Home » नक्की कोण आहे ड्रग्ज केसमध्ये अडकलेला अभिनेता सिद्धांत कपूर? ज्याला आहे मागील ९ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये मोठ्या यशाची प्रतीक्षा

नक्की कोण आहे ड्रग्ज केसमध्ये अडकलेला अभिनेता सिद्धांत कपूर? ज्याला आहे मागील ९ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये मोठ्या यशाची प्रतीक्षा

by Team Gajawaja
0 comment
shraddha kapoor
Share

बॉलिवूड संपूर्ण भारतीयांसाठी अतिशय आकर्षणाचा, कुतुहलाचा आणि उत्सुकतेचा विषय असतो. या क्षेत्रात असणारे ग्लॅमर, डोळे दिपवून टाकणारा झगमगाट, पैसा, फेम सर्वच गोष्टी सामान्यांना भुरळ घालणाऱ्या असतात. हे जरी वरवर दिसत असे तरी आतमध्ये मात्र खूपच वेगळे चित्र असते. आपण या ग्लॅमर जगाच्या आत असणाऱ्या भयाण वास्तव्याबद्दल अनेक कलाकारांकडून अनेक चित्रपटांमधून पाहिले, ऐकले, वाचले असेल. या बॉलिवूडच्या एका मोठ्या आणि विचलित करणाऱ्या सत्यापैकीच एक सत्य म्हणजे ‘नशा’. बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये पाण्यासारखी दारू मिळते, अनेक लहान-मोठे अभिनेते अभिनेत्री आपल्याला सिगरेट पिताना दिसतात. आता हे जरी खूपच नॉर्मल वाटतं असले तरी याच जगाचे अजून एक मोठे सत्य म्हणजे ड्रग्ज. बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये दारू, सिगरेटसोबत मधल्या काही काळापासून ड्रग्ज मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याचे चित्र समोर यायला लागले आहे. किंबहुना सुशांत सिंग राजपूतच्या झालेल्या आकस्मिक मृत्यनंतर पोलिसांनी जो तपास सुरु केला त्यात मनोरंजनविश्वातील अनेक मोठी नावं समोर आली. ज्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज उपलब्ध असते अशा पार्ट्याना रेव्ह पार्ट्या म्हटले जाते, आणि या पार्ट्यांमध्ये आतापर्यंत अनेक कलाकार, त्यांचे नातेवाईक, कलाकारांची मुलं, विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी सापडल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो, पाहतो. मागच्या वर्षी आर्यन खान ड्रग्ज केस तुफान गाजली. या केसमधून बॉलिवूडचे नाव सहीसलामत बाहेर येत नाही तोच आता पुन्हा एकदा बॉलिवूडशी संबंधित एक मोठे नाव या रेव्ह पार्टीसोबत जोडले गेले आहे.(shraddha kapoor) 

अभिनेता सिद्धांत कपूर अर्थात अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि दिग्गज अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूरला ड्रग्ज घेतल्याचा आरोपाखाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. १३ जूनची सकाळ बॉलिवूडसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी एक मोठी बातमी घेऊन उगवली. बंगळुरूमध्ये छापा टाकत बंगळुरू पोलिसांनी सिद्धांत कपूरला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर ड्रग्ज सेवनाचाच आरोप आहे. बंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग्स सेवनात दोषी असलेल्या ६ जणांमध्ये सिद्धांत कपूर देखील सामील आहे. हे सर्व जणं बंगळुरूच्या एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या पार्टीमध्ये सामील होते. या पार्टीबद्दल पोलिसांना माहिती मिळताच तिथे त्यांनी छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले आहे.(shraddha kapoor)

सिद्धांत कपूर हा बॉलिवूडमध्ये सक्रिय असून, अजूनपर्यंत त्याला अपेक्षित यश मिळाले नसून तो त्याची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर जाणून घेऊया सिद्धांत कपूरबद्दल अधिक माहिती. सिद्धांत कपूर हा अभिनेता शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर यांचा मुलगा असून अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. या सर्वांमध्ये खूपच प्रेम असून त्यांचे कौटुंबिक फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सिद्धांत कपूर हा जरी अभिनेता असला तरी त्याने त्याचे करिअर सहायक दिग्दर्शक म्हणून सुरु केले आहे. (shraddha kapoor)

====

हे देखील वाचा – महासत्तेला आव्हान देण्यासाठी चीन – रशियाची पूर्वतयारी?

====

२०१३ साली शूटआऊट अट वडाळा या सिनेमातून त्याने त्याच्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात केली. याआधी त्याने भूलभुलैया, भागाम भाग, ढोल, चूप चूप के आदी चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. सिद्धांतने न्यू यॉर्कच्या Lee Strasberg Theatre and Film Institute मधून फिल्म मेकिंग आणि एक्टिंगचे प्रशिक्षण घेतले. अभिनयात येण्याआधी तो DJ म्हणून देखील काम करायचा. पुढे भारतात आल्यानंतर त्याने दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याकडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सिद्धांत कपूर २०१३ साली सोहम शाह यांच्या सत्ते पे सत्ते या सिनेमातून त्याच्या करिअरची सुरुवात करणार होता, मात्र हा सिनेमा बनला नाही. पुढे त्याने अनिल कपूर, कंगना रणौत, जॉन अब्राहम यांच्या शूटआऊट अट वडाळामधून त्याचे अभिनयात पदार्पण केले. (shraddha kapoor)

पुढे सिद्धांत अगली, हसीना पारकर, जज्बा, पलटन, यारम, हॅलो चार्ली, भूत-पार्ट वन: द हॉन्टेड शिप, चेहरे आदी चित्रपटांमध्ये दिसला. मात्र त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. तो जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये सहायक भूमिकांमध्ये दिसला. त्याला शक्ती कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमाणे मोठे यश मिळाले नाही. याशिवाय सिद्धांतने ‘भौकाल’ या वेबसिरीजमध्ये देखील काम केले आहे. त्याने ‘हम हिंदुस्तानी’ या म्युझिक व्हिडिओमध्ये देखील काम केले आहे. मात्र अजूनही त्याला एका मोठ्या यशाची प्रतीक्षा आहे. अतिशय हँडसम आणि डॅशिंग दिसणाऱ्या सिद्धांतला सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोविंग आहे.(shraddha kapoor) 

सिद्धांतच्या आधी ड्रग्स प्रकरणात दीपिका पदुकोण, रिया चक्रवर्ती, अनन्या पांडे, भारती सिंग, आर्यन खान, हर्ष लिंबाचिया आदी कलाकारांची देखील चौकशी करण्यात आली होती. यामध्ये अनेक दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा देखील समावेश होता. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.