दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारतीय खेळाडूंची तिसऱ्या दिवशीही चमकदार कामगिरी सुरू आहे. या स्पर्धेत आज बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावात जन्मलेला धावपटू अविनाश साबळेने ऐतिहासिक कामगिरी करत त्याने भारताला तिसरे सुवर्णपदक जिंकवून दिले. सध्या दक्षिण कोरियातील गुमी येथे आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ सुरू आहे.
राष्ट्रीय विक्रमधारक अविनाश साबळेने गुरुवारी आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. अविनाशने 8:20:92 सेकंदांसह यादीत अव्वल स्थानावर होता. यापूर्वी त्याने २०१९ मध्ये रौप्य पदक जिंकले होते आणि या स्पर्धेत हे त्याचे दुसरे पदक आहे. अविनाश साबळेच्या यशस्वी कामगिरीनंतर अविनाशच्या मांडवा गावात आनंदोत्सव पाहायला मिळाला. अविनाश ३६ वर्षांनंतर या स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. भारताने या स्पर्धेत शेवटचे सुवर्णपदक १९८९ मध्ये जिंकले होते, तेव्हा दिना रामने ही कामगिरी केली होती. १९७५ मध्ये, हरबहाल सिंग स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. (Avinash Sable)
दरम्यान अविनाश साबळेनंतर जपानच्या युतारो निनेने 8:24.41 सेकंदांसह रौप्यपदक जिंकले आहे. अंतिम फेरीच्या सुरुवातीला युतारो निने आघाडीवर होता, परंतु अविनाश साबळे याने त्याला मागे टाकून सुवर्णपदक कामगिरी केली. तर कतारच्या झकारिया एल्हलामीने 8:27.12 सेकंदांच्या वेळेसह कांस्यपदक जिंकले. दरम्यान, साबळेने यापूर्वी २०१९ मध्ये रौप्यपदक जिंकले होते. यासह आता त्याने या स्पर्धेत दुसरे पदक जिंकले आहे. (Marathi News)
दरम्यान ज्योती याराजीने देखील १०० मीटर अडथळा शर्यत फक्त १२.९६ सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ज्योतीचा मागील विक्रम १२.९९ सेकंदांचा होता. २६ व्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आतापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये १४ पदके जिंकली आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये देश दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ३ कांस्यपदके जिंकली आहेत. यापूर्वी २०२३ च्या हंगामातही भारताने ४x४०० मीटर मिश्र रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. (Top Stories)
मंगळवारी राष्ट्रीय विक्रमधारक गुलवीर सिंगने १०,००० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे हे पहिले सुवर्णपदक होते. पूजाने महिलांच्या १५०० मीटर शर्यतीत ४ मिनिटे १० सेकंद वेळेसह आणखी एक रौप्य पदक जिंकले. तर दिल्लीची लिली दास या शर्यतीत चौथ्या स्थानावर राहिली. चीनच्या ली चुनहुईने सुवर्णपदक जिंकले. (Social News / Updates)
अविनाशने एका मोठया वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात असलेल्या मांडवा या छोट्याश्या गावी १३ सप्टेंबर १९९४ रोजी अविनाशचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. तिघं भावंडांमध्ये अविनाश सर्वात मोठा होता. त्याच्या आईचे नाव वैशाली आणि वडिलांचे नाव मुकुंद साबळे असे असून, ते एक वीट भट्टी कामगार आहेत. असे असले तरी त्याच्या आई वडिलांनी कायम अविनाशच्या शिक्षणाला महत्त्व दिले. अविनाशने बालपणापासूनच गरिबी आणि संघर्ष अनुभवला. त्यामुळे त्याला खूप कमी वयातच गरिबीची जाणीव झाली. (Latest Marathi News)
अविनाशचे आईवडील सकाळी मुलं उठायच्या आधी लवकर उठून कामावर जायचे आणि रात्री उशिरा परत यायचे. आई वडिलांचे कशी बघत मोठ्या झालेल्या अविनाशने लहानपणीच या कष्टांचे चीज करण्याचे ठरवले. अविनाशने क्रीडा क्षेत्रात करियर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली. मात्र सुरुवातीला त्याला अपयश आल्यानंतर अविनाशने लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला. मात्र याच लष्कराने अविनाशला शर्यतीच्या ट्रॅकवर परत आणले. (Top Marathi Headlines)
अविनाशला अगदी लहानपणापासूच धावायची सवय होती. सुरुवातीला गरज म्हणून धावत असलेला अविनाश नंतर छंद म्हणून धावायला लागला. त्यामुळे सगळी कामं तो धावत करायला लागला. कधी कधी शाळेला उशीर व्हायचा म्हणून अविनाश शाळेत लवकर पोहोचण्यासाठी धावत जायचा. इतर मुलं पायी, सायकलवर जायचे पण अविनाशला मात्र धावायला आवडायचे. त्यामुळं तो सहा-सात किलोमीटर धावायचा. (Latest Marathi Headline)
अविनाशने मुलाखतीमध्ये सांगितले की, त्याच्या शाळेतल्या शिक्षकांनी त्याला खूप मदत केली. त्याचेकुलकर्णी सर, तावरे सर अविनाशला त्यांच्या गाडीवरून त्याला शाळेत घेऊन जायचे. अगदी कडेवर उचलून देखील त्याच्या सरांनी त्याला शाळेत नेल्याचे अविनाशने मुलाखतीमध्ये सांगितले. शाळेतल्या शिक्षकांच्याच सर्वात आधी त्याचे धावणं नजरेत आले. त्यांनी मोठ्या वर्गातल्या मुलाशी अविनाशची शर्यत लावली. त्यात तो जिंकला तेव्हा अविनाशने धावणे या क्रीडाप्रकारात लक्ष द्यावे म्हणून अविनाशच्या शिक्षकांनीही प्रयत्न केले. (International News)
============
हे देखील वाचा : Ramdas Marbade : पाणीपुरी विकणार्या रामदास मारबदेची उत्तुंग भरारी; इस्रोमध्ये तंत्रज्ञ पदावर निवड
============
अविनाश अभ्यासातही चांगलाच हुशार होता. शाळेत त्याचा कायम पहिला-दुसरा नंबर यायचा. त्यामुळे शिक्षकांचे अविनाशवर खास प्रेम होते. त्याची धावण्याची आवड आणि वेग पाहून शिक्षकांनीच अविनाशसाठी क्रीडा क्षेत्रात प्रयत्न करायला सुरुवात केली होती. शिक्षकांनी अविनाशला क्रीडा क्षेत्रात जाण्याचा सल्ला दिला आणि अविनाशनेही त्यादिशेने प्रयत्न केले. (Latest International News)
पुरुषांच्या 3 हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात पदक जिंकणारे खेळाडू
1975 – हरबैल सिंग (सुवर्णपदक)
1979 – गोपाल सिंग सैनी (कांस्यपदक)
1981 – गोपाल सिंग सैनी (रौप्यपदक)
1981 – अनोख सिंग (कांस्यपदक)
1983 – अनोख सिंग (कांस्यपदक)
1985 – शणमुगिन पिचैया (कांस्यपदक)
1989 – दीना राम (सुवर्णपदक)
2019 – अविनाश साबळे (कांस्यपदक)
2025 – अविनाश साबळे (सुवर्णपदक)