भारतात लवकरच मोबाईल फोनच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अॅन्ड कस्टम्स यांनी एक निविदा जाहीर केली आहे. या ऑर्डरमध्ये असे म्हटले आहे की, मोबाईल फोनच्या वापरासाठीचे इनपुट्सच्या आधारावर अधिक कस्टम ड्युटी वसूल केली जाणार आहे. अशातच आता कस्टम ड्युटीची किंमत वाढल्यास कंपन्यासुद्धा स्मार्टफोन बनवण्यासाठी लागणारा खर्च सुद्धा ग्राहकांकडून प्रोडक्ट्सच्या किंमतीत वाढ करुन वसूल करु शकतात. (Smartphone price hike)
किती वाढणार ड्युटी
अशी शक्यता आहे की, बॅक सपोर्ट फ्रेमसह स्मार्टफोनच्या डिस्प्ले असेंबलीच्या इम्पोर्ट वर बेसिक कस्टम ड्युटी १० टक्के वाढवली जाईल. जर एंटीना पिंस, पॉवर किज आणि अन्य एक्सेसरीजचा डिस्प्ले असेंबलीसह इम्पोर्ट केले जाते. तेव्हा कस्टम ड्युटी ५ टक्के असेल आणि अशा प्रकारे एकूण मिळून इम्पोर्ट ड्युटी १५ टक्के असेल. याच कारणास्तव मोबाईल फोन कंपन्यासुद्धा आपल्या मोबाईल सेट्सच्या किंमतीत १०-१५ टक्क्यांनी वाढ करु शकतात. सीबीआईसीने आपल्या निविदात असे म्हटले आहे की, जर डिस्प्ले असेंबलीसह फिडेट रुपात सिम ट्रे, एंन्टीना पिन, स्पीकर नेट, पॉवर की, स्लाइडर स्विच, बॅटरी कम्पार्टमेंट, फ्लेक्जीबल प्रिंटेड, सेंसर, स्पीकर, फिंगरप्रिंट सारख्या गोष्टी इम्पोर्ट करुन आणल्या जाता. तेव्हा संपूर्ण असेंबलीवर १५ टक्के बेसिक कस्टम ड्युटी लागू केली जाईल.
इंडस्ट्रीचे मतं काय आहे
इंडस्ट्रीचे असे म्हणणे आहे की, मोबाईल फोनच्या डिस्प्लेसह अटॅच्ड सर्व कम्पोनेंट्सला डिस्प्ले असेंबली मानले पाहिजे आणि त्यासाठी केवळ १० टक्के कस्टम ड्युटी लावली पाहिजे, सीबीआईसीचे असे म्हणणे आहे की, मोबाईल कंपन्या डिस्प्ले असेंबलीसह काही असे अन्य कंपोनेंट्सचा सुद्धा इम्पोर्ट करत आहेत, जे या कॅटेगरीत येत नाहीत. अशा प्रकारे कस्टम ड्युटीची चोरी होत आहे. डिस्प्ले असेंबली आणि त्याच्या आयटम संबंधित कोणताही घोळ होऊ नये म्हणून मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इंन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीने डिस्प्ले असेंबली संबंधित एक लिस्ट जारी केली आहे.(Smartphone price hike)
हे देखील वाचा- आपल्या मातृभाषेत Facebook आणि Instagram वापरण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
ड्युटीच्या लिस्टमध्ये कोणते कंपोनेंट सहभागी असतात
या लिस्टच्या नुसार सेल्यूलर मोबईल फोनचा डिस्प्ले असेंबलीच्या कम्पोनेंट्स आणि सबकम्पोनेंट्सचा समावेश करण्यात आला आहे. डिस्प्ले असेंबलीमध्ये टच पॅनल, कवर ग्लास, ब्राइटनेस एनहांसमेंट फिल्म, इंडीकेटर गाइड लाइट, रिफलेक्टर, एलईडी ब्लॅकलाइट, पोलाराइजर्स आणि फ्लाइबल प्रिंटेड सर्किटवर लावलेला एलसीडी ड्राइवरचा समावेश आहे. नुकत्याच जगभरात चिपच्या कमतरतेमुळे आणि सप्लाय चेनच्या संबंधित समस्यांमुळे रेडमी, ओप्पो, सॅमसंगसह प्रमुख मोबाईल फोन कंपन्यांनी आपल्या किंमती वाढवल्या. एका रिपोर्टनुसार मेनस्ट्रीम स्मार्टफोन्सच्या किंमतीतमध्ये जवळजवळ १५०० रुपयांची वाढ झाली आहे. किंमतीत वाढ झाल्याने भारतातील स्मार्टफोनच्या बाजावर त्याचा परिणाम होतो. रिसर्च कंपनी Counterpoint च्या एका रिपोर्ट नुसार २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जून दरम्यान भारतात स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये वर्षभराच्या आधारावर ९ टक्क्यांनी वाढ झाली तर तिमाहिच्या आधारावर ५ टक्के खाली पडून जवळजवळ ३.७ करोड युनिट्स होती, पहिल्या तिमाहित ३.८ कोटी युनिट्सच्या शिपमेंटमध्ये आल्या होत्या.