Home » सिम कार्डच्या किनाऱ्याला कट असण्यामागील ‘हे’ आहे कारण

सिम कार्डच्या किनाऱ्याला कट असण्यामागील ‘हे’ आहे कारण

by Team Gajawaja
0 comment
SIM Card
Share

सध्या बदलत्या काळासह तंत्रज्ञानही वेगाने पुढे जात आहे. मोबाईल ते सिम कार्डच्या (SIM Card) आकारामध्ये सुद्धा बदल झाले आहेत. यामुळे आता युजर्सला उत्तम सुविधा मिळतात. मोबाईल सिम कार्ड बद्दल बोलायचे झाल्यास याआधी सामान्य सिम हे आयताकृती असायचे. मात्र त्यानंतर सिम कार्डच्या आकारात बदल झाला आणि तो धक्कादायक होता. कारण सामान्य सिम कार्डला एका बाजूने कापण्यात आलेले होते. ऐवढेच नव्हे तर सिम कार्ड जेथे टाकले जाते त्यानुसार त्याचा स्लॉट सुद्धा डिझाइन करण्यात आला. धक्कादायक बाब अशी की, बहुतांश लोकांना माहिती नव्हते की सिम कार्डमध्ये बदल का करण्यात आला आहे. त्याच्या एका बाजूला का कापण्यात आले होते आणि मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी असे केल्याने ग्राहकांवर त्याचा काय परिणाम झाला त्याबद्दलच अधिक.

या कारणामुळे सिम कार्ड एका बाजूने कापले गेले
सुरुवातीला असे फोन यायचे ज्यामध्ये सिम टाकण्याची गरज नव्हती. त्यांना पोस्टपेड फोन असे म्हटले जायचे. त्यानंतर प्रीपेड फोन वापरण्यास सुरुवात झाली आणि कंपन्यांनी सिम कार्ड बनवण्यास सुरुवात केली. सिम कार्डचे चारही कोपरे एकसमान होते. त्यामुळे लोकांना ते स्लॉटमध्ये लावताना पटकन कळायचे नाही की ते सरळ आहे की उलटे. व्यवस्थित न लागल्यास ते वारंवार लावण्याचा प्रयत्न करायचे.

SIM Card
SIM Card

बहुतांशजण सिम उलटी लावल्याच्या कारणास्तव ते अडकायचे किंवा चिप खराब व्हायची. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कंपनीने सिम कार्डच्या (SIM Card) डिझाइनमध्ये बदल केले. त्यानंतर असे सिम कार्ड बनवले की, जे एका बाजूने कापले गेले होते.

हे देखील वाचा- विमानाचे तिकिट बुकिंग करताना तुम्ही सुद्धा ‘या’ चुका करता, तर हे आधी वाचा

सिम कार्डच्या बदलावामुळे फार मोठा फरक पडला
कंपन्यांनी सिम कार्ड एका बाजूने कापल्याने ते लोकांना विक्रीसाठी उपलब्ध करुन देऊ लागले. सिमच्या या डिझाइनच्या बदलावामुळे मोबाईल कंपन्यांना सुद्धा त्यांच्या सिम कार्डच्या स्लॉटच्या डिझाइनमध्ये बदल करावा लागला. त्यानंतर बदलले सिम कार्ड हे लावणे सोप्पे झाले. अशा प्रकारे सिम कार्ड खराब होणे किंवा त्याची चिप खराब होण्याची प्रकरणे बंद झाली.

कर्ट मार्कच्या कारणामुळे युजर्सला ते सिम स्लॉटमध्ये लावण्याची पद्धत सोप्पी झाली. सिम कार्डचा नवा आकार जगभरात ऐवढा पॉप्युलर झाला की त्याच प्रकारचे सर्व कंपन्यांनी बनवण्यास सुरुवात झाली. ऐवढेच नव्हे तर त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आयएसओकडून सुद्धा त्याला मान्यता मिळाली. सध्या सिम कार्ड बनवणाारी फ्रांन्सची कंपनी आयडिमिया जगातील सर्वाधिक मोठी कंपनी आहे. आता आयडिमिया भारताला जगातील सिम कार्ड हब बनवण्याची योजना बनवत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयडिमिया कंपनी भारतात सिम कार्डच्या प्रोडक्शनच्या विस्तारासंदर्भात तयारी करत आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.