भारतात आपली संस्कृती, खानपान, लोकसंगीत आणि पेहरावामुळे खास ओळख असलेल्या राजस्थानात असे एक गाव आहे जेथे बहुतांश पुरुषांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच त्या गावाला विधवांचे गाव असे म्हटले जाते. येथील परिस्थिती ऐवढी वाईट आहे की, महिलांना आपले आणि परिवाराचे पोट भरण्यासाठी मजूरीचे काम करावे लागत आहे. या गावातील बहुतांश महिला पैसे मिळावे म्हणून १०-१० तास वाळूचे खडक फोडणे आणि त्यांना कोरण्याचे काम करतात.(Village of Widows)
राजस्थान मधील बूंदी जिल्ह्यातील बुधपुरा गावातील विधवा महिलांचे आयुष्य संघर्षात्मक आहे. याच दरम्यान असा प्रश्न उपस्थितीत केला जातोय की, पुरुषांचा ऐवढ्या प्रमाणात मृत्यू का होत आहे? या प्रश्नावर कोणतेही संशोधन किंवा अभ्यास करण्यात आलेला नाही. काही रिपोर्ट्सनुसार, येथील पुरुषांचा मृत्यूचे कारण हे बुधपुराच्या खाणी आहेत. खरंतर या खाणीत काम केल्याने पुरुषांना सिलिकोसिस नावाचा गंभीर आजार झाला होता. त्यांच्यावर वेळेवर योग्य उपचार न करण्यात आल्याने बहुतांश पुरुषांचा मृत्यू झाला.
हैराण करणारी गोष्ट अशी की, या सर्व महिलांना आपल्या पतीच्या निधनाचे कारण कळल्यानंतर ही मुलांचे पोट भरण्यासाठी त्यांना त्याच खाणीत काम करावे लागत आहे. राजस्थान मधील बुधपुरामध्ये वाळूच्या खडकांना कोरण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. या खडकांना कोरताना त्यामधून निघणारा सिलिका डस्ट कामगारांच्या फुफ्फुसात जातो. यामुळे फुफ्फुसात संक्रमण होते. मात्र वेळेवर संक्रमणाबद्दल कळले तर उपचार होऊ शकतात आणि कामगाराचा जीव वाचवू शकतो. मात्र बहुतांश प्रकरणात कामगारांना याबद्दल उशिराने कळले गेले.
मुलं उपाशी राहू नयेत म्हणून त्या विधवा महिला खाणीत काम करतात. ऐवेढेच नव्हे तर मुलं सुद्धा परिवाराला मदत म्हणून हे काम करतात. डॉक्टरांकडे गेल्यानंतर बहुतांश रुग्णांना श्वसनासंबंधित समस्या उद्भवल्या होत्या. स्थिती ऐवढी वाईट होती की, रुग्णांची ५० टक्के चाचणी केल्यानंतर सिलिकोसिस आजार झाल्याचे कळते.काही रुग्ण अशावेळी डॉक्टरांकडे येतात जेव्हा स्थिती अधिक बिघडलेली असते. आजाराच्या या स्टेजवर उपचार केल्यानंतर ही त्याचा फायदा रुग्णाला होत नाही. (Village of Widows)
हेही वाचा- करोडपतींचे गाव- हिवरे बाजार
काही रिपोर्ट्समध्ये असा खुलासा करण्यात आला की, बुधपुरा खाणीत काम करणे असुरक्षित आहे. या खाणीत काम करणाऱ्या कामगारांना जीवघेणा आजार सिलिकोसिसचा धोका असतो. डीडब्लूच्या रिपोर्टनुसार एका महिलेने असे म्हटले, तिचा नवरा वाळूच्या खडकाच्या खाणीत काम करायाचा. हळूहळू तो आजारी पडू लागला. अखेर आजार त्याच्या फुफ्फुसांपर्यंत गेला आणि त्याचा मृत्यू झाला.