Home » WhatsApp चॅट करण्याप्रकरणी महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक, सर्वेतून खुलासा

WhatsApp चॅट करण्याप्रकरणी महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक, सर्वेतून खुलासा

by Team Gajawaja
0 comment
WhatsApp chatting
Share

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्सअॅ किंवा अन्य कोणत्याही अॅपचा वापर आजकाल खुप वाढला गेला आहे. एखाद्या समस्येचे निराकरण जरी शोधायचे झाले, एकमेकांशी बोलायचे झाले तरीही लोक या अॅपचा वापर करतात. कधी कधी चॅट मेसेज पाठवून ही सर्व माहिती मिळवतात. पण महिलांच्या प्रकरणात असे नाही आहे. व्हॉट्सअॅपवर चॅट करणाऱ्या महिलांना फोनवर बातचीत करणे अगदी सोप्पे वाटतेच पण त्यांना अधिक ते गुप्त असल्याचे ही वाटते. व्हॉट्सअॅपवर चॅट करण्याच्या तुलनेत महिला या पुरुषांच्या पुढे आहेत. खास गोष्ट अशी की, एका मेंटल हेल्थ ऑर्गनाइजेशनच्या क्रमांकावर ही काही महिलांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फोन केला. (WhatsApp chatting)

मानसिक आरोग्य संगठना वंद्रेवाला फाउंडेशन यांच्या फ्री राष्ट्रीय हेल्पलाइनच्या ३ महिन्याच्या आकडेवारीवरुन असे कळते की, फाउंडेशनच्या हेल्पलाइनवर मानसिक समस्यांबद्दल सल्ला आणि मदत मागणाऱ्या बहुतांश तरुणांनी व्हॉट्सअॅपचा वापर केला आहे. तर मध्यम वयोगट आणि त्यावरील लोकांनी टेलिफोनिक बातचीत करणे अधिक पसंद केले आहे.

आकडेवारीनुसार असे कळते की, बहुतांश तरुण आपल्या मानसिक आरोग्याच्या मदतीसाठी व्हॉट्सअॅपचा वापर करत असून त्यांना ते उत्तम माध्यम मानले जाते. १८ वर्षापेक्षा कमी वयोगटातील ६५ टक्के, १८-३५ वयोगटातील ५० टक्के, ३५-६० वयोगटातील २८.३ टक्के आणि ६० वर्षापेक्षा अधिक वयोगटातील लोकांनी मानसिक आरोग्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर केला आहे.

५३ टक्के महिला तर पुरुषांची आकडेवारी ४२ टक्के
फाउंडेशनच्या डेटानुसार, जवळजवळ ५३ टक्के महिला व्हॉट्सअॅप चॅटचा वापर करुन हेल्पलाइनवर संपर्क करणे पसंद करतात. तर ४२ टक्के पुरुष व्हॉट्सअॅप चॅटचा वापर करणे पसंद करतात. तर अन्य प्रकरणांमध्ये लोक टेलिफोनद्वारे काउंसिलिंग घेतात. (WhatsApp chatting)

खास गोष्ट अशी की, व्हॉट्सअॅपने त्या वर्गाला सर्वाधिक दिलासा दिला आहे जो कधीच मानसिक आरोग्यासाठी मदत ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच क्लिनिकला जाऊन घेऊ शकत नाही. खासकरुन अशा महिला, तरुणी आणि तरुण जे आपल्या परिवार अथवा मित्रमंडळींना न सांगताच आपल्या मानसक आरोग्याबद्दलच्या चर्चा करु पाहतात त्या व्हॉट्सअॅपचा वापर करतात. त्या त्याला गोपनिय मानतात आणि वेळेनुसार उपलब्ध होत असल्याने सायलेंट पद्धतीन आपल्या समस्यांवर तोगडा मिळवतात.

हे देखील वाचा- वयाच्या २१ वर्षानंतर महिलांनी जरुर केली पाहिजे ‘ही’ चाचणी, कॅन्सरच्या धोक्यापासून रहाल दूर

आत्महत्येच्या विचारामुळे लोक ग्रस्त
फाउंडेशनच्या प्रमुख प्रिया हिरानंदानी यांनी असे म्हटले की, आमच्याशी संपर्क करणाऱ्या एक तृतीयांश लोकांनी असे सांगितले मानसिक आजार, चिंता. संधी आणि आत्महत्येच्या विचाराने ग्रस्त झाले आहेत. भले ही आज देशात प्रत्येक मेडिकल विद्यार्थी मनोचिकित्सक झाला असेल. पण आमच्याकडे मानसिक आरोग्यासंबंधित समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुरेशी लोक नाहीत. त्याचसोबत मेंटल हेल्थची मदत घेणाऱ्या लोकांच्या मनातून भीती दूर करणे आवश्यक आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.