Home » IPL : धोनीच्या आऊट होण्यावर दिलेल्या एक्सप्रेशनमुळे रातोरात व्हायरल झालेली ‘मिस्ट्री गर्ल’ कोण?

IPL : धोनीच्या आऊट होण्यावर दिलेल्या एक्सप्रेशनमुळे रातोरात व्हायरल झालेली ‘मिस्ट्री गर्ल’ कोण?

by Jyotsna Kulkarni
0 comment
IPL
Share

आजच्या काळात सोशल मीडिया हे खूपच वेगवान आणि महत्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. या सोशल मीडियाला आज अनन्यसाधारण महत्व आहे. याच माध्यमामुळे अनेक सामान्य माणसं देखील सेलिब्रिटी झाले आणि त्यांना नेम, फेम, मनी मिळाले आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. याच सोशल मीडियाच्या काळात कोण, कधी, कुठे, कसे व्हायरल होईल हे कोणीच सांगू शकत नाही. (Social Media)

सोशल मीडियावर काही क्षणात एखादी गोष्ट जगाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहचते. त्यामुळेच या माध्यमाची पोहच त्याला अधिकच सशक्त आणि प्रभावी बनवते. आज याच सोशल मीडियामुळे अनेकांना रोजगार मिळाला, करियरच्या विविध संधी उपलब्ध झाल्या. आजवर सोशल मीडियावर आपण अनेक साधारण लोकांना व्हायरल होताना पाहिले आहे. आता सुद्धा अशीच एक अतिशय सामान्य मुलगी फक्त तिच्या एका एक्सप्रेशनमुळे रातोरात व्हायरल झाली आहे. (IPL News)

सध्या आयपीएल जोरदार गाजत आहे. प्रत्येक जणं आपापल्या टीमला सपोर्ट करताना दिसत आहे. या आयपीएलच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक क्रेझ पाहायला मिळते ती टीम इंडियाच्या माजी कॅप्टनची अर्थात महेंद्र सिंग धोनीची (Mahendra Singh Dhoni). धोनी जरी आता निवृत्त झाला असला तरी तो आयपीएल खेळत आहे. त्यामुळे त्याला खेळताना बघण्याची सुवर्णसंधी कोणालाच घालवायची नसते. (Marathi Top News)

म्हणूनच जेव्हा जेव्हा चेन्नई सुपरकिंग्सचे सामने असतात, तेव्हा खासकरून धोनीसाठी त्याचे फॅन्स मोठ्या प्रमाणावर स्टेडियममध्ये गर्दी करतात. नुकतीच चेन्नई विरुद्ध राजस्थान ही मॅच कमालीची रंगली. यंदाच्या आयपीएलच्या हंगामामध्ये चेन्नईने लगातार दोन सामने गमावल्यानंतर चेन्नईच्या फॅन्स टीमकडून आणि धोनीकडून या मॅचमध्ये मोठ्या चमत्काराची अपेक्षा होती, मात्र दुर्दैवाने असे काहीच घडले नाही. राजस्थानकडून चेन्नई पुन्हा पराभूत झाली. (Trending News)

जेव्हा सामन्यांमध्ये धोनी बॅटिंगसाठी क्रीझवर आला तेव्हा प्रेक्षकांमधून एकच जल्लोष ऐकायला मिळत होता. मात्र तो आऊट झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. जेव्हा धोनी आऊट झाला, तेव्हा प्रेक्षकांमध्ये असलेल्या एका मुलीचे एक्सप्रेशन कॅमेरामॅनने अचूक टिपले. तिने धोनी आऊट झाल्यानंतर दिलेले एक्सप्रेशन कमालीचे व्हायरल झाले आहे. तिच्या एक्सप्रेशनमुळे ही तरुणी एका रात्रीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नक्की ही ‘मिस्ट्री गर्ल‘ कोण आहे चला जाणून घेऊया.(Top News)

सध्या आपल्या एक्सप्रेशनमुळे तुफान व्हायरल होत असलेल्या तरुणीचं नाव आहे आर्याप्रिया भुयान (aryapriya bhuyan). आर्याप्रिया ही १९ वर्षांची असून, ती मूळची गुवाहाटी येथील आहे. एम.एस. धोनीची मोठी फॅन असलेली आर्याप्रिया खास त्याची मॅच आणि त्याची बॅटिंग पाहण्यासाठी गुवाहाटीवरून चेन्नईला आली होती. राजस्थान विरुद्ध चेन्नई या अटीतटीच्या सामन्यात जेव्हा धोनी आऊट झाला तेव्हा तिला खूपच त्रास झाला आणि त्यातून तिचे व्हायरल होणारे एक्सप्रेशन बाहेर आले.(aryapriya bhuyan News)

IPL

दरम्यान आर्याप्रियाने एका मोठ्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी धोनीची खूप मोठी फॅन आहे. त्यामुळे CSK ला सपोर्ट करण्यासाठी आणि धोनीची बॅटिंग बघण्यासाठी मी स्टेडियममध्ये आली होती. तो आऊट झाल्यानंतर नकळतपणे माझी ती प्रतिक्रिया निघाली आणि योगायोगाने कॅमेराने ती पकडली. पण माझी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होईल हे मला अजिबातच वाटले नव्हते. दुसऱ्या दिवशी माझे व्हिडीओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल झालेले पाहून मला एक सुखद आणि मोठा धक्काच बसला.”(Latest News)

========

हे देखील वाचा : Uluru : तुम्हाला माहित आहे का…? चमत्कारिक रंग बदलणाऱ्या डोंगराबद्दल

========

इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर आर्याप्रियाला याचा कमालीचा फायदा झाला आहे. तिचे आधी इन्स्टाग्रामवर १ हजार पेक्षा कमी फॉलोवर होते पण ती व्हायरल झाल्यानंतर काही तासांत तिचे फॉलोअर्स झपाट्याने वाढले. आता तिला तब्बल १ लाखांपेक्षा अधिक लोक फॉलो करत आहेत. आणि हा आकडा अजूनही वाढत आहे. आर्याप्रियाच्या इंस्टाग्राम बायोवरून समजते की तिला चहा आणि कविता यांची विशेष आवड आहे. (Social Media News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.