जर तुम्ही एखाद्या बँक किंवा इंन्शुरन्स कंपनीत गुंतवणूक करत असाल तर काही कंपन्या तुमच्याकडे आर्थिक कामांसाठी कॅन्सल चेक मागितला जातो. भले आपण सध्या डिजिटल पद्धतीने व्यवहार करतो तरीही कॅन्सल चेक (Cancelled Check) मागितलाच जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, बँका ते इंन्शुरन्स कंपनी तुमच्याकडे कॅन्सल चेक का मागतात? याचा वापर फक्त तुमचे अकाउंट वेरिफाय करण्यासाठी केला जातो. जेव्हा कोणताही कॅन्सल चेक दिला जातो तेव्हा दोन समांतर लाइनच्या मध्ये Cancelled असे लिहिले जाते. कारण या चेकचा कोणीही चुकीचा वापर करु नये.
कॅन्सल चेकवर स्वाक्षरी करण्याची गरज नाही
जेव्हा तुम्ही एखाद्याला कॅन्सल चेक देता तेव्हा त्यावर स्वाक्षरी करण्याची काही गरज नसते. यावर तुम्ही फक्त कॅन्सल असे लिहायचे असते. या व्यतिरिक्त चेकवर क्रॉस मार्कसुद्धा केले जाऊ शकते. अशा प्रकारचा चेक फक्त तुमचे खाते वेरिफाय करतो. जर तु्म्ही एखाद्या संस्थेला बँकेचा कॅन्सल चेक दिला असेल तर त्याचा अर्थ असा होतो की, तुमचे त्या बँकेत खाते आहे. चेकवर नाव सुद्धा असू शकते आणि असू ही शकत नाही. तुमच्या खात्याचा क्रमांक लिहिलेला असतो आणि त्यावर कोणत्या शाखेत अकाउंट आहे त्याचा आयएफसी कोड ही लिहिलेला असतो. दरम्यान, कॅन्सल चेकसाठी तु्म्हाला नेहमीच काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईचा वापर केला पाहिजे. मात्र कोणत्याही दुसऱ्या रंगाच्या शाईचा वापर करु नये. अन्यथा तुमचा चेक अमान्य केला जातो.
कॅन्सल चेकची कधी पडते गरज
जेव्हा तुम्हा आर्थिक संबंधित काही काम करतात तेव्हा तुमच्याकडे कॅन्सल चेक (Cancelled Check) मागितला जातो. जेव्हा तुम्ही कारसाठी कर्ज, पर्सनल लोन, होम लोन घेचा तेव्हा कर्जदात्याकडून कॅन्सल चेक मागितला जातो. अशातच तुमचे बँक खाते वेरिफाय केले जाते. जर प्रोविडेंट फंडातून ऑनलाईन पैसे काढताना सुद्धा कॅन्सल चेक मागितली जाते. जेव्हा तुम्ही म्युचअल फंडात गुंतवणूक करतात तेव्हा सुद्धा कंपनी कॅन्सल चेक मागतात. या व्यतिरिक्त इंन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना ही याची गरज भासते.
हे देखील वाचा- विमानाचे तिकिट बुकिंग करताना तुम्ही सुद्धा ‘या’ चुका करता, तर हे आधी वाचा
कॅन्सल चेक देताना काळजी घ्या
जेव्हा तुम्ही विचार करता कॅन्सल चेकचा काहीही उपयोग होत नाही. मात्र असा विचार करुन तो देणे चुकीचे ठरेल. लक्षात असू द्या तुमच्या कॅन्सल चेकवर तुमचा बँक खाते क्रमांक, आयएफसी क्रमांक अशी महत्वाची माहिती दिलेली असते. याचा चुकीच्या पद्धतीने वापर करुन तुमच्या खात्यातून पैसे काढले ही जाऊ शकतात. अशातच स्वाक्षरी केलेला कॅन्सल चेक ही कधीच कोणाला देऊ नका.