Home » होर्डिंग लावण्यासाठी पाळावे लागतात ‘हे’ नियम

होर्डिंग लावण्यासाठी पाळावे लागतात ‘हे’ नियम

'हे' नियम धाब्यावर बसवल्यानेच घडली घाटकोपर होर्डिंग दुर्घटना

by Team Gajawaja
0 comment
Share

१३ मे रोजी मुंबई आणि नजीकच्या परिसरात वादळी वाऱ्यासह प्रचंड जोरदार पाऊस पडला. कित्येक ठिकाणी तर वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊसही पडला. (Ghatkopar Hoarding)

मुंबईत अचानक पडलेल्या या पावसामुळे आणि वादळी वाऱ्याने बऱ्याच ठिकाणी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली, मुंबईची लाईफलाइन मानली जाणाऱ्या लोकल सेवेवरही याचा परिणाम झाला.

या वादळी वाऱ्याने घाटकोपरच्या (Ghatkopar Hoarding) परिसरात एक मोठे लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये तब्बल १४ जणांचा जीव गेला असून ७५ पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

होर्डिंग (Ghatkopar Hoarding) कोसळण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी पुण्यातही तीनवेळा असा प्रकार घडून लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. पण पुण्याच्या तुलनेत मुंबईतील या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या ही अधिक असल्याने या प्रकाराची जास्त चर्चा होत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार मुंबईत फक्त ४० बाय ४० फुटांचेच होर्डिंग लावण्याची परवानगी आहे, परंतु घाटकोपर पेट्रोल पंपजवळील होर्डिंग हे १२० बाय १२० चौरस फुटांचे होते. महानगरपालिकेचे नियम धाब्यावर बसवून लावण्यात आलेल्या या अनधिकृत होर्डिंगवरुन (Ghatkopar Hoarding) एक नवीन वाद उद्भवला आहे.

Ghatkopar Hoarding

मुंबईत अशी मोठमोठी होर्डिंग (Ghatkopar Hoarding) बरीच आहेत परंतु घाटकोपर मध्ये घडलेल्या घटनेमुळे आता या होर्डिंग प्रकारावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुंबईत होर्डिंग लावायचे असल्यास काय नियम पाळावे लागतात? अनधिकृत, बेकायदेशीर होर्डिंग कशी ओळखायची याबाबतीतच आपण आजच्या लेखामधून जाणून घेणार आहोत.

बीबीसी मराठीने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सुमारे १०२५ अधिकृत होर्डिंग आहेत आणि यापैकी १७९ होर्डिंग्स ही रेल्वेच्या हद्दीत येतात. यापैकी बरीच होर्डिंग्स ही अनधिकृत असल्याचे स्पष्ट होत आहे. (Ghatkopar Hoarding)

२०११ मध्ये या अनधिकृत होर्डिंगबाबत दाखल केलेल्या याचिकेनंतर या होर्डिंग लावण्याची प्रक्रियेत आणि नियमावलीत बरेच बदल करण्यात आले. होर्डिंगची ऊंची ही जमिनीपासून ४० बाय ४० असायला हवी आणि त्याहून अधिक ऊंचीचे होर्डिंग (Ghatkopar Hoarding) रहिवासी भागात लावले जाऊ नये असे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत.

इतकंच नव्हे तर जमिनीपासून ७५ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या होर्डिंगसाठी (Ghatkopar Hoarding) परवानगी ही अपवादात्मक परिस्थितीतच दिली जाऊ शकते. एक्सप्रेसवे आणि हायवेवर ४० बाय ४० याच ऊंचीचे होर्डिंग लावायची परवानगी देण्यात आली आहे.

===

हेदेखील वाचा : जामीनावर बाहेर आलेले केजरीवाल भाजपावर भारी पडणार का?

===

मुंबईत होर्डिंग लावण्यासाठी हे काही महत्त्वाचे निकष पाळण आवश्यक असते. ज्या होर्डिंगमुळे (Ghatkopar Hoarding) घाटकोपरमध्ये एवढी मोठी दुर्घटना झाली हे याहून तीनपट मोठे असल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नियम तयार केले जात असले तरी त्यांची अंमलबजावणी योग्यपद्धतीने होत नसल्याने या दुर्घटना घडत असल्याचे प्रामुख्याने सांगितले जात आहे.

होर्डिंगवर (Ghatkopar Hoarding) एक्सपायरी डेट किंवा लायसन्स नंबर लिहिलेला असतो ती अधिकृत होर्डिंग्स असतात, आणि ज्यावर यापैकी काहीच लिहिलेलं नसतं ती अनधिकृत होर्डिंग्स असतात. तसेच या अनधिकृत होर्डिंग्सबद्दल मुंबईकर महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तक्रार नोंदवू शकतात.

hoarding

मागील चार वर्षात पुण्यात तब्बल ३ वेळा अशी होर्डिंग कोसळून जीवितहानी झालेली आहे. २०१८ मध्ये पुण्यातील जुना बाजार परिसरात असेच होर्डिंग कोसळून ३ लोकांचा मृत्यू झाला होता. तर २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड परिसरात एक लोखंडी होर्डिंग कोसळून तब्बल ५ जणांचा मृत्यू झाला होता.

नुकतंच २०२४ च्या एप्रिल महिन्यात एका दिवसाच्या फरकाने तब्बल दोन वेळा वाघोली येथील साई सत्यम पार्क परिसरात असेच होर्डिंग (Ghatkopar Hoarding) कोसळले होते. यावेळी जीवितहानी टळली, परंतु ४ ते ५ कार्सचे प्रचंड नुकसान झाले होते.

यानंतरच घाटकोपरमध्ये (Ghatkopar Hoarding) झालेल्या दुर्घटनेमुळे पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनधिकृत होर्डिंग्सवर सरकारने त्वरित कारवाई करावी.

पावसाळा तोंडावर असताना पुन्हा कोणत्याही शहरात वादळी वारा किंवा पावसामुळे अशी दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत अशी विनंतीही होताना दिसत आहे. यावर आता कारवाई होणार की नाही हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल!


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.