Home » Vastu Tips For Home: घरात कुबेर यंत्र ठेवताय? या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा….

Vastu Tips For Home: घरात कुबेर यंत्र ठेवताय? या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा….

तुम्ही आयुष्यात आर्थिक संकटांचा सामना करत असल्यास घरात कुबेर यंत्र लावू शकता. पण कुबेर यंत्र लावण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. याचबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

by Team Gajawaja
0 comment
Vastu tips for home
Share

 Vastu Tips for Home: तुम्ही आयुष्यात धनामुळे नेहमीच त्रस्त राहता का? आर्थिक चणचणीमुळे काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशातच तुम्ही घरात कुबेर यंत्र ठेवू शकता. यामुळे पैशांसंबंधित समस्या दूर होऊ शकतात. मात्र कुबेर यंत्र घरात ठेवण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य दिशेला कुबेर यंत्र ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

हिंदू धर्मात कुबेर देवाची पूजा धन प्राप्तिसाठी केली जाते. घरात उत्तर दिशेला कुबेर देवतेचा वास असतो असे मानले जाते. अशी मान्यता आहे की, धनाची देवता कुबेर असल्याने ज्यांच्या घरात त्यांची स्थापना केली जाते ते आर्थिक समस्यांपासून दूर राहतात. यामुळे वास्तु दोषापासून दूर राहण्यासाठी घरात उत्तर दिशेच्या भितींवर कुबेर यंत्र लावावे.

kuber yantra

kuber yantra

वास्तुशास्रानुसार, घरात तिजोरीत कुबेर यंत्र ठेवावे. पण तिजोरीचे दार नेहमीच उत्तर दिशेला उघडणारे असावे. हे केल्याने भगवान कुबेराचे आशीर्वाद मिळतात. याचसोबत देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते. (Vastu Tips for Home)

कुबेर यंत्र लावताना योग्य दिशेकडे लक्ष द्या
घरात कुबेर यंत्र लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यासाठी कुबेर यंत्राची विधी विधान पूजा केल्यानंतरच उत्तर दिशेला लावावे. यामुळे कुबेर देवाचा आशीर्वाद मिळतो. तसेच घरातील आर्थिक संकट दूर होण्यास मदत होते. याशिवाय रखडलेली कामे देखील हळूहळू मार्गी लागतात. यामुळे घरात कुबेर यंत्र लावण्यापूर्वी योग्य दिशेकडे लक्ष द्यावे.

धातुचा कासव
याशिवाय घरात धातुचा कासव ठेवणे ही शुभ मानले जाते. धातुचा कासव उत्तर दिशेला ठेवणे उत्तम मानले जाते. या उपायाने कुबेर देवाचा आशीर्वाद मिळतो. जे लोक आर्थिक समस्यांचा सामना करत असतील त्यांनी घरात धातुचा कासव ठेवावा असे वास्तुशास्रात सांगितले आहे. यामुळे वास्तुदोषही दूर होतात.

फिश टँक
वास्तुशास्रानुसार, घर नेहमीच स्वच्छ आणि व्यवस्थितीत असावे. जेणेकरून घरात सकारात्म उर्जा निर्माण होतील. याशिवाय उत्तर दिशेला फिश टँक ठेवणे शुभ मानले जाते.

(टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.)


आणखी वाचा: प्रभूरामांच्या आरतीसाठी वापरण्यात येणार 20 वर्ष जुनं तुप


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.