भारतात ब्लॅड फ्रायडे सेलला (Black Friday Sale) सुरुवात झाली आहे. अशातच काही ब्रँन्ड्स कडून आपल्या कोणत्या प्रोडक्ट्सवर सूट दिली जातेय याची लिस्ट समोर आली. या सेलमध्ये इलेक्ट्रिक्स, होम केयर डिवाइस, कपडे आणि अन्य प्रोडक्ट्सवर सुद्धा सूट मिळणार आहे. ब्लॅक फ्रायडे सेल यापूर्वी भारतात उपलब्ध नव्हता. याची सुरुवात अमेरिकेत झाली. दरम्यान, यंदा हा भारतात उपलब्ध करुन दिला गेला आहे. ब्लॅक फ्रायडे सेल मध्ये काही ई-कॉमर्स वेबसाइट्सचा समावेश आहे. दरम्यान, ब्लॅक फ्रायडे संयुक्त राज्य अमेरिकेद्वारे थँक्सगिविंग साजरा केल्यानंतर साजरा होतो. पण जगभरात सर्व लोक ब्लॅक फ्रायडे साजरा करतात.
या दिवशी लोक विविध प्रोडक्ट्सवर उत्तम डिस्काउंट मिळेल अशी अपेक्षा करतात . सर्वसामान्यपणे ब्लॅक फ्रायडे निमित्त स्टोर लवकर उघडली जातात. कधी कधी रात्री किंवा थँक्सगिविंगच्या वेळी सुद्धा. मात्र तुम्हाला माहिती आहे का. या दिवसाला ब्लॅक फ्रायडे असे का म्हटले जाते?
ब्लॅक फ्रायडे म्हणजे काय?
ब्लॅक फ्रायडे सेल युएसए मध्ये थँक्सगिविंग नंतर येतो. जो तेथील स्थानिक लोकांना आठवण करुन देतो की, फेस्टिव्ह सीजनची सुरुवात होत आहे आणि तुम्ही ख्रिसमससाठी गिफ्ट खरेदी करु शकता. हा सेल युजर्सला अशा प्रोडक्ट्सवर मिळतो जे वेगाने विक्री केले जातात. सूट खासकरुन इलेक्ट्रॉनिक्स सामानवर मिळते.
ब्लॅक फ्रायडे सेलचा इतिहास आणि महत्व
ब्लॅक फ्रायडे नावातच सर्वकाही आले. काही लोकांचे असे मानणे आहे की, ब्लॅक फ्रायडेचे नाव अशा कारणास्तव पडले कारण रिटेल दुकानदारांना खुप सूट मिळते आणि त्यामुळे त्यांचे नुकसान ही होणे थांबते. या व्यतिरिक्त लोकांचे असे ही मानणे आहे की, ब्लॅक फ्रायडे याला त्याचे नाव फिलाडेल्फिया पोलिसांकडू मिळाले. (Black Friday Sale)
हे देखील वाचा- थँक्सगिव्हिंग डे का आणि कसा साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास
दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, ब्लॅक फ्रायडेचा शॉपिंग संदर्भात कोणताही संबंध नाही. १९५० च्या दशकात फिलाडेल्फियात पोलिसांनी थँक्सगिविंनंतरच्या दिवसाची अराजकतेचे वर्णन करण्यासाठी ब्लॅक फ्रायडे या शब्दाचा वापर केला होता. त्यावेळी शेकडो पर्यटक फुटबॉल खेळासाठी शहरात एकत्रित आले होते आणि पोलिसांसाठी ती स्थिती अतिशय त्रासदायक झाली होती.
तर ब्लॅक फ्रायडे सेल सुरु झाल्यानंतर आता भारतातील अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, विजय सेल्स आमि क्रोमा सारख्या बड्या कंपन्यांकडून खरेदीवर उत्तम डिल्स दिले जातात.