Home » Health : झोपेत असताना ‘हार्ट अटॅक’चा धोका अधिक का आहे?

Health : झोपेत असताना ‘हार्ट अटॅक’चा धोका अधिक का आहे?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

इंडियन आयडल 3″ या शोचा विजेता, गायक आणि अभिनेता प्रशांत तमांग यांचे निधन झाले आहे. ११ जानेवारीला दिल्लीमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. कार्डिॲक अटॅक अरेस्टने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर तसेच चाहत्यांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला असून चाहतेही शोकमग्न आहे. मात्र प्रशांत तमंग याचा अचानक मृत्यू कसा झाला याबद्दल विविध चर्चा होताना दिसत आहेत. दरम्यान प्रशांत यांच्या पत्नीने प्रशांत तमांग यांचा मृत्यू नॅचरल, नैसर्गिकच होता आणि ते झोपेतच गेले असे सांगितले. प्रशांत यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा झोपेत येणाऱ्या हार्ट अटॅकवर चर्चा सुरु झाल्या आहेत. (Heart Attack)

जगभरात सर्वाधिक मृत्यू हार्ट अटॅकने होतात. आपण मधल्या काही काळापासून झोपेत असतानाच हार्ट अटॅक आला आणि मृत्यू झाला अशा अनेक घटनांबद्दल ऐकले असेल. रात्री गाढ झोपेत असताना अचानक हार्ट अटॅक येऊन अनेकांचे मृत्यू होत आहेत. हा धोका इतका गंभीर आहे की, अनेकदा रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच जीव जातो. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या संशोधनानुसार, दिवसाच्या इतर वेळेपेक्षा पहाटे ६ ते दुपारी १२ या वेळेत हार्ट अटॅक येण्याची शक्यता तब्बल ४० टक्क्यांनी जास्त असते. (Health News)

जी वेळ गाढ झोपेची मनाला आणि शरीराला आराम देणारी मानली जाते, त्याच शांत वेळेत शरीरात एक मोठे ‘जैविक युद्ध’ सुरू असते. जेव्हा जग झोपेतून जागे होत असते, तेव्हा हृदय मात्र एका मोठ्या ताणाखाली असते. रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून ते रक्तदाब वाढण्यापर्यंतच्या अनेक प्रक्रिया याच काळात वेगाने घडतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार असे सांगितले जाते की, रात्री झोपेत सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. ज्या लोकांना मधुमेह, हाय बीपी, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणाची समस्या असते त्यांच्यामध्ये याची रिस्क अधिक असते. काही लोकांचे रात्रीच्या वेळी बीपी वाढले जाते. हार्टला बीपी मेंन्टेन करण्यासाठी खुप मेहनत करावी लागते. यामुळे हार्टवर प्रेशर वाढते. अधिक दबाव पडल्याने हृदयाची काम करण्याची क्षमता प्रभावित होते आणि हार्ट अटॅक येतो. (Marathi)

रात्रीच्या वेळी जर श्वास घेण्यास समस्या येत असेल तर ते हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. श्वास घेण्याच्या समस्येसह जर घाम ही येत असेल तर अशा स्थितीत लगेच रुग्णालयात जावे. रात्री झोपेत हार्ट अटॅक आल्यास तर त्याची लक्षणं सुद्धा दिसतात. अचानक छातीत दुखणे आणि घाम येऊ लागतो. काही लोकांच्या डाव्या हातात आणि खांद्यात खुप दुखण्यास सुरुवात होते.अशी लक्षण दिसल्यानंतर ट्रीटमेंट घेणे गरजेचे असते. (Todays Marathi Headline)

