जगात फार कमी देश आहेत ज्यांनी आपल्या नागरिकांना आंतराळात पाठवले. याच लिस्टमध्ये अमेरिका आणि रशियातील लोकांची संख्य अधिक असून आता ते आंतराळ पर्यटन उद्योग म्हणून ओळखले जाते. एखाद्या देशाचा पहिला आंतराळवीर होणे ही सन्मानाची गोष्ट आहे. त्याचसोबत जगातील ही पहिलाच आंतराळवीर होणे सुद्धा फार मोठी मानाची कामगिरी आहे. रशियातील युरी गागारिन यांचे नाव यामध्ये पहिले आहे. ज्यांनी वयाच्या २७ व्या वर्षात आंतराळाचा प्रवास केला. २७ मार्च १९६८ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी गागारिन यांचा मृत्यू झाला. पण त्यांच्या मृत्यूचा खुलासा जवळजवळ ४५ वर्षांपर्यंत करण्यात आला नव्हता.(Yuri Gagarin Death Anniversary)
९ मार्च १९३४ रोजी युरी एलेक्सेयेविच गागारिन सोवित संघाच्या स्मोलेनेस्क ओब्लास्टच्या क्लुशिनो गावात जन्मले होते. ते डेयरी फार्मर वडिलांचे चौथ्या पुत्रांपैकी तिसरे होते. दुसऱ्या महायुद्धानंतर नाजींनी त्यांची शाळा जाळली. त्यामुळे त्यांच्या शाळेतील पहिल्याच वर्षी शिक्षण थांबले. गावावर पुन्हा रशियाने ताबा मिळवल्याने युरी आणि त्यांच्या परिवाराला खुप यातना सहन कराव्या लागल्या होत्या.
गागारिन यांचा मृत्यू असामान्य परिस्थितींमध्ये एका विमान अपघातात झाला होता. मात्र हे सर्व कसे झाले हे दीर्घकाळ रहस्यच होते. हैराण करणारी गोष्ट अशी की, खुप काळापर्यंत असे मानले जात होते की, एलियंन्स यांनी त्यांना ठार केले आहे. तर अपघातानंतर काही लोकांना याला अपघात म्हटले तर काहींनी आत्महत्या. मात्र बहुतांश लोकांचे असे मानणे होते की, एलियंन्सनी त्यांचा जीव घेतला आहे.
मात्र असे नाही की, सोवियत सरकराने या अपघाताचा पूर्णपणे तपास केला नाही. या अपघातामागे एलिंयन्सचा हात असल्याव्यतिरिक्त काही प्रकारचे कट रचल्याचे तर्क दिले गेले. अपघातानंतर सांगण्यात आलेल्या अधिकृत कारणांना आव्हाने सद्धा मिळाली ज्याचा सोवित संघाने तपास केला होता. सोवियत गुप्तच संस्था केजीबीने सुद्धा आपल्याकडून तपास केला.
तर १०८ मिनिटांच्या आंतराळ प्रवासाच्या ७ वर्षानंतर युरी यांचा मृत्यू मिग फाइटर विमानाचे उड्डाण करतेवेळी झाला होता. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर ४५ वर्षानंतर असे कळले की, त्यांच्या मृत्यूच्या नक्की कारण काय होते. सोवियत सरकारने मृत्यूची कारणे लपवून ठेवली. मात्र रशियन सरकार वर्ष २००३ मध्ये तपासाच्या त्या कागदपत्रांना सार्वजनिक केले ज्यामध्ये त्यांच्या मृत्यूचे योग्य कारण सांगितले होते. ही कागदपत्र क्रेमलिनमध्ये गुप्त पद्धतीने ठेवण्यात आली होती.(Yuri Gagarin Death Anniversary)
नव्या कागदपत्रांवरुन असे कळते की, युरी यांचा मृत्यू जेटच्या खराब वातावरणात फसल्याने झाला. युरी यांच्यासोबत आणि त्यांच्यासोबत पहिल्यांदा स्पेस वॉक करणारे ऐलेक्से लिनोव यांनी असे सांगितले की, युरी जेव्हा मिग उडवत होते तेव्हा एक दुसरे फाइटर प्लेन त्यांच्या विमानाजवळ आल्याने त्यांनी बचाव करण्यासाठी आपले विमान फिरवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ढगांना आदळून ते असंतुलित झाले आणि अखेर जमिनीवर कोसळले गेले.
याच दरम्यान, त्यांच्या विमानाचा वेग ७५० किमी प्रति तास होता. स्वत: लिनोव या रिपोर्टला सार्वजनिक करु पाहत होते. मात्र सरकारने त्यांना तशी परवानगी दिली नव्हती. पण कागदपत्र जेव्हा सार्वजनिक झाले तेव्हा त्यांना पायलटचे नाव सांगण्यासह सर्वकाही सांगण्याची परवानगी मिळाली. लिनोव यांनी हे सुद्धा सांगितले की, पायलटची यामध्ये काही मोठी भुमिका नव्हती. कागदपत्र सार्वजनिक झाले तेव्हा त्याचे वय ८० वर्ष होते आणि त्यांची प्रकृती ही ठिक नव्हती.
हे देखील वाचा- २७ मार्च: जगातील सर्वाधिक मोठ्या विमान अपघाताची साक्षीदार
लिनोव यांनी असे म्हटले की, युरी नेहमीच उत्तम पायलट होते. मृत्यू दरम्यान, ते कॉस्मोनेट ट्रेनिंग सेटरचे डेप्युटी ट्रेनिंग डायरेक्टर होते. संपूर्ण वाद खरंतर सोवियत सरकारच्या गोपनीय नीतिमुळे होता. ज्यामुळे अफवा आणि कथांना बळ मिळाले होते ज्यामध्ये एलियंसच्या हाते ते रशियन सरकारने त्यांना लपवून ठेवण्याच्या कथा चालविल्या.