अफगाणिस्तानात तालिबानाच्या शासनाला एक वर्ष सुद्धा पूर्ण झाले. परंतु त्यांच्या शासनकाळात महिलांना आपले आयुष्य नियम आणि अटींमध्ये जगावे लागत आहे. दुसऱ्याबाजूला तालिबान यांच्या कठोर नियमांमुळे त्यांना देश सोडून द्यायचा आहे. मात्र अफगाणिस्तानात असा ही एक काळ होता जेव्हा महिलांना त्यांचे स्वातंत्र्य होते. त्याचसोबत या महिलांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काही महिलांनी त्यासाठी प्रयत्न केले होते.(Women of Afghanistan)
खरंतर अफगाणिस्तानात २०व्या दशकापासून त्यांना इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महिलांच्या हक्कांसाठी आंदोलने होऊ लागली होती. महिलांनी सर्वात प्रथम आपल्या हक्कासाठी लढाई केली. पण आता तालिबान मध्ये असलेल्या शासनाचे नियम हे महिलांच्या विरोधातील आहेत. मात्र अफगाणिस्तानातील अशा काही महिलांनी त्यांचे हक्क मिळण्यासाठी ऐकेकाळी तालिबान यांचा सुद्धा सामना केला होता.
तुर्कलारची गवार्शद बेगम
गवार्शद बेगम १३७०-१५०७ च्या तिरुरिद वंशाच्या शासन दरम्यान एक प्रसिद्ध व्यक्ती झाल्या. त्या १५ व्या शतकातील होत्य. त्यांचे लग्न शासक शाहरुख तिमुरिद यांच्यासोबत झाले होते. त्या राणी असल्याने त्यांनी पहिल्यांदाच अफगाणिस्तानात महिलांच्या हक्कांसंदर्भात आवाज उठवला. त्या मंत्री झाल्या आणि अफगाणिस्तानात कला आणि संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी महत्वाची भुमिका बजावली.
त्यांनी कलाकार आणि कवींना नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्या काळात महिला कवयत्रिंना संधी मिळाली. तेव्हा तिमूरिद वंशाची राजधानी ही हेरात होती. जी त्यांच्या नेतृत्वाखाली कलेचे एक मोठे केंद्र बनले होते. स्थापत आणि कलांचा उगम झाला. जे अद्याप ही अफगाणिस्तानातील काही ठिकाणी प्रामुख्याने दिसून येते. त्यांनी धार्मिक शाळा, मशीदी आणि आधात्मिक केंद्राची स्थापना केली. गवार्शद बेगम या चतुर राजकरणी होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी त्यांचा लाडका नातू याला गादीवर बसवत १० वर्ष शासन केले.(Women of Afghanistan)
रबिया बालखाई
अफगाणिस्तानातील बालखमध्ये ०९ व्या शतकात रबिया बालखाई यांचा जन्म एका राजघराण्यात झाला होता. त्या देशाच्या आधुनिक पर्शियन भाषेतील कविता लिहिणाऱ्या कवयित्री होत्या. त्यांना खुप सन्मान मिळत होता की त्यामुळे दुसरे कवि त्यांचा द्वेष करु लागले. असे ही म्हटले जाते की, या द्वेषामुळे ओळखीच्या पुरुष शायर लोकांनी त्यांची हत्या केली.
परंतु तथ्य असे ही आहे की, राबिया यांची हत्या ही त्यांचा भावाच्या राजपरिवारातील एका गुलाम सोबत प्रेमात पडल्याने केली होती. त्या गुलामाच्या हुशारीवर भाळल्या होत्या. परंतु प्रेमासाठी जी शायरी राबिया यांनी लिहिली ती अफगाणिस्तानाच्या इतिहासात अमर झाली. त्यांना समान हक्क आणि न्यायाच्या संघर्षाचे प्रमीक मानले जाऊ लागले.
राणी सोराया तारजी
अफगाणिस्तानातील सर्वाधिक प्रभावशाली राजघराण्यातील त्या सदस्य होत्या. राणी सोराया ताराजी या राजा अमानुल्ला खान यांच्या पत्नी होत्या. त्यांनी १९१९ ते १९२१ पर्यंत इंग्रजांशी युद्ध करुन त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिले होते. त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये प्रोग्रेसिव विचारांचे शासन होते. सोराया या केवळ उच्चशिक्षितच नव्हत्या तर त्यांना महिलांच्या अधिकार, हक्क आणि शिक्षणासाठी सुद्धा लढाई केली. त्यांनी मुलींना शिकता यावे म्हणून शाळा सुद्धा सुरु केल्या. महिलांची पत्रिका इरशाद ए निशवान सुद्धा त्यांनी सुरु केले. त्यांचे लक्ष्य हे आज ही देशातील महिलांना प्रेरणा देतात.
हे देखील वाचा- कोण आहे बिलकिस बानो? का सरकारने सामूहिक बलात्काप्रकरणातील ११ आरोपींना दिला जामीन
नादिया अंजुमा
नादिया अंजुमा यांचा जन्म १९८० मध्ये हेरामध्ये झाला होता. नादिया इतर महिलांसोबत भूमिगत शाळा आणि साहित्यिक गोष्टींमध्ये सहभागी होऊ लागल्या होत्या. हेरात युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक मुहम्मद अली राहयाब यांनी त्यांना साहित्याचे शिक्षण दिले. परंतु तो असा काळ होता जेव्हा महिलांना शिक्षणासाठी बंदी घालण्यात आली होती. जेव्हा तालिबानचे शासन संपले त्यानंतर नादियांनी हेरात युनिव्हर्सिटीमध्ये पुन्हा शिक्षण सुरु केली. त्या अवघ्या कमी काळातच प्रसिद्ध कवयित्री म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. नादिया यांना जेव्हा अधिक सन्मान मिळू लागला तेव्हा त्यांच्या पतीने नादिया यांच्या कविता लिहिण्याच्या कारणास्तव त्यांची हत्या केली.(Women of Afghanistan)
लेफ्टिनेंट कर्नल मलालाई काकर
कंधार मध्ये महिलांच्या विरोधात होणारे गुन्ह्यांसंबंधितच्या विभागाच्या त्या प्रमुख होत्या. त्यांना बहुतांश महिलांची मदत केली. त्यांना जीवनदान दिले. त्या अशा एका परिवारातील होत्या जेथे त्यांचा पती आणि भाऊ सुद्धा पोलीस विभागात काम करत होते. त्या कंधार पोलीस अॅकेडमीमधून ग्रॅज्युएट होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. देशात इनवेस्टिगेटर करणाऱ्या सुद्धा त्या पहिलाच महिला होता. त्या जेंडरच्या आधारावरील हिंसेवर लक्ष द्यायच्या. २८ सप्टेंबर २००८ मध्ये तालिबानच्या गनमॅनला गोळी घालून त्याची त्यांनी हत्या केली होती.