१४ जानेवारी २०२६ रोजी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करणार असून या दिवसापासून ‘उत्तरायण’ सुरू होणार आहे. हिंदू धर्मात मकर संक्रांतीला सूर्यदेवाच्या पूजेचा महत्त्वाचा दिवस मानले जाते. पौराणिक कथेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव हे पुत्र शनिच्या घरी जातात. शनि हा मकर आणि कुंभ राशिचा स्वामी आहे. त्यामुळे या दिवशी पिता-पुत्राची भेट होते. संपूर्ण भारतामध्ये मकरसंक्रातीच्या दिवस साजरा केला जातो. दक्षिण भारत, पंजाब, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये या सणाची विशेष उत्सुकता पाहायला मिळते. मात्र संक्रांतीचा सण हा अनेक शुभ कामांची सुरुवात समजला जात असला तरी यादिवशी आपण काही गोष्टी प्रकर्षाने केल्या पाहिजे तर काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे. मग नक्की संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये चला जाणून घेऊया. (Makar Sankranti)
संक्रांतीच्या दिवशी काय करावे?
– या दिवशी नवीन झाडू खरेदी करावा
– वडीलधाऱ्यांचे आणि पूर्वजांचे आशीर्वाद घ्यावे.
– या दिवशी गंगा स्नान करावे. सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. (Marathi NEws)
– तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावे, तिळाचे उटणे करून अंगास लावावे, तिलहोम, तिलतर्पण, तिलभक्षण, तिलदान या सहा प्रकारे तिळाचा वापर केल्यास पुण्य प्राप्त होते.
– खिचडी, भुसा, दही, शेंगदाणे, तिळाचे लाडू, उबदार कपडे आणि पैसे गरिबांना दान करावे.
– या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे.
– मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पूजा करावी. (Todays Marathi HEadline)

– उडद हे शनि ग्रहाशी संबंधित मानले जाते. मकरसंक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा ढैय्याचा त्रास होत आहे, त्यांना त्यातून आराम मिळू शकतो.
– काळे तीळ दान करावेत.
– मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही ब्राह्मण आणि गरजू व्यक्तीला काही तरी दान करावे. (Top Marathi News)
– कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नका.
– संक्रांतीच्या दिवशी गरजूंना तीळ, गूळ, धान्य, कपडे आणि ब्लँकेट दान करा.
– मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि अशा स्थितीत तूप दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरू बळकट होतात. (Latest Marathi Headline)
– मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरिबांना दान करणे पुण्य मानले जाते.
– या दिवशी तिळाचे लाडू किंवा तिळाचे इतर पदार्थ खाणे देखील शुभ मानले जाते.
संक्रातीला खालील गोष्टी अजिबातच करू नका
– मकर संक्रांतीच्या दिवशी तेलदान करणे अशुभ मानले जाते. असे केल्याने घरात आजार आणि नकारात्मकता येते.
– मकर संक्रांतीला पांढरा तांदूळ आणि चाकू, कात्री इत्यादी धारदार वस्तूंचे दान करणे टाळावे.
– मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका. जीवनात नकारात्मकता पसरू शकते. या दिवशी मादक पदार्थांचे सेवन निषिद्ध मानले जाते. त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. (Top Stories)
========
Makar Sankranti : वर्षातला पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीची माहिती आणि महत्त्व
========
– मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ न करता चुकूनही अन्न खाऊ नका. असे मानले जाते की अशा प्रकारे अन्न खाल्ल्याने धान्य अशुद्ध आणि विषारी होते.
– मकर संक्रांतीच्या दिवशी राग, वाद-विवाद, अपशब्द टाळावेत. तसेच, समाजात गोडवा पसरवण्याचा प्रयत्न करावा. (Top Trending Headline)
– या दिवशी केस कापणे किंवा नखं कापणे टाळावे. कारण असे केल्याने ऊर्जा कमी होते आणि पुण्यकाळात अपव्यय होतो, अशी मान्यता आहे.
– संक्रांतीच्या दिवशी गरजू, वृद्ध, आई-वडील यांचा अपमान टाळावा. कारण सूर्य हा पितृकारक ग्रह आहे; अपमान केल्यास पितृदोष वाढतो.
– दान हे नेहमी सात्विक आणि ताजे असावे. कोणालाही शिळे, खराब झालेले किंवा उरलेले अन्न दान करू नका. असे केल्याने पुण्याऐवजी दोष लागतो.
– संक्रांतीच्या दिवशी या दिवशी पिकाची कापणी करू नये. गाय किंवा म्हशीचे दूध काढण्यासारखे कार्य करू नये. (Social News)
(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
