दिग्गज टेनिसपटू रोजर फेडरर याने टेनिसमधून निवृत्ती घेण्याची नुकतीच घोषणा केली. फेडररने या संदर्भात सोशल मीडियात एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली. स्विर्त्झलँन्ड मधील स्टार खेळाडूने असे म्हटले की, पुढील आठवड्यात तो लीवर कपमध्ये खेळताना अखेरचा दिसणार आहे. ४१ वर्षीय फेडररने आपल्या २४ वर्षाच्या टेनिसच्या करियरमध्ये काही बक्षिसं मिळवली आहेत. (Roger Federer Retires)
रोजर फेडरर बद्दल सांगायचे झाल्यास त्याने आपल्या टेनिसच्या करियर मध्ये अनेक बक्षिसं तर मिळवलीच पण २० ग्रँडस्लॅम बक्षिस मिळवले आहे. या दिग्गज खेळाडूने आपल्या अखेरच्या टूर्नामेंट जी २०२१ मध्ये विंबलडन झाली ती खेळली होती. त्यानंतर त्याने टेनिसच्या कोर्टात पाऊल ठेवले नव्हते. तसेच फेडरर याने ६ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, एकदा फ्रेंच ओपन, ८ वेळा विंबलडन आणि ५ वेळा युएस ओपनचे बक्षिस आपल्या नावावर केले आहे.
या व्यतिरिक्त त्याने आपले खरेचे ग्रँडस्लॅम हे बक्षिस २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या वेळी जिंकले होते. तर २० ग्रँडस्लॅम बक्षिस जिंकणारा तो पहिलाच पुरुष खेळाडू ठरला होता. आता हाच रेकॉर्ड स्पेन मधील राफेल नडाल याने तोडला आहे, नडालने सध्या एकूण २२ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. तर गेल्याच वर्षात रोजर फेडरर हा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला होता. त्याची एकूण कमाई ७१८ कोटी रुपये होती. परंतु यामध्ये एजेंटची फी आणि टॅक्सचा समावेश नाही.
रोजर फेडररने टेनिसमधून निवृत्ती घेत असल्याची पोस्ट शेअर करत असे म्हटले की, मी ४१ वर्षाचा आहे. मी २४ वर्षात १५०० हून अधिक सामने खेळलो आहे. आता मला हे पहायचे आहे की, माझ्या करियरचा अंत कधी होणार.(Roger Federer Retires)
हे देखील वाचा- कसा झाला कोल्हापूरच्या ऐश्वर्याचा विम्बल्डनपर्यंतचा प्रवास
रोजर फेडरर ३१० आठवड्यापर्यंत जगात पहिल्या क्रमांकावर होता. तर ८ वेळा विंबलडन ग्रँन्डस्लॅम जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर त्याने केले आहेत. मात्र आता नोडाल नंतर नोवाक जोकोविच याने फेडरर याचे रेकॉर्ड ब्रेक केल्याने तो आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर फेडरर याने वयाच्या २१ व्या वर्षात आपले पहिलेच ग्रँड स्लॅम बक्षिस जिंकले होते. त्याने विंबलडन ग्रँड स्लॅम आपल्या नावावर केला होता. फेडरर याची आई सुद्धा एक उत्तम टेनिसपटू होती.