दक्षिण कोरियाची (South Korea) राजधानी सियोलमध्ये हॅलोविन फेस्टिवल सेलिब्रेशन दरम्यान एक मोठी दुर्घटना झाली आहे. या ठिकाणी हॅलोविन २०२२ फेस्टिवल साजरा करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. याचा उत्साह साजरा करण्याऐवजी तेथे मत्यू तांडव झाला. या गर्दीमुळे खुप माणसांची चेंगराचेंगरी झाली. यामधून जी लोक बाहेर पडली त्यांना श्वास घेणे सुद्धा मुश्किल होत होते. सियोल मधील इटावन मध्ये फेसम नाइट स्पॉटवर ही लोक बहुसंख्येने हॅलोविन साजरा करण्यासाठी एकत्रित आले होते. हा सण कोविडच्या नंतर ऐवढ्या जल्लोषात साजरा करणार असल्याने ऐवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती.
तुफान गर्दी झाल्याने रस्ता ब्लॉक झाला होता आणि नुसती माणसे एकमेकांना ढकलत पुढेपाठी जात होती. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. यामध्ये महिलांना आणि मुलांना सांभाळणे मुश्किल झाले होते. आणखी थोड्यावेळाने मोठमोठ्याने गर्दीतून आवाज येण्यास सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने आलेल्या लोक एकमेकांना चिरडत असल्याचे दिसून आले. यामुळेच सियोलमध्ये गर्दीच्या कारणास्तव शंभरहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला.
जशी ही बातम राष्ट्रपती सुक योल यांच्यापर्यंत पोहचली तेव्हा त्यांनी तातडीने रेस्क्यू टीम, फायर फाइटर्स यांना कामावर लावले. मात्र जेव्हा रुग्णवाहिका आणि अन्य वैद्यकिय कर्मचारी येथे पोहचले तो पर्यंत शंभरहून अधिक जणांचा बळी गेला होता. राष्ट्रपतींनी याबद्दल राष्ट्रीय शोकची घोषणा केली. रुग्णालयात काही रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. (South Korea)
हे देखील वाचा- अफगाणिस्तानात जगणं झालंय मुश्किल, १० पैकी ९ लोकांवर उपासमारीची वेळ
कार्डियक अरेस्टमुळे झाला मृत्यू
सियोमध्ये झालेल्या या अपघातातील मृत्यू हे गर्दीत श्वास कोंडला गेल्याने कार्डियक अरेस्ट आल्याचा संशय व्यक्त केला जात आहेय मेडिकल स्टाफकडून सीपीआर दिला जात आहे. साउथ कोरियाच्या मीडियानुसार फेस्टिव्हलमध्ये मरणारे जवळजवळ ५० लोक म्हणजेच एक तृतीयाश लोकांचा मृत्यू हा कार्डियक अरेस्टमुळे झाला.
हॅलोविन का साजरा केला जातो?
हॅलोविनचे सेलिब्रेशन हे मूळ रुपात इंग्लड आणि आर्यलँन्ड मधील आहे. १९ व्या दशकात या प्रथेला सुरुवात झाली आणि नंतर जगाच्या विविध ठिकाणी जसे आयरिश लोक विस्तारली गेली तशी याचे सेलिब्रेशन ही करण्यास सुरुवात झाली. तर युरोपीन देशात सॉल्टिक जातीच्या लोकांची अशी धारणा आहे की, हॅलोवीन दरम्यान मृत व्यक्तींचे आत्मे त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी येतात. तर हॅलोविन सेलिब्रेशन मध्ये काळा आणि नारंगी रंग प्रामुख्याने वापरला जातो. नारंगी रंग हा शक्तीचे प्रतीक मानला जातो.