भगवान बुद्धांचा धर्म पूर्वेतील काही राष्ट्रांचा धर्म आहे. ज्यामध्ये जापान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, चीन, विएतनाम, ताइवान, थायलंड, कंबोडिया, हाँगकांगसह श्रीलंकेत सुद्धा बौद्ध धर्माचा आपल्याला वारसा लाभलेला दिसून येतो. तर भारतात, नेपाळ, मलेशिया, रशिया, संयुक्त राज्य अमेरिका, फ्रांन्स, ब्रिटेन, जर्मन, बांग्लादेश, पाकिस्तान, कॅनडा, सिंगापूर मध्ये ही बौद्ध धर्मियांची संख्या बहुतांश प्रमाणात आहे. दरम्यान, काही वर्षातच अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशात बौद्ध धर्मियांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे त्यांची संख्या कमी होत चालली आहे. तर भगवान गौतम बुद्धांबद्दल (Gautama Buddha) तुम्हाला अशा काही गोष्टी माहितीयेत का ज्या आजवर कोणीच सांगितल्या नाहीत.
-बुद्धांचे जन्मत: नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले होते. सिद्धार्थ यांचे वडिल शुध्दोदन कपिलवस्तूचे राजा होते. त्यांचा सन्मान नेपाळ मध्ये नव्हे तर भारतात ही केला जात होता. सिद्धार्थची मावशी गौतमी यांनीच त्यांचे पालनपोषण केले. कारण सिद्धार्थ यांच्या जन्मानंतर सात दिवसातच त्यांच्या आईचे निधन झाले होते.
हे देखील वाचा- जेव्हा लोकांनी Egyptian Mummies खायला सुरुवात केली, नेमके काय घडले असेल?
-गौतम बुद्ध (Gautama Buddha) हे शाक्यवंशी छत्रिय होते. शाक्य वंशात जन्मलेल्या सिद्धार्थ यांचा सोळाव्या वर्षातच दंडपाणि शाक्यांची कन्या यशोधरा यांच्यासोबत विवाह झाला. यशोधरा यांच्या पोटी जन्मलेल्या मुलाचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. त्यानंतर यशोधारा आणि राहुल हे दोघे बुद्ध भिक्षु झाले.
-बुद्धांच्या जन्मानंतर एका भविष्य करणाऱ्या व्यक्तीने राजा शुद्धोदन यांना म्हटले होते की, हा बालक चक्रवती सम्राट होईल. परंतु वैराग्य भाव निर्माण झाल्याने त्याला कोणीही बुद्ध होण्यापासून रोखू शकत नाही. याची ख्याती संपूर्ण संसारात अनंतकालापर्यंत कायम राहील. राजा शुध्दोदन यांना सिद्धार्थला चक्रवती सम्राट बनवायचे होते. यासाठी त्यांनी सिद्धार्थला सर्व गोष्टींचा उपभोग घेता येईल म्हणून सर्वकाही प्रबंध केला होता. जेणेकरुन सिद्धार्थच्या मनात वैराग्याची भावना उत्पन्न होऊ नये. हिच चूक शुद्धोदन यांनी केली आणि सिद्धार्थ यांच्या मनात वैराग्य निर्माण झाले.
-असे ही सांगितले जाते की, सिद्धार्थ यांनी आपला राज महलाचा त्याग करुन मध्यरात्री ३० किमी दूर असलेल्या गोरखपूर जवळील अमोना नदीच्या तटावर गेले. तेथे त्यांनी आपले महालातील वस्र काढून आणि केस कापून संन्यास घेतला. त्यावेळी त्यांचे वय २९ वर्ष होते. कठीण तपानंतर त्यांनी बोधी प्राप्त केला. बोधी प्राप्तीची घटना ईसवी सन ५२८ वर्षांपूर्वीची आहे. जेव्हा सिद्धार्थ यांचे वय ३५ वर्ष होते. भारतातील बिहार मध्ये बोधगयात आजही तो वटवृक्ष आहे ज्याला आता बोधीवृक्ष म्हणून संबोधले जात. सम्राट अशोकाने या वृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली होती आणि तेथे सुद्धा हा वृक्ष आहे.
हे देखील वाचा- औरंगाबादचे नाव का बदलले जात आहे? काय आहे संभाजीनगरची गोष्ट, घ्या जाणून
-बौद्ध धर्माचा प्रचार अधिकाधिक झाल्याने भिक्षुकांची संख्या वाढू लागली. तेव्हा भिक्षुकांच्या आग्रहास्तव बौद्ध संघाची स्थापना करण्यात आली. बौद्ध संघात बुद्धांनी स्रियांना सुद्धा सामील होण्यास परवानगी दिली. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर वैशालीत संपन्न द्वितीय बौद्ध संगितीत संघाचे दोन हिस्से झाले. ते म्हणजे हीनयान आणि महायान. सम्राट अशोकाने २४९ ई.पू. मध्ये पाटलीपुत्रात तृतीय बौद्ध संगीतिचे आयोजन केले होते. त्यानंतर खुप प्रयत्नानंतर सर्व भिक्षुकांना एकाच प्रकारच्या बौद्ध संघात ठेवण्यासह देशात आणि काळानुसार त्यामध्ये बदल घडत गेला.
जगातील असे एकही ठिकाण नाही जेथे बौद्ध भिक्षुकांनी आपले पाऊल ठेवलेले नाही. जगभरातील सर्व ठिकाणी भगवान बुद्धांच्या प्रतिमा उत्खननात आजही सापडतात. बुत परस्ती शब्दाचा शोध ही बुद्ध शब्दापासून झाला आहे.