Home » साबण-तेल बनवणाऱ्या कंपनीने असा रचला इतिहास, बनली दिग्गज IT कंपनी

साबण-तेल बनवणाऱ्या कंपनीने असा रचला इतिहास, बनली दिग्गज IT कंपनी

by Team Gajawaja
0 comment
Wipro Success Story
Share

आयुष्यात कधी यश मिळते तर कधी पराभव. पण पराभवावर मात करुन आयुष्यात यश मिळवणाऱ्या अशा अनेक व्यक्ती आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दिग्गज भारतीय विप्रो कंपनीचे मालक अजीम प्रेमजी. विप्रोची सुरुवात अशीच झाली नाही. एकेकाळी त्यांचा परिवार बर्मा (आताचे मान्यमार) मध्ये राहतो.काही कारणास्तव परिवार गुजरात मधील कच्छ येथे येऊन राहू लागला. हिच त्यांची कर्मभूमी बनली. परिवारात व्यवसाय करण्याची परंपरा काही पिढ्यांपासून सुरु होती. अजीम प्रेमजी यांचे वडील एमएच प्रेमजी यांनी १९४५ मध्ये एक कंपनी स्थापन केली. त्याचे वेस्टर्न इंडिया वेजिटेबल प्रोडक्ट्स लिमिटेड असे त्याचे नाव ठेवले. ही कंपनी तेलाचा व्यापार करायची. (Wipro Success Story)

जेव्हा शिक्षण सोडून परतावे लागले
व्यवसाय उत्तम सुरु असल्याने अजीम प्रेमजी यांना शिक्षणासाठी स्टेनफोर्ड येथे पाठवण्यात आले होते. ११ ऑगस्ट १९९६ रोजी त्यांच्याकडे फोन आला आणि वडिलांच्या निधनाची बातमी त्यांना कळली. अशातच त्यांनी आपले शिक्षण सोडून भारतात परतावे लागले. त्यावेळी त्यांचे वय अवघे २१ वर्ष होते. वडिलांच्या मृत्यूनंतर कंपनीचे सातत्याने नुकसान होत राहिले. त्याचा स्तर ही अधिक वाढू लागला. प्रेमजी यांनी आपल्या वडिलांची कंपनी सांभाळली. नुकसान होत असल्याच्या काळात सुद्धा विश्वास कायम होता. आपल्या पराभवावर मात करण्यासाठी आपल्या निर्णयांवर ठाम उभे राहिले.

Wipro Success Story
Wipro Success Story

एक दिवस असा आला की, जेव्हा कंपनीने नफा देण्यास सुरुवात केली. मात्र अमेरिकेतून परतलेले प्रमेजी यांना कळले होते की, येणाऱ्या भविष्यात आयटी फार महत्वाचे क्षेत्र असणार आहे. त्यांनी विप्रोची सुरुवात केली. ही कंपनी यशाच्या शिखरावर पोहचली. १९७० मध्ये त्यांचा रेवेन्यू ७.२ कोटी रुपयांवर पोहचला गेला होता. भारतातून दिग्गज आयटी कंपनी IBM बाहेर गेल्यानंतर प्रेमजी यांनी विप्रो मध्ये १९८० मध्ये आयटी क्षेत्रात व्यवसाय सुरु केला. हा एक मोठा निर्णय होता. याचा सकारात्मक परिणाम ही दिसला. याच वर्षात विप्रोचा रेवेन्यू ४३ कोटींपर्यंत पोहचला गेला होता. (Wipro Success Story)

हे देखील वाचा- गांधी मंडेला पुरस्कार नक्की काय आहे जो दलाई लामा यांना दिला गेला?

मिनी कंप्युटर पासून केली सुरुवात
ते विप्रोच्या माध्यमातून आयटी क्षेत्रात उतरले आणि त्यांनी मिनी कंप्युटर पासून व्यवसाय सुरु केला. त्यांनी तो तयार करण्यासाठी अर्ज केला. विप्रोने आयटी क्षेत्रात व्यवसाय तेव्हा सुरु केला जेव्हा भारतात आयटी क्रांतीचा पाया रचला गेला. याचा परिणाम असा झाला की, कंपनीचा रेवेन्यू अधिक वेगाने वाढू लागला. १९९६ मध्ये विप्रोने आपल्या कंपनीचे मुख्यालय बंगळुरुत शिफ्ट केले. त्यानंतर कंपनीने यशाचे टप्पे गाठले.

२.२५ लाख टर्नओव्हर असणारी झाली कंपनी
२०२११ मध्ये अजीम प्रेमजी यांना देशातील दुसरा सर्वाधिक मोठा सन्मान पद्म विभूषणाने गौरवण्यात आले. २१ जुलै २०१९ मधअये चेयरमन पदावरुन ते निवृत्त झाले. आता कंपनीची कमान त्यांचा मुलगा रिशद प्रेमजी यांच्या हातात आहे. विप्रो २.२५ लाख कोटी मार्केट कॅप असणारी कंपनी झाली आहे. देशभरात यांचे २.४० लाख कर्मचारी आहेत. आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये कंपनीने ८३ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.