चविष्ट, उत्तम आणि ताजे अन्न कोणाला खायला आवडणार नाही. काही लोक आपल्या आवडीचे पदार्थ घरच्या घरीच तयार करतात. मात्र जेव्हा करत नाही तेव्हा ते एखाद्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जाऊन खातात. खरंतर प्रत्येकजण घराबाहेर डिनरसाठी गेल्यानंतर पदार्थाच्या उत्तम चवीमुळे ती डिश खातात. मात्र तिच डिश जीवावर बेतली तर काय होईल? अशातच तुम्हाला माहितेय का, जगातील अशी एक डिश आहे जी सर्वाधिक घातक फूड डिश म्हणून ओळखली जाते. ती खाल्ल्याने आतापर्यंत काही लोकांचे मृत्यू सुद्धा झाले आहेत. तरीही लोकांना ती खायची असते. (World deadliest dish)
ही डिश पफरफिश पासून तयार केली जाते. ज्याला फुगु किंवा ब्लोफिश नावाने ओळखले जाते. या माश्याच्या आतमध्ये टेट्रोडोटॉक्सिन नावाचे विष असते. खासकरुन माश्याच्या लिवर, अंडाशय, डोळे आणि त्वेचवर विष अधिक प्रमाणात असते. या विषाला साइनाड पेक्षा दहा हजार पटींनी अधिक विषारी मानले जाते. मात्र तरीही जापानी लोक या माशापासून तयार करण्यात आलेली फुगु डिश खाणे पसंद करतात.
ही डिश बनवणे सोपे नव्हे
लॅडबाइबल नावाच्या वेबसाइटच्या रिपोर्ट्सनुसार या माशापासून तयार होणारी डिश बनवणे सोपे काम नाही. कारण ती कशी तयार केली जाते, हे शिकण्यासाठी शेफला काही वर्ष लागतात. कारण ती तयार करताना थोडीशी जरी चूक झाली तर थेट व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. सर्वात प्रथम तर शेफला हे शिकवले जाते की, माशाच्या विषारी अवयवयांना कसे कापले जाते. जेणेकरुन अन्य भाष विषारी होणार नाही. या व्यतिरिक्त मासा हा प्रत्येकालाच शिजवायला दिला जात नाही. तो केवळ तिच लोक शिजवू शकतात ज्यांना उत्तम अनुभव असतो. खरंतर उत्तम पद्धतीने मासा कसा शिजवायचा हे शिकण्यासाठी शेफला कमीत कमी तीन वर्षांचा तरी कालावधी लागतो. (World deadliest dish)
हेही वाचा- Bottle Gourd Juice Benefits: मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी गुणकारी आहे दूधी भोपळ्याचा रस !
रिपोर्ट्सनुसार, लंडन मधील एक प्रसिद्ध जापानी रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले की, जापानी शेफ यांच्याकडे जापानमध्ये ब्लोफिश तयार करण्यासाठी परवाना असणे अत्यंत गरजेचे असते. मात्र याचा परवाना मिळणे अत्यंत कठीण असते. कारम ब्लोफिश व्यवस्थितीत बनवण्यासाठी शेफला काही वर्षांचे प्रशिक्षण घेण्याची अत्यावश्यकता असते.