Home » Homeopathy Day : जागतिक होमिओपॅथी दिनाची माहिती आणि इतिहास

Homeopathy Day : जागतिक होमिओपॅथी दिनाची माहिती आणि इतिहास

by Jyotsna Kulkarni
0 comment
Homeopathy Day
Share

आजरी पडल्यानंतर आपण सर्वच डॉक्टरांकडे जातो, आणि त्यांनी दिलेले सर्व औषधं घेतो. मात्र अनेकांना अलोपॅथी औषधं घ्यायला अजिबातच आवडत नाही. या औषधांमुळे गुण जरी लगेच पडत असला तरी तो दीर्घकाळासाठी नसतो. यासाठीच अनेक लोकं अँटिबायोटिक्स घेण्यापेक्षा आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी औषधं घ्यायला प्राधान्य देतात. या औषधांचा परिणाम जरी हळूहळू होत असला तरी तो आजाराच्या मुळावरच हल्ला करत आजरा मुळापासून नष्ट करण्याचे काम करतो. (Homeopathy Day)

मुख्य म्हणजे होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक औषधांचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होत नाही. यातही आयुर्वेदिक औषधं कडवट असल्यामुळे अनेक लोकं होमिओपॅथी औषधं घेण्यावर भर देतात. कारण ही औषधं दिसायला अगदी साबुदाण्यासारखी आणि चवीला गोड गोड असतात. त्यामुळे ही औषधं घेणे आणि सोबत बाळगणे अगदी सोपे असते. मात्र आजही या उपचाराकडे अनेक लोकं फायदेशीर किंवा लाभदायक उपचार असल्याचे मनात नाही. म्हणूनच आजही ही उपचार पद्धती काही प्रमाणात मागेच आहे.(World Homeopathy Day)

आजच्या आधुनिक काळातील लोकांना होमिओपॅथी औषधांचे महत्व समजावे, ही उपचार पद्धती समजावी आणि ही उपचार पद्धत अलोपॅथिक सारखीच किंबहुना त्याहून अधिक विश्वासू उपचार पद्धत असल्याचे लोकांना समजावे यासाठी साजरा केला जातो होमिओपॅथी दिवस. होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांचा १० एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्ताने दरवर्षी १० एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो. (Social News)

Homeopathy Day

=========

हे देखील वाचा : China : भूकंपाच्या छायेत चीन !

=========

जगातील १०० देशांमध्ये होमिओपॅथी उपचार पद्धती वापरली जात आहे आणि ती जगभरात प्रसिद्ध देखील आहे. या उपचार पद्धतीकडे जगभरातील लोकं आता विश्वासाने पाहू लागले आहेत. भारतातदेखील बऱ्यापैकी ही उपचार पद्धती प्रसिद्ध होताना दिसत आहे. आज साजऱ्या होत असलेल्या जागतिक होमिओपॅथी दिनाच्या औचित्याने जाणून घेऊया या दिवसाच्या इतिहासाबद्दल आणि उपचार पद्धतीबद्दल. (MArathi Top News)

होमिओपॅथी हा शब्द homo आणि pathos या ग्रीक शब्दांपासून आला आहे. यामध्ये होमो म्हणजे ‘समान’ आणि पॅथोस म्हणजे ‘दु:ख किंवा रोग’. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथीच्या मते, हे औषधाच्या ‘सममिती’ तत्त्वावर आधारित औषधाचे पर्यायी स्वरूप आहे. या पद्धतीमध्ये, रूग्णांवर केवळ सर्वांगीण दृष्टीकोनातूनच नव्हे तर रूग्णाची वैयक्तिक वैशिष्ट्ये समजून घेऊन उपचार केले जातात.(Latest Marathi NEws)

होमिओपॅथी उपचारांमध्ये औषधे आणि शस्त्रक्रिया यांचा समावेश नाही. यात साबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्या दिल्या जातात, द्रव स्वरूपात किंवा पावडरच्या रुपात औषध दिले जाते. प्रत्येक माणूस वेगळा आहे. त्या माणसाची शरीररचना आणि त्याला होणाऱ्या त्रासाची लक्षणे वेगळी आहेत, या तत्वावर ही उपचार पद्धती अवलंबून आहे.(Marathi News)

जर्मन चिकित्सक आणि रसायनशास्त्रज्ञ सॅम्युअल हॅनेमन यांच्या प्रयत्नांमुळे होमिओपॅथी उपचार पद्धती प्रसिद्ध झाली. पण त्याची उत्पत्ती इ.स.पूर्व पाचव्या शतकात झाली आहे. तेव्हा हिप्पोक्रेट्स यांनी होमिओपॅथी उपचाराबद्दल सांगितले होते. हिप्पोक्रेट्स यांनी आधी रोगाविषयीची माहिती समजून घेतली. त्यानंतर त्या रोगाचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो, याची संपूर्ण माहिती घेतली. (Trending Marathi NEws)

Homeopathy Day

=========

हे देखील वाचा : Bhgwan Mahavir : भगवान महावीर जयंती

=========

या प्रक्रियेमुळे होमिओपॅथी उपचार पद्धतीचा शोध लागला. त्यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीची आजाराची लक्षणे आधी नीट समजून घेणे आवश्यक असते. रुग्ण झालेल्या त्या रोगाला कसा प्रतिसाद देत आहे, हे समजून घ्यायला हवे. रोगाचे निदान होण्यासाठी आधी रुग्णाची उपचार शक्ती महत्वाची आहे. हिप्पोक्रेट्स यांच्यानंतर होमिओपॅथीकडे जास्त कोणीच लक्ष दिले नाही. मात्र अठराव्या शतकाच्या शेवटी हॅनेमन यांच्यामुळे होमिओपॅथी ही उपचार पद्धती लोकांना माहिती होण्यास सुरुवात झाली.(Top Stories)

असे सांगितले जाते की त्या काळी आजार खूपच वेगाने पसरत होते. आजारांवर केले जाणारे उपचार खूपच त्रासदायक होते. त्यावेळी या आजारांवर केली जाणारी निदानावरुन चिकित्सा उपयुक्त नसल्याचे हॅनेमन यांना समजले होते. शरीरावर वाईट परिणाम करणाऱ्या उपचार पद्धतीच्या ते विरोधात होते. म्हणून हॅनेमन यांनी होमिओपॅथीमधल्या अशा काही गोष्टी शोधून काढल्या ज्यामुळे उपचार करणे अधिक सोपे झाले. यासोबतच त्यांनी होमिओपॅथीमध्ये असे काही शोध लावले की त्यांना थेट होमिओपॅथीचे संस्थापक म्हणूनच लोकं ओळखू लागले.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.