जर तुमची कंपनी अद्याप ही वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन देत आहे तर ही चांगलीच गोष्ट आहे. कारण वर्क फ्रॉम वेळी तुम्हाला काम करण्यासोबत खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे वेळोवेळी लक्ष देता येते. परंतु वर्क फ्रॉमच्या सवयीमुळे कुठे ना कुठे लोक ही आपल्या वेळेनुसार आणि आरामात काम करत असल्याने त्यांचे फिटनेसकडे सुद्धा काही प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. कारण यापूर्वी जेव्हा आपल्याला कार्यालयात जाऊन काम करावे लागायचे तेव्हा आपण सकाळी उठून आपली कामे आवरुन ऑफिसला वेळच्या वेळी पोहण्याचा प्रयत्न करायचो. यामुळे आपल्या शरिराची हालचाल व्हायची. पण आता वर्क फ्रॉम होममुळे (Work from home) ही हालचाल ही बऱ्याचश्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे आपण सुस्ती आल्यासारखे वागतो आणि आपल्याला काही कामे सुद्धा आराम करावीशी वाटतात. घरातच तुम्हाला फिटनेसकडे लक्ष द्यायचे असेल तर पुढील काही टीप्स जरुर वापरा.
-हेल्थी फूड खा
घरातून काम करतेवेळी आपल्या शरिराची कमी हालचाल होते. अशातच स्वत:ला फिट ठेवण्यासाठी डाएटवर लक्ष देणे फार गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्यात लो फॅट फूड प्रोडक्ट्सचा समावेश केला पाहिजे. जसे की, दूध, फळभाज्या, हिरव्या भाज्या, अंडी, डाळ यासारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.
-हायड्रेट रहा
मसल्स आणि अॅब्स आले म्हणजे तुम्ही फिट आहात असे नाही. परंतु स्वत:ला काही आजारांपासून दूर ठेवण्यासाठी, हेल्थी आणि उत्साहित राहणे म्हणजेच फिटनेस. त्यामुळे काही वेळेनंतर कामाच्या मध्ये मध्ये पाणी पित रहा. दिवसभरात व्यक्तीने ४ लीटर तरी पाणी प्ययाले पाहिजे असा सल्ला दिला जातो. तसेच चहा आणि कॉफीच्या सेवनापासून थोडे दूर राहिलेलेच बरे.
हे देखील वाचा-उंची वाढवण्यासाठी ‘ही’ योगासन ठरतील फायदेशीर

-व्यायामाची वेळ ठरवा
वर्क फ्रॉम होम दरम्यान जरी तुमच्याकडे भरपूर वेळ असला तरी फिटनेससाठी एक योग्य वेळ ठरवा. त्या वेळेत अन्य कामांपेक्षा तुमच्या व्यायामाकडे अधिक लक्ष द्या. कारण व्यायाम करताना तुम्ही हातातली गोष्ट सोडून दुसरी केली तर फिटनेसचा काय उपयोग?
-घरातून काम करण्यासाठी एक योग्य जागा निवडा
आपल्याला कार्यालयात जशी आपल्या बसण्यासाठी एक विशिष्ट जागा दिली असते. त्यानुसार घरात सुद्धा तुम्हाला तुमचे काम आरामदायी आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय करण्यासाठी एक योग्य जागा निवडा. बसताना सुद्धा तुमच्या पाठीचा कणा अधिक वाकला जाणार नाही ना याकडे सुद्धा लक्ष द्या.(Work from home)
-कामामधून वेळ काढा
एकाच ठिकाणी खुप तास बसून काम केल्याने तुमची मान, पाठ किंवा डोळे दुखण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे सतत एकाच ठिकाणी बसून काम करण्यापेक्षा कामादरम्यान थोडा-थोडा वेळ उठा. जेणेकरुन तुमच्या शरिराला सुद्धा आराम मिळेल.