Home » ‘या’ राशींसाठी ‘हा’ आठवडा ठरू शकतो धोकादायक

‘या’ राशींसाठी ‘हा’ आठवडा ठरू शकतो धोकादायक

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 03 Apr to 09 Apr)

मेष – आपल्या राशीतून होणारे बुध, शुक्र आणि राहूचे भ्रमण आपणास नावलौकिक देणारे राहील. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. पंचमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण संततीच्या उत्कर्षाची वार्ता देणारे राहील. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यात विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे काम केले तर एखादी सवलत मिळेल. वैराण वाळवंटाची वाट संपून यशोमार्गावरील घोडदौड चालू झाल्याने आपला आनंद दुणावेल. स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी सतत प्रयत्नशील राहाल. आठवड्याच्या उत्तरार्धात कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये.

शुभ दिनांक – 3 ते 5

वृषभ – राशीच्या व्ययस्थानातून बुध, शुक्र राहूचे भ्रमण होत आहे. मोठी खरेदी केली जाईल. सहलीत सहभागी व्हाल. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायातून लाभ होतील. आपली कामे पूर्ण करून घेण्यासाठी बोलण्यात मृदुता आणण्याची गरज आहे. एखादा कठोर शब्द आपले काम बिघडवू शकतो. भावंडांसाठी खर्च केला जाईल. घरात सतत पाहुण्यांची वर्दळ राहील. जिवाभावाचे नातेवाईक भेटतील आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. समाजासाठी काही मदत करण्याची सुसंधी लाभेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश मिळेल. शुभ समारंभात सहभागी व्हाल. उत्तरार्धात जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवसायातून नवीन संधी मिळतील.

शुभ दिनांक – 8, 9

मिथुन – आपल्या राशीच्या पराक्रम स्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण धाडसी निर्णय घेणारे राहील. राशीतील मंगळामुळे आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. आपला आत्मविश्वास आणि मनोबल उत्तम राहील. अनुकूल ग्रहमानामुळे जीवनात आनंदाची बहार येईल आवडत्या छंदासाठी वेळ द्याल. सांस्कृतिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. आपला आनंद, उत्साहत द्विगुणीत होणाऱ्या घटना घडतील. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीतून झालेल्या चर्चेत रेंगाळलेल्या प्रश्नावर तोडगा निघेल. महिलांना बदलाची नितांत आवश्यकता भासेल. शैक्षणिक क्षेत्रात परदेशी संस्थांशी संबंध येईल. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल.

शुभ दिनांक – 4, 5

कर्क – आपल्या राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण मोठ्या प्रमाणावर अचानकपणे आर्थिक उलाढली घडवणारे राहील. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. कर्मस्थानातील बुध, शुक्र, राहू आपल्या कार्यक्षेत्रातून आपली प्रसिद्धी वाढवणारे राहतील. अंगभूत कलागुणांना चांगला भाव मिळेल. काळ, काम आणि वेग या त्रिसूत्रीचा वापर आपली वेगवान प्रगती होण्यास कारणीभूत ठरेल. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. भावंड सौख्य लाभेल. आईच्या प्रकृतीची काळजी वाटेल. धार्मिक शुभ समारंभाच्या निमित्ताने जीवाभावाचे नातेवाईक भेटतील. उत्तरार्धात संततीच्या उत्कर्षाची वाढता कानी येईल.

शुभ दिनांक – 7, 8

सिंह – आपल्याच राशीतून होणारे चंद्राचे भ्रमण कुटुंबातील वातावरण आनंदी उत्साही बनवणारे राहील. जोडधंद्यातून चांगली आर्थिक आवक होईल. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली कराल. नवीन कामाची सुरुवात करताना मात्र योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. व्यवसायातील आत्मविश्वास व कामाचा वेग दुणावेल. जुनी येणी वसूल होतील. कामे मार्गी लावण्यासाठी प्रवास करावा लागेल. महिला स्वतःच्या आवडीनुसार गृहसजावटीसाठी खरेदी करतील. घरातील दुर्लक्षित कामाला वेळ देता येईल. दैनंदिन कामातून विरंगुळा म्हणून एखाद्या छोट्याशा सहलीचे आयोजन कराल.

शुभ दिनांक – 3, 4

कन्या – आपल्या राशीचे व्यवस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण व्यावसायिक कामाच्या निमित्ताने प्रवास घडवणारे राहील. तसेच कामानिमित्त परदेशी संस्थांशी संबंध येतील. व्यवसाय उद्योगात मोठे करार केले जातील. भावंडांचा सल्ला फार महत्त्वाचा ठरेल. या आठवड्यात आपल्याला नशिबाची चांगली साथ लाभणार आहे. स्वतःची मतं आणि अपेक्षा आपल्या कृतीतून दिसून येतील, आणि त्या पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्यांचे सहाय्य लाभेल. आपल्या कार्यक्षेत्रातून नवनवीन उपक्रम राबवले जातील. मानसिक स्थिरता लाभेल. धार्मिक शुभ समारंभात सक्रिय सहभाग घ्याल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना समाजात चांगला नावलौकिक लाभेल. कलाक्षेत्रातून व्यावसायिक प्रदर्शने भरवता येतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचा लाभ घ्याल.

