ओशनसॅट-३ सह ८ नॅनो सॅटेलाइट्स सुद्धा लॉन्च करण्यात आले. त्यामधे भुटानसाठी एक खास रिमोट सेंसिंग सॅटेलाइटचा समावेश आहे. याचे नाव भूटानसॅट असे दिले गेले आहे. तर भारतीय आंतराळ अनुसंधान संस्था म्हणजेच इस्रो कडून आणखी एक प्रक्षेपण करण्यात आले आहे. श्रीहरिकोटाचे सतीश धवन स्पेस सेंटर येथून ओशनसॅट-३ सॅटेलाइट लॉन्च करण्यात आले. PSLV-C54 रॉकेटलाच येथून लॉन्च केले. या लॉन्च नंतर इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी असे सांगितले की, पीएसएलवी-सी५४ ने ओशनसॅट-३ ला यशस्वीपणे त्याच्या ठरवलेल्या कक्षेत स्थापन करण्यात आले आहे. या सॅटेलाइट्सच्या प्रकरणी इस्रोला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. यापूर्वी इस्रोने असे काही मोठे आणि महत्वपूर्म सॅटेलाइट्स आंतराळात पाठवले आहेत. तर जाणून घेऊयात ओशनसॅट-३ सॅटेलाइटच्या लॉन्चिंग संदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी. (ISRO PSLV C54 Mission)
-श्रीहरिकोटा येथून सतीश धवन स्पेस सेंटर येथून या रॉकेटला लॉन्च केले गेले. त्यानंतर जवळजवळ ११ वाजेपर्यंत त्याने यशस्वीपणे सॅटेलाइटच्या त्या कक्षेत स्थापन करण्याचे काम केले गेले. या संपूर्ण प्रक्रियेत जवळजवळ ५६ मिनिटांचा कालावधी लागला.
-इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी असे सांगितले की, पीएसएलवी-सी ५४ च्या लॉन्चिंगच्या १७ मिनिटांनतर कक्षेत पोहचल्यांतर ओशसॅट यशस्वीपणे रॉकेट वेगळे झाले आणि त्या कक्षेत स्थापन करण्यात आले.
-ओशनसॅट-३ सॅटेलाइटला ओशनसेट-२ खराब झाल्यानंतर लॉन्च केले गेले. जे १००९ मध्ये लॉन्च करण्यात आले होते. म्हणजेच हे नवे सॅटेलाइट आता जुन्याची जागा घेणार आणि काही प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहे.
-ओशनसेट-३ सॅटेलाइट बद्दल बोलायचे झाल्यास त्याचे काम समुद्राच्या सपाटीचे तापमान आणि त्यासंदर्भातील विविध माहिती एकत्रित करणे आहे. यामुळे प्रदुषण आणि हानिकारक तत्वांचा उलगडा होणार आहे. या सॅटेलाइटचा वजन जवळजवळ १ हजार किलो आहे.
-ओशनसॅट-३ सह ८ नॅनो सॅटेलाइट्स ही लॉन्च केले गेले आहे. त्याला भूटानसॅट असे नाव दिले गेले आहे. म्हणजेच ते भारत आणि भूटानचे सॅटेलाइट आहे. (ISRO PSLV C54 Mission)
-भूटानच्या या नॅनो सॅटेलाइटमध्ये रिमोट सेंसिंग कॅमेरा लावण्यात आले आहे. या बद्दल भारताने भूटानला तंत्रज्ञान दिले आहे. या नॅनो सॅटेलाइटचे काम काही प्रकारच्या जमिनीची माहिती देणे आहे. रेल्वे ट्रॅक, पुल आणि अन्य बांधकामासंदर्भात याची मदत घेतली जाईल.
४४.४ मीटर लांब PSLV-C54 रॉकेटमध्ये खासगी कंपनीचे सॅटेलाइट लॉन्च केले गेले आहे. यामध्ये बंगळुरु आधारित कंपनी पिक्सलचा आनंद सॅटेलाइट लॉन्च केला आहे. या व्यतिरिक्त अन्य नॅनो सॅटेलाइट्स सुद्धा विविध स्पेस कंपन्यांनी तयार केले आहेत.
हे देखील वाचा- आर्टिफिशियल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनावरांशी बोलू शकणार व्यक्ती
-या मिशनला यंदाच्या वर्षातले इस्रोचे अखेरचे मिशन असल्याचे सांगितले गेले आहे. इस्रोचे अध्यक्ष एक सोमनाथ यांनी याच्या लॉन्चिंग संदर्भात आनंद व्यक्त केला आहे.