Home » तुंगनाथ मंदिराबाबत इशारा

तुंगनाथ मंदिराबाबत इशारा

by Team Gajawaja
0 comment
Tungnath Temple
Share

जगातील सर्वात मोठे शिवमंदिर असलेल्या रुद्रनाथ उत्तराखंडमधील तुंगनाथ मंदिराचे (Tungnath Temple) अस्तित्व धोक्यात आले आहे. तुंगनाथ मंदिर भगवान शिवाला समर्पित असून तुंगनाथ पर्वतावर वसलेले आहे. हिमालयाच्या कुशीत असलेले हे मंदिर यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. तुंगनाथ मंदिर (Tungnath Temple) हे जगातील सर्वात मोठे शिव मंदिर असून हजारो वर्षे जुने असल्याचे मानले जाते. याच शिवमंदिराबाबत भारतीय पुरातत्व विभागानं एक अहवाल दिला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. तुंगनाथ शिव मंदिराची (Tungnath Temple) रचना हळूहळू वाकत आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसार, मंदिराच्या संरचनेचा कल 6 अंश आहे तर त्याच्या मूर्ती 10 अंश झुकल्याचा अनुमान काढण्यात आला आहे. 12 हजार 800 फूट उंचीवर असलेले हे मंदिर जगातील सर्वात उंच शिवमंदिर आहे. या मंदिराला संरक्षित घोषीत करण्याची मागणी पुरातत्व विभागानं केली आहे. मात्र स्थानिक पुजा-यांनी याला विरोध केला आहे. तुंगनाथ महादेव मंदिराचे (Tungnath Temple) हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. चारधाम यात्रा करणारे भाविक या तुंगनाथ मंदिरात आवर्जून जातात. कितीही कठिण असली तरी भगवान तुंगनाथाचे दर्शन भाविक घेतात.आता हेच मंदिर झुकले असून त्याचा ढाचा कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या अहवालामुळे खळबळ उडाली आहे.  

भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसार तुंगेश्वर मंदिराला संरक्षित घोषित करावे, अशी सूचना सरकारला करण्यात आली आहे. या सूचनेनंतर तुंगनाथ मंदिराला (Tungnath Temple) राष्ट्रीय महत्त्वाचा दर्जा देऊन संरक्षित म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.   हे पुरातन मंदिर का झुकले याबाबत भारतीय पुरातत्व विभाग कारणांचा अभ्यास करीत आहे. तुंगनाथ शिव मंदिर 8व्या शतकात कलचुरी शासकांनी बांधले होते. अर्धाअधिक वर्ष हे मंदिर बर्फाच्या खाली असते. या मंदिराच्या वाकण्याचे नेमके हेच कारण आहे की, अन्य दुस-या कारणामुळे मंदिर खाली झुकले आहे, याबाबत आता शोध घेण्यात येत आहे.  

भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसार मंदिर असेच खाली वाकले तर ते कोसळण्याचा धोका आहे. तुंगनाथ शिव मंदिराची संरचनेत 6 अंश झुकल्याचे आढळून आले आहे. त्याशिवाय मंदिराच्या आवारात बांधलेल्या लहान वास्तू आणि मूर्तीं 10 अंशांनी झुकलेल्या आढळून आल्या आहेत. पुरातत्व विभागाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर कधीही कोसळू शकते. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. तसेच मंदिराचा पाया पुन्हा भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  मंदिर झुकण्याचे प्रमुख कारण जमिनीची धूप असल्याचे मानले जात आहे.  तसेच जमिनीअंतर्गत होणा-या हालचालींमुळेही मंदिराचा पाया कमकुवत झाल्याचे सांगण्यात आले आहे.  तुंगनाथ शिव मंदिर (Tungnath Temple) 8 व्या शतकात कलचुरी शासकांनी बांधले होते. हे मंदिर बद्री केदार मंदिर समिती अंतर्गत येते.

तुंगनाथ मंदिर (Tungnath Temple) उत्तराखंडच्या प्राचीन धार्मिक सांस्कृतिक वारशाचा अतूट भाग आहे. आता या मंदिराबाबत धक्कादायक अहवाल पुढे आल्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे मंदिर सोपवण्यास मंदिर समितीनं आक्षेप घेतला आहे. हा आक्षेप दूर करत मंदिराची नव्यानं पायाभरणी करण्याचे आव्हान पुरातत्व विभागाकडे आहे.   

====

हे देखील वाचा : रोगांपासून मुक्त करणारी शिमल्याची हटेश्वरी माता

====

तुंगनाथ मंदिर (Tungnath Temple) 1000 वर्षांहून अधिक जुने असल्याचे मानले जाते. भगवान शंकराच्या ‘पंचकेदार’ रूपांपैकी एकाची येथे पूजा केली जाते. ग्रॅनाईट दगडांनी बनलेले हे भव्य मंदिर पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक येथे येतात. येथे शिवाच्या हृदयाची आणि बाहूंची पूजा केली जाते. स्थानिक कथेनुसार जेव्हा भगवान रामाने रावणाचा वध केला तेव्हा त्यांनी ब्रह्महत्येच्या शापापासून मुक्त होण्यासाठी येथे शिवाची तपश्चर्या केली होती. तेव्हापासून या ठिकाणाचे नाव ‘चंद्रशिला’ म्हणूनही प्रसिद्ध झाले.  पंचकेदारांपैकी दुसरे केदार म्हणून ओळखले जाणारे तुंगनाथ मंदिर हे शिवाचे सर्वोच्च निवासस्थान आहे. मंदिरापासून थोड्या अंतरावर असलेली चंद्रशिला भगवान रामाला खूप आवडली होती. तिथेच बसून प्रभू रामांनी तपश्चर्या केली होती.  

दरम्यान फक्त तुंगनाथाचे मंदिरच (Tungnath Temple) नाही तर बागेश्वरच्या कांडा परिसरातील 10 व्या शतकातील प्राचीन कालिका मंदिराचे  अस्तित्वही धोक्यात आले आहे. या मंदिराला अनेक भेगा पडल्या असून स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मंदिर सतत एका बाजूला झुकत आहे. या मंदिराचीही पाहणी भारतीय पुरातत्व विभागानं करावी अशी मागणी करण्यात आली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.