Health

तसेच क्रोनिक ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप एपनियाच्या कारणास्तव ही हार्ट अटॅक येऊ शकते. हा एक झोपेसंदर्भातील आजार आहे. यामध्ये पीडित रुग्णाच्या शरिरात रात्रीच्या वेळी बीपी वाढला जातो जे हार्ट अटॅकचे कारण ठरु शकतो. झोपेत हार्ट अटॅक येण्याची रिस्क अशा कारणास्तव असते की, झोपताना स्नायू रिलॅक्स असतात. मात्र मानेच्या आजूबाजूला असलेले काही टिश्यू अधिक अॅक्टिव्ह होतात. यामुळे रिस्पिरेटरी ट्रॅक्टवर ही प्रभाव पडतो आणि श्वास घेण्यास समस्या उद्भवते. यामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. याचा थेट परिणाम हार्ट फंक्शनवर होतो. त्यामुळे अशा समस्येपासून दूर राहण्यासाठी बीपी नियंत्रणात असावा आणि दररोज थोडा वेळ तरी व्यायाम करावा असा सल्ला दिला जातो. (Top Stories)

तज्ञांच्या मते, रात्री झोपेत असताना आपल्या शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया मंदावतात. हृदयाची गती आणि रक्तदाब दोन्ही कमी होतात. मात्र ज्यांना आधीच हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा कोलेस्टेरॉलची समस्या आहे, त्यांच्यासाठी हा काळ अधिक धोकादायक ठरतो. झोपेत श्वास घेण्यात अडथळा येणे, अचानक रक्तदाब वाढणे, ताणतणाव किंवा चुकीच्या जीवनशैमीमुळे हृदयावर ताण येतो आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. (Top Marathi News)

शिवाय सकाळी ६ च्या सुमारास शरीरात ‘कोर्टिसोल’ हार्मोनची पातळी वाढते. यामुळे रक्तदाब (BP) वाढतो आणि हृदयाला जास्त ऑक्सिजनची गरज लागते. पहाटेच्या वेळी मानवी शरीरातील रक्त नैसर्गिकरित्या जास्त घट्ट असते. यामुळे रक्तवाहिन्यांत गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. सकाळी रक्तातील प्लेटलेट्स जास्त सक्रिय होतात, ज्यामुळे रक्ताचा प्रवाह अडथळा निर्माण होण्याची शक्यता वाढते. डॉक्टरांच्या मते, रात्रीच्या वेळेत शरीरातील पॅरसिंपथेटिक नर्व्हस सिस्टिम सक्रिय असते. त्यामुळे हृदयाची गती मंदावते. पण ज्यांचे हृदय आधीच कमजोर आहे, त्यांच्याकडे रक्तपुरवठा थांबण्याची किंवा अचानक ब्लॉकेज होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे रुग्णाला गाढ झोपेत हार्ट अटॅक येतो. (Latest Marathi Headline)

डॉक्टर सांगतात की, अनेकदा रुग्णाला कोणतीही पूर्वसूचना मिळत नाही. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घाम फुटणे किंवा अंगात जडपणा अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने हा धोका अधिकच वाढतो. ज्यांना आधीच हृदयविकार, मधुमेह किंवा रक्तदाब असे आजार आहेत. जास्त ताण घेणारे किंवा धूम्रपान आणि मद्यपान करणारे लोक असतात. जास्त वजन असलेले किंवा शारीरिक हालचाल कमी करणारे लोक असतात त्या सर्वाना झोपेत हार्ट अटॅक येण्याचे धोके जास्त असतात. (Top Trending News)

======

Eye Care : वाढत्या वयासह डोळ्यांखाली डार्क सर्कल्स वाढले जातात? वाचा कारणे आणि सोपे घरगुती उपाय

Winter Weight Gain : थंडीत काहीजणांमध्ये लठ्ठपणा का वाढतो? जाणून घ्या कारणे आणि प्रभावी उपाय

======

यासाठी आपण काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. हृदयाचे आरोग्य तपासण्यासाठी ईसीजी, २डी-इको, ब्लड टेस्ट वेळेवर करा. तर संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजनावर नियंत्रण ठेवा.ध्यान, योगा, हसण्याचे व्यायाम यांचा उपयोग करा. धूम्रपान, मद्यपान यापासून दूर राहा पुरेशी झोप घ्या, काहीही त्रास होत असल्यास किंवा थोडी देखील शंका असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. गाढ झोपेत हार्ट अटॅक येण्याच्या घटना वाढत आहेत आणि हा धोका अत्यंत गंभीर आहे. वेळेवर तपासणी, योग्य जीवनशैली आणि अलर्ट राहिले तर नक्कीच या आजारावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.