आपल्या आहारात फळांचे स्थान मोठे आहे. रोज एकतरी फळ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे शरीराला आवश्यक अशी पोषक तत्वे मिळतात. इतर सर्व फळांच्या किंमती कितीही जास्त झाल्या आणि फळांच्या किंमतींचे ओझे खिशावर पडले तरी यात केळी ही सर्वसामान्यांची लाडकी असतात. अत्यंत कमी किंमत आणि भरपूर फायदे हे केळ्यांचे (Banana) वैशिष्ट आहे. त्यामुळेच गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक घरात केळी खाल्ली जातात. केळी पोषक तत्वांनी युक्त असतात. अनेक घरात सकाळचा नाश्ताही केळ्यांच्या सोबत केला जातो. केळ्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. यामधील स्टार्च शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते आणि पचनशक्ती मजबूत होते. त्यामुळे बरेचवेळा डॉक्टरही केळी खाण्याचा सल्ला देतात. मात्र यापेक्षाही चांगली केळी कुठे उपलब्ध झाली तर…अर्थातच केळ्यांपेक्षाही (Banana) चांगली केळी आता बाजारात दिसू लागली आहेत. नेहमी जी पिवळ्या सालांची केळी मिळतात, त्यापेक्षा अगदी थोड्या जास्त किंमतीची ही केळी गुणधर्मानं मात्र खूप मोठी आहेत. नेहमीच्या पिवळ्या सालांच्या केळीपेक्षा या केळ्यांमध्ये अनेक पटीनं फायबर आणि अन्य पोषक द्रव्ये आढळतात. ही केळी (Banana) म्हणजे लाल केळी. नेहमीच्या केळ्यांपेक्षा थोडी जाड आणि रंगानं लाल असलेली ही केळी खाणा-याला जेवढी फायदेशीर पडत आहेत, तेवढीच या केळ्यांपासून शेतकरीही लाखो रुपये कमवत आहेत.
भारतात केळी म्हटलं की, पिवळ्या सालीची केळी पुढे येतात. मात्र गेल्या काही वर्षापासून ऑस्ट्रेलिया आणि आशियाई देशात होणारी लाल सालीची केळी आपल्या देशात दिसायला लागली. या केळींची गुणवत्ता पाहून शेतक-यांनी या लाल सालींच्या केळीची (Banana) लागवड करायला सुरुवात केली आणि आता भारतातही या लाल सालीच्या केळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली आहे. पिवळ्या सालीच्या केळीपेक्षा लाल केळींचे उत्पादन जास्त होते. या लाल केळींच्या एका घडामध्ये सुमारे 100 लागतात. या केळीमध्ये फायबर आणि अन्य गुणधर्म जास्त असल्यानं बाजारात त्यांची किंमत 200 रुपयांहून अधिक मिळते. परिणामी शेतकरी लाल केळींची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत. एरवी केळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, सोडियम आणि पोटॅशियम हे मोठ्या प्रमाणात आढळतात. पण लाल केळींमध्ये (Banana) या सर्वांची मात्रा अधिक प्रमाणात असते. ही लाल केळी चवीलाही अतिशय गोड असतात. गोड असली तरी ज्यांना डायबेटीस आहे, असेही लाल केळी खाऊ शकतात. कारण या केळींमद्ये नेहमीच्या केळ्यांपेक्षा जास्त औषधी गुणधर्म आढळून येतात.
======
हे देखील वाचा : ‘मशरुम टी’ चे हे फायदे माहिती आहेत का?
======
लाल केळीची (Banana) लागवड ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र आता त्याचा फैलाव अन्य देशातही झाला आहे. आता लाल केळी अमेरिका, वेस्ट इंडीज, मेक्सिको येथेही लावण्यात येते. भारतातील शेतकऱ्यांनीही त्याची लागवड सुरु केली आहे. लाल रंगाच्या केळीची लागवड उत्तर प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि केरळमध्ये केली जात आहे. लाल केळीला त्याच्या गोडीमुळे वाढती मागणी आहे. त्यामुळे शेतक-यांना भरघोस नफा मिळत आहे. लाल केळीची लागवड कोरड्या हवामानात केली जाते. या केळीचे देठ खूप लांब असतात. लाल केळीचे रोप मात्र थोडे मोठे असते, त्यामुळे लाल केळीच्या (Banana) झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्याच्या लागवडीसाठी विशेष मातीची आवश्यकता नसते. पण लाल केळीची झाडे जास्त तापमान सहन करू शकत नाहीत. लागवडीनंतर सुमारे पाच ते सहा महिन्यांनी ही केळी काढणीसाठी तयार होतात. एका केळीच्या घडाला शंभर केळी लागतात. याची किंमतही चढी मिळते. त्यामुळे आता भारतातही ही केळी मोठ्या प्रमाणात लावण्यात येत आहे. उत्तरप्रदेशमधील मिर्झापूर आणि केरळ मध्ये या लाल केळ्यांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. या केळ्याची (Banana) लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांचा लाल रंगही उपयोगी पडला आहे. लाल रंगाच्या फळातील बीटा आणि कॅरोटीनसारखे पोषक घटकही या लाल केळीत असल्यामुळे त्याची मागणी वाढती आहे.
सई बने