आपल्याकडे जमिनीवरुन परिवारामध्ये वाद होताना दिसून येतात. अशी प्रकरणे कोर्टापर्यंत पोहचतात आणि दीर्घकाळ त्या जमिनीच्या वादाप्रकरणी सुनावणी होत राहतो. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, की माकडांच्या नावावर जमीन करतं? पण हे खरंय. खरंतर महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावात चक्क ३२ एकर जमीन ही माकडांच्या नावावर करण्यात आली आहे. येथे माकडांना दिल्या जाणाऱ्या खास आदरामुळे असे करण्यात आले आहे. तर याचबद्दल जाणून घेऊयात अधिक. (Land on monkey name)
माकडांना दिला जातो आदर
पीटीआयच्या एका रिपोर्ट्सनुसार, उस्मानाबाद मधील उपळा गावातील लोक माकडांचा खास आदर करतात. ते एखाद्याच्या दरवाज्यावर आले तर त्यांना अन्न दिले जाते. कधी कधी तर लग्न सोहळा सुरु करण्यापूर्वी सुद्धा माकडांना सन्मान दिला जातो. उपळा ग्राम पंचायतीमधील जमिनी प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या मते, ३२ एकर जमीन ही गावात राहणाऱ्या सर्व माकडांच्या नावे करण्यात आली आहे. येथील सरपंचांचे असे म्हणणे आहे की, कागदपत्रावर तर जमीन ही माकडांच्या नावावर आहे असे लिहिले तर आहे. पण प्राण्यांसाठी अशा पद्धतीचा कोणता नियम किंवा कायदा आहे की नाही ते माहिती नाहीच.
कमी होतेय माकडांची संख्या
या गावात माकडांसंदर्भात काही नियम सुद्धा काढण्यात आले होते. मात्र आता चिंतेचा विषय असा आहे की, गावात आता फक्त १०० माकडंच आहेत. गेल्या काही वर्षात त्यांची संख्या फार कमी होत चालली आहे, कारण जनावरं ही एका ठिकाणी अधिक काळ राहत नाहीत. वन विभागाने जमीवर वृक्षरोपण केले आणि भूखंडावर एक घर होते ते सुद्धा पाडले.
हे देखील वाचा- अबब…’या’ देशात 25 माळ्याच्या इमारतीएवढे झाड
काय सांगतो कायदा?
भारतीय कायद्यानुसार, कोणत्याही जनावराच्या नावावर एखादी संस्था किंवा जमीन नावे करु शकत नाहीत. असे अशासाठी कारण, एका पाळीव जनावराला व्यक्तिच्या रुपात मान्यता दिली जात नाही. जसे की, परंपरांगत जमीन ही पुढील पिढीला दिली जाते तसे जनावरांच्या बाबतीत नसते. भारतात पाळीव प्राण्याला व्यक्तिगत संपत्ती मानली जाते आणि संपत्तीचा एक तुकडा हा त्याला दिला जाऊ शकत नाही. (Land on monkey name)
याआधी सुद्धा भेट दिली जायची
रिपोर्ट्सनुसार, सरपंचांचे असे म्हणणे आहे की, जेव्हा कधी गावात लग्न व्हायचे तेव्हा प्रथम माकडांना भेट दिली जायची. त्यानंतरच सोहळा सुरु व्हायचा. मात्र आता या प्रथेचे कोणीही पालन करत नाही. त्यांनी असे ही म्हटले की, जेव्हा माकडं घराच्या दारात येतात तेव्हा त्यांना खाणं दिले जाते. कोणीही त्यांना खाण्यासाठी नाकारत नाही.