Yoga for appendix- कोणत्याही व्यक्तिला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची फार गरज असते. खासकरुन पोटाची काळजी. कारण पोटासंबंधित काही समस्या उद्भवल्यास त्याचा थेट परिणाम संपूर्ण शरिरावर होते. अशातच पोटासंबंधित असलेली एक समस्या म्हमजे अपेंडिक्स. अपेंडिक्सच्या वेळी पोटात भयंकर दुखते. या समस्येवर तुम्हाला वैद्यकिय उपचारच घ्यावे लागतात. परंतु योगासनाच्या मदतीने अपेंडिक्सची सुरुवातीची काही लक्षण कमी करणे आणि अपेंडिक्सच्या ऑपरेशन नंतर होणाऱ्या कॉम्प्लेकेशन्सपासून बचाव करण्यास मदत मिळू शकते. यामुळेच आम्ही तुम्हाला अपेंडिक्ससाठी कोणती योगासने केली पाहिजेत जेणेकरुन यापासून थोडा आराम मिळेल.
अपेंडिक्स म्हणजे काय?
अपेंडिक्स ही एक लहान प्रकारची पिशवी असते जी मोठ्या आतड्याला जोडलेली असते. यामध्ये सूज आल्यास त्याला अपेंडिसाइटिस असे म्हटले जाते. ही समस्या झाल्यास आपल्याला शौच सुद्धा कडक होते. या व्यतिरिक्त ताप आणि उलटी सारख्या समस्या ही होऊ शकतात. या समस्येच्या सुरुवातीची लक्षण आणि सर्जरीनंतरचे कॉम्प्लेक्स पासून आराम मिळण्यासाठी योगा करणे फायदेशीर ठरू शकते. एका वैज्ञानिक अभ्यासात काही समस्या ठिक करण्यासाठी योगासन करावीत असे म्हटले आहे. त्यात अपेंडिक्सचा सुद्धा समावेश होतो.
अपेंडिक्ससाठी कोणती योगासन आहेत?
-त्रिकोणासन
त्रिकोणासन करताना तुमचे शरिर हे एका त्रिकोणासारखे होते. याच कारणास्तव त्याला त्रिकोणासन असे म्हटले जाते. या योगासनाला इंग्रजीत ट्रायंगल पोज असे ही म्हणतात. हे योगासन केल्याने पेट आणि रक्तवाहिन्यांवर प्रभाव पडतो. तसेच अपेंडिक्समुळे होणाऱ्या अन्य समस्या जसे की, गॅस, अपचन आणि कब्ज पासून ही दिलासा देते.
-वृक्षासन
अपेंडिक्स दूर करण्यासाठी तुम्ही वृक्षासन सुद्धा करु शकतात. वृक्षासन करताना एक पाय वर करुन तुम्हाला उभे रहावे लागते. यामध्ये तुमचे शरीर हे एका झाडाप्रमाणे दिसते. हे योगासन अपेंडिक्सच्या लक्षणांपासून दूर ठेवण्यास फायदेशीर ठरु शकते. या संबंधित प्रकाशित एका रिसर्चमध्ये असे दिले आहे की, या योगामुळे पाचनक्रिया ठिक होऊ शकते.
हे देखील वाचा- उंची वाढवण्यासाठी ‘ही’ योगासन ठरतील फायदेशीर
-पश्मिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासन तुम्ही जर नियमित केल्यास अपेंडिक्सच्या सर्जरी नंतर होणारा त्रास आणि याच्या सुरुवातीच्या लक्षणांपासून दिलासा मिळू शकतो. खरंतर अपेंडिक्समुळे शौच कडक होऊ शकते. कब्जच्या स्थितीत सुद्धा शौच कडक होते आणि पश्चिमोत्तानासन ही तुम्हाला यापासून सुटकारा मिळवून देऊ शकते. त्याचसोबत अपेंडिक्सची लक्षण सुद्धा यामुळे कमी होऊ शकतात.
-सर्वांगासन
हे योगासन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पाठीच्या जोरावर आपले दोन्ही पाय वर घेऊन जायचे असतात. एका मेडिकल रिसर्चनुसार, हे योगासन केल्यानंतर बाउल मुव्हमेंट रेग्युलेट होते. त्यामुळे कब्जच्या समस्येपासून सुटकारा मिळू शकते. तसेच पोटात होणारे दुखणे सुद्धा ठिक होते. यामध्ये अपेंडिक्सची स्थिती सुद्धा काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते.(Yoga for appendix)
दरम्यान, अपेंडिक्स झाल्यास तुम्हाला वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी लागते. पण योगासन करणार असाल तर सकाळी उपाशी पोटी करु शकतात. जर तुम्ही योगासन ही संध्याकाळच्या वेळेस करण्याचा विचार करत असाल तर योगासन करण्यापूर्वी ३ तास आधी काहीच खाऊ नका. त्याचसोबत तुम्हाला गंभीर आजार किंवा सर्जरी झाली असेल तर योगासन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या आणि शरिरातील कोणत्याही भागात दुखू लागल्यास योगासन करु नका.