लग्नापूर्वी आपले फोटो शूट करतात. त्यालाच प्री-वेडिंग असे आपण बोलतो. या फोटोशूटसाठी विविध ठिकाणी पाहतो आणि आवडेल त्या ठिकाणी फोटोशूट केले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये प्री-वेडिंग फोटोशूटचे वेड ऐवढे वाढले आहे की, त्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन मिळावे असे वाटते. परंतु त्याचसोबत खिशाला परवडणाऱ्या बजेटकडे ही लक्ष द्यावे लागते. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा प्री-वेडिंग शूट कमी खर्चात करायचे असेल तर पुढील काही ठिकाणांचा जरुर विचार करा.(Pre-wedding destination)

-जोधपूर
जर तुम्हाला रॉयल पद्धतीने राजा-महाराजांसारखे आपले प्री-वेडिंग फोटोशूट करायचे असेल तर राजस्थान मधील जोधपूर तुमच्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे. येथील काही किल्ले हे प्री-वेडिंगच्या शूटसाठी उत्तम आहेत. येथील उम्मेद भवन पॅलेसचा विचार प्री-वेडिंग फोटोशूटसाठी करु शकता.

-ताजमहल
प्री-वेडिंग फोटोशूटसाठी ताजमहल हा उत्तम ऑप्शन ठरु शकतो. कारण ताजमहल हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक असल्याचे आणि प्रेमाचे प्रतीक ही मानले जाते. येथे फोटो शूट करण्यासाठी तुम्हाला हिरवेगार गार्डन ही वापरता येते.

-हुमांयूचा किल्ला, दिल्ली
दिल्लीत अशी बहुतांश ठिकाण आहेत जी प्री-वेडिंग फोटोशूटसाठी परफेक्ट मानली जाता. हुमायूचा किल्ला सुद्धा त्यापैकीच एक आहे. हुमांयू किल्ल्याचे आर्किटेक्ट डिझाइन हे फार सुंदर आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की, तो तुमच्या बजेट मध्ये सुद्धा आहे.

-लवासा, महाराष्ट्र
लवासा एक मानवनिर्मित हिल स्टेशन आहे. येथे तुम्हाला इटालियन वाइब्स येतात. या ठिकाणची सौंदर्यता पाहून तुम्ही त्याचा मोहात पडाल. त्यामुळे जर तुम्ही प्री-वेडिंगचा विचार करत असाल तर या ठिकाणचा विचार जरुर करा.

-अल्लेप्पी, केरळ
अल्लेप्पी आपल्या बॅकवॉटर बोटिंगसह सुंदर अशा समुद्रकिनाऱ्यामुळे खुप प्रसिद्ध आहे. हे ठिकाण तुमच्या प्री-वेडिंग शूटसाठी उत्तम ऑप्शन ठरु शकते. या ठिकाणी नारळाची उंचच उंच झाडं असल्याने स्वर्गात आल्यासारखे वाटते.

-लक्ष्मण झुला, ऋषिकेश
जर तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत अत्यंक युनिक ठिकाणी प्री-वेडिंग फोटोशूट करायचे असेल तर ऋषिकेश तुमच्यासाठी परफेक्ट लोकेशन आहे. येथे उंचच उंच पर्वत, स्वच्छ आणि निळेशार पाणी, सफेद वाळू अशा कॉम्बिनेशनमुळे तुम्ही त्या निर्सगाच्या मोहात पडता.येथे फोटोशूट करण्यासाठी फार खर्च करावा लागत नाही. (Pre-wedding destination)

हे देखील वाचा- लिव्ह-इन-रिलेशनशिप की लग्न? तुमच्या एका निर्णयाने बदलेल आयुष्य

-रुशिकोंडा बीच, विशाखापट्टनम
विशाखापट्टनम स्थित रुशिकोंडा दरम्यान, आपल्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे सुद्धा प्री-वेडिंग फोटोशूट सुंदर होऊ शकते. या लोकेशनची सर्वाधिक खास गोष्टी अशी की, येथे गर्दी फार कमी असते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.