सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यवहार हे डिजिटल पद्धतीने केले जातात. त्यासाठी विविध डिजिटल पेमेंटचे प्लॅटफॉर्म सुद्धा उपलब्ध आहेत. अशातच जर तुम्ही डिजिटल ट्रांजेक्शन करत असाल तर ही तुमच्यासाठी फार महत्वाची बातमी आहे. कारण नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) थर्ड पार्टी अॅप प्रोवाइडर्स (TRAP) द्वारे चालवली जाणारी UPI पेमेंट सेवेसाठी एकूण देवाणघेवाणीची मर्यादा ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या निर्णयावर आरबीआयसोबत बातचीत केली जात आहे. एनपीसीआयच्या या निर्णयाला लागू करण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंतचा कालावधी दिला गेला आहे. या वेळी देवाणघेवाणीची कोणतीही मर्यादा नाही. अशातच दोन कंपन्या गुगल पे आणि फोन पे ची बाजारातील जबाबदारी वाढून जवळजवळ ८० टक्के झाली आहे. (UPI Payment Transaction)
गेल्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात ठेवला होता प्रस्ताव
NCPI ने नोव्हेंबर २०२२ मधअये एकाधिकारच्या जोखिमेपासून बचाव करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप प्रोव्हाइडर्ससाठी ३० टक्के देवाणघेवाणीची मर्यादा ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, या संबंधित सुत्रांनी असे म्हटले की, यावर व्यापक रुपात विचार करण्यासाठी एक बैठक ही बोलावली आहे. या बैठकीत एनपीसीच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अर्थ मंत्रालय आणि आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा हिस्सा घेतला.
रिपोर्ट्सनुसार, सुत्रांनी असे म्हटले की सध्या एनपीसीच्या सर्व संभावनांचे मुल्यांकन केले जात आहे आणि ३१ डिसेंबर पर्यंतची मर्यादा वाढवण्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यांनी असे म्हटले की, एनपीसीआयला वेळीची सीमा वाढवण्यासाठी उद्योगाच्या हितधारकांकडून विरोध केला गेला आहे. त्याचाच तपास सुरु आहे. सुत्रांच्या मते, एनपीसीआय या महिन्याच्या अखेरपर्यंत युपीआय बाजार सीमा लागू करण्याच्या मुद्द्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. (UPI Payment Transaction)
हे देखील वाचा- आता गॅस सिलिंडरवर लावला जाणार QR कोड, अशा पद्धतीने करणार काम
या व्यतिरिक्त इंटरनेटशिवाय युपीआयच्या सुविधेचा वापर करता येऊ शकतो. तुम्ही इंटरनेटशिवाय युपीआयच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल बिलाचे पेमेंट ही करता येऊ शकते. ते तुम्ही 123PAY UPI सर्विसच्या मदतीने करु शकता. एनपीसीआयने नुकतीच घोषणा केली आहे की, 123PAY पॉवर बिल पेमेंट सर्विस आता ७० हून अधिक वीज बोर्डसाठी उपलब्ध असणार आहे. 123PAY सर्विस आणि भारत बिल पेमेंट सिस्टिमच्या वापरासह ग्राहक लवकरच आणि सोप्प्या पद्धतीने वीजेच्या बिलाचे पेमेंट करता येऊ शकते. वीजेच्या बिलाचे पेमेंट थेट बँक खात्यातून केले जाऊ शकते.