Home » नोएडातील कफ सिरप कंपनीचा परवाना रद्द, अखेर WHO कडून कशा प्रकारे असुरक्षित घोषित केले जाते?

नोएडातील कफ सिरप कंपनीचा परवाना रद्द, अखेर WHO कडून कशा प्रकारे असुरक्षित घोषित केले जाते?

by Team Gajawaja
0 comment
WHO on Cough Syrups
Share

जागतिक आरोग्य संघटनेने भारतात बनवण्यात आलेल्या कफ सिरपला असुरक्षित असल्याचे सांगत त्याचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. डब्लूएचओने आपल्या वैद्यकीय प्रोडक्ट अलर्टमध्ये असे म्हटले आहे की, कफ सिरप एम्बरोनॉल आणि डीओके-१ मॅक्स सब स्टँडर्ड आहेत. ते गुणवत्तेचे मानक पूर्ण करत नाहीत. अशाच त्यांचा वापर करु नये. या सिरपला बनवणाऱ्या कंपनीने याची सुरक्षा आणि क्वालिटीची सुद्धा कोणतीच हमी दिलेली नाही. अशातच कफ सिरपचे सेवन करणे धोकादायक ठरु शकते. याच दरम्यान, केंद्र सरकराने या औषध कंपनीचा परवाना निलंबित केला आहे. (WHO on Cough Syrups)

हे कफ सिरप उत्तर प्रदेशातील नोएडाचे मॅरियन बायोटेकद्वारे बनवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये उज्बेकिस्तान सरकारने आरोप लावला होता की, मॅरियन बायोटेकच्या या दोन कफ सिरपच्या सेवनामुळे त्यांच्या येथे १८ मुलांचा मृत्यू झाला होता. उज्बेकिस्तानच्या या आरोपानंतर डब्लूएचओने सिरपची चाचणी केली, त्यामध्ये ते क्वालिटी स्टँडर्ड पास करु शकले नाही.

आता असा प्रश्न उपस्थितीत होत आहे की, डब्लूएचओ औधषांना कोणत्या आधारावर असुरक्षित घोषित करतात आणि त्यासाठी कोणत्या प्रोटोकॉल किंवा एसओपीचे पालन केले जाते का?

एखाद्या औषधाला किंवा सिरपला असुरक्षित कसे घोषित केले जाते?
आरोग्य निती आणि महारोग तज्ञांनी असे सांगितले की, जेव्हा एखादे औषध किंवा सिरप वरुन वाद होतो तेव्हा सर्वात प्रथम डब्लूएचओ औषधाचे सॅम्पल आपल्या लॅबमध्ये टेस्ट करतात. त्यानंतर त्याच औषधाचे सॅम्पल दिले जातात, ज्यामुळे लोकांना नुकसान पोहचले आहे किंवा मृत्यू झालाय. उज्बेकिस्तान प्रकरणात डब्लूएचओने तेथील सिरपचे सॅम्पल घेतले आहेत आणि त्याची चाचणी ही केली.लॅब टेस्टमध्ये या सिरपमध्ये डायथिलीन ग्लाइकॉलचे प्रमाण अधिक आढळून आले. त्यानंतर डब्लूएचओने हे सिरप असुरक्षित घोषित केले आहे.

याची प्रक्रिया काय असते?
-Composition Test
या टेस्टमध्ये असे पाहिले जाते की, औषधात असलेले सॉल्ट आणि कंपोजिशनची माहिती त्यावर दिल्याप्रमाणे आहे की नाही. म्हणजेच, जर औषधावर किंवा सिरमध्ये सॉल्टचे जे प्रमाण सांगितले आहे ते कमी अधिक नाही ना हे पाहिले जाते. जर औषधावर दिलेली माहिती आणि लॅब टेस्टमध्ये करण्यात आलेला तपास यामध्ये फरक असेल तर ते टेस्टमध्ये पास होत नाही.

-Preservative Test
या टेस्टमध्ये दिसते की, औषधात कोणते प्रिजर्वेटिव्स मिसळले आहेत आणि त्यांचे प्रमाण ठरवण्यात आलेल्या मानकानुसार आहे की नाही. काही वेळेस असे होते की, सिरपला चव देण्यासाठी यामध्ये डायथिलीन ग्लाइकॉल मिक्स केले जाते. जर याचे प्रमाण अधिक असेल तर ते आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. या टेस्टमध्ये असे दिसते की, सिरपमध्ये ग्लाइकॉलचे प्रमाण किती आहे. जर ते अधिक असेल तर ते औषध चाचणीत अयशस्वी होते. (WHO on Cough Syrups)

-Impurity Test
लॅब टेस्टिंग मधील अखेरचा टप्पा इम्प्योरिटी टेस्ट. यामध्ये असे पाहिले जाते की, औषधात एखादी भेसळ केली आहे की नाही. कारण काही वेळेस काही सिरपमध्ये अल्कोहोल मिसळले जाते. ज्यामुळे आरोग्याला नुकसान होऊ शकते. या टेस्टमध्ये असे ही पाहिले जाते की, सिरप शुद्ध आहे की नाही. जर त्यामध्ये काही कमतरता असेल तर औषध टेस्टमध्ये पास होत नाही.

हे देखील वाचा- उज्बेकिस्तान मध्ये मेड इन इंडियाच्या औषधामुळे १८ बालकांचा मृत्यू, नक्की झाले तरी काय?

तीन चाचण्या गरजेच्या
कोणत्याही औषधाची टेस्टिंग करण्यासाठी या तीन तपासण्या गरजेच्या असतात. यापैकी एका मध्ये सुद्धा औषध पास न झाल्यास त्याला असुरक्षित मानले जाते. बहुतांश प्रकरणात सिरपमध्ये डायथिलीन ग्लाइकॉलचे प्रमाण अधिक असते. हा एक अत्यंत धोकादायक पदार्थ आहे. याच्या अधिक प्रमाणामुळे डोकेदुखी, उल्टी अशा समस्या उद्भवतात. काही वेळेस किडनी फेल ही होऊ शकते.

ओव्हरडोसमुळे होतो मृत्यू
काही देशांमध्ये डॉक्टर औषध लिहून देतात. पण त्याच्या डोसची योग्य माहिती देत नाहीत. काही वेळेस लोक बेजाबदादरपणामुळे अधिक डोस घेतात. उज्बेकिस्तान मध्ये मुलांचा मृत्यू झाल्याचे कारण ही सिरपचा ओव्हरडोस घेणे असू शकते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.