शुभ दिनांक – 4 ते 6

तूळ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या लाभस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. सप्तमस्थानात आलेले बुध, शुक्र लेखक, कवी, कलाकारांना भाग्यकारक ठरतील. नवनवीन कल्पना आकार घेतील. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. सामाजिक कार्यातून पतप्रतिष्ठा लाभेल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील दुसऱ्या बद्दलचे मत व्यक्त करताना त्यांची बाजू ऐकून घ्या. आपले मत कठोर शब्दात व्यक्त करणे टाळावे. या आठवड्यात कितीतरी आनंदाचे क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. उत्तरार्धात अनपेक्षित धनलाभ होतील.

शुभ दिनांक – 7 ते 9

वृश्चिक – आपल्या राशीच्या दशमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण बेकारांना नोकरीच्या सुसंधी देणारे राहील. आपली कर्तव्य भावना जागृत ठेवून इतरांना मदत कराल. घरातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्याल. व्यवसायातील महत्त्वाचे सौदे पार पडण्यासाठी प्रवास करावा लागेल. नव्या जोमाने कामाच्या विस्ताराचा ध्यास घ्याल. तरुणांच्या कौशल्याला वाव मिळेल. समाजात आपली पतप्रतिष्ठा वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आपला आत्मविश्वास आणि महत्त्वकांक्षा वाढेल. एखाद्या वादावर पडदा पडेल. सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभेल. हीतशत्रूंच्या कारवायांवर विजय मिळवाल. व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाईल. परंतु गुंतवणूक करताना अथवा व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेताना हितचिंतकांची मदत घ्या. अचानक खर्च उद्भवतील.

शुभ दिनांक – 3 ते 5

धनु – आपल्या राशीच्या सुखस्थानात रवी, गुरु, पंचमस्थानात बुध, शुक्र, राहूू तर सप्तम स्थानात मंगळ अशी या आठवड्यातील ग्रहस्थिती आहे. चंद्राचे प्रमाणभाद्य स्थानातून होत आहे. दैनंदिन जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सहलीचे आयोजन केले जाईल. ‌ सामाजिक धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग द्याल समाजात मानाचे स्थान लाभेलसामाजिक धार्मिक कार्यात सक्रिय सहभागी घ्याल. समाजात मानाचे स्थान लाभेल. स्वतःची मतं, कृती आणि अपेक्षा यांच्या नियंत्रण ठेवावे. इच्छित गोष्टी सहज साध्य होतील. तीर्थस्थळांना भेटी द्याल. हातून पुण्य कर्म घडेल. नोकरीतील कामानिमित्त मन्याजोग्या ठिकाणी बदलीची ऑर्डर येईल. कुटुंबात मंगल कार्याची नांदी झाल्यामुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील.

शुभ दिनांक – 7,8

मकर – राशीच्या अष्टमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण मनस्वास्थ्य बिघडवणारे राहील. काही मनाविरुद्ध घटना घडल्यामुळे त्रास होऊ शकतो परंतु त्यावर आपण चर्चेतून मार्ग काढाल. दिनांक चार रोजी भाग्यस्थानात जाणारा चंद्र आपली रेंगाळलेली कामे मार्गी लावेल. तीर्थस्थळांना भेटी द्याल तसेच कामानिमित्त प्रवास घडतील. नोकरी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. नवीन व्यावसायिक सौदे होतील. नोकरीत भरती बदलीचे योग येतील. सरकारी वाहन लाभेल. आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर मोठी मजल माराल. क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना नावलौकिक मिळेल. स्वतःची प्रतिष्ठा वाढवणारी खरेदी केली जाईल. जोडधंद्यात वाढ करण्याच्या निमित्ताने नवनवीन उपक्रम राबवले जातील. नवीन कल्पना आकार घेतील. जुने मित्र भेटतील. एखाद्या संघटनेचे नेतृत्व कराल.

शुभ दिनांक – 7 ते 9

कुंभ – आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ करणारे राहील. आपल्या कामात होणारी वेगवान प्रगती आपणास निश्चित जाणवेल. या आठवड्यातील ग्रहांची बैठक आपणास पुरक व सुख समाधान देणारी असेल. स्थावर मालमत्ते संबंधातील कागदपत्रे हाती लागतील. मात्र कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून कोणताही निर्णय घेऊ नका. कुटुंबातील वयस्कर व्यक्तीच्या कर्तृत्व भावनेमुळे आपणास दिलासा मिळेल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यवसाय उद्योगात होणारी धावपळ यामुळे होणारी तारेवरची कसरत आपणास नवनवीन अनुभव देणारी राहील. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. परदेशस्थ भावंडांची सुसंवाद साधाल.

शुभ दिनांक – 7, 8

मीन – आपल्या राशीच्या षष्ठ स्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या संभाषण चातुर्याच्या जोरावर महत्वाची कामे विनासायास पार पडतील. न्यायप्रविष्ट प्रकरणात आपल्या बाजूने निर्णय लागल्याने मानसिक स्वस्थता लाभेल. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल. नोकरी व्यवसाय निमित्ताने परदेशी संस्थांशी सुसंवाद साधाल. कामानिमित्त घडलेल्या प्रवासातून कार्यसिद्धी लाभेल. प्रवासात आपले खिसा पाकीट आणि महत्त्वाची कागदपत्रे सांभाळावीत. आपल्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज करून घेऊ नका.

शुभ दिनांक – 9

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.