नुकतीच गुगलने २०२१ सालच्या ‘टॉप टेन सर्चेस’ची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय नागरिकांनी गुगलवर सर्च केलेले ‘How to’ आणि ‘what is’ या कॅटॅगरीमधील टॉप १० रिझल्टही जाहीर केले आहेत (Top 10 Asked Questions). ही यादी भारतीयांच्या आयुष्यावर झालेला कोव्हीडचा परिणाम तर स्पष्ट करतेच, पण या यादीमधले काही सर्च रिझल्ट्स धक्कादायक आणि विचार करायला लावणारे आहेत.
कसे (How to)?
एखादी गोष्ट कशी करायची, हे आपल्याला माहिती नसेल, तर आपण सर्वात आधी काय करतो, तर तो प्रश्न गुगलला विचारतो. सन २०२१ मध्ये भारतीयांनी गुगलला ‘कसं करायचं’ म्हणजेच How to म्हणून विचारलेले टॉप १० प्रश्न (Top 10 Asked Questions) –
१. नागरिकांनी लसीकरणाला गांभीर्याने घेतलं आहे. ही गोष्ट अधोरेखित करणारा टॉपचा सर्च केलेला प्रश्न आहे – “How to register for COVID vaccine” अर्थात कोरोना लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया.
२. दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, लसीकरणाचे सर्टिफिकेट कसे डाउनलोड करायचे – “How to download vaccination certificate?”
३. दुसऱ्या लाटेचा जबरदस्त परिणाम दाखवणारा प्रश्न म्हणजे ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवायची – “How to increase oxygen level?”
४. चौथ्या क्रमांकावर आहे वेगळ्या वाटेवरचा, परंतु महत्वाचा प्रश्न म्हणजे “पॅन – आधार लिंकिंग कसे करायचे?”
५. पाचव्या क्रमांकावरचा, आसू आणि हसू एकाचवेळी दाटून येईल, असा प्रश्न म्हणजे – “घरी ऑक्सिजन कसा बनवायचा?”
६. कोरोनामधून सावरून गुंतवणूकीचा विचार करणारे भारतीय चक्क क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करायचा विचार करतायत, म्हणूनच या यादीत सहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे – “How to buy dogecoin in India?”
७. सातव्या क्रमांकाचा प्रश्न मात्र आश्चर्यचकित करणारा आहे. कारण सातव्या क्रमांकावर भारतीय नागरिकांनी विचारलेला प्रश्न आहे – “बनाना ब्रेड कसा बनवायचा?”
८. यावर्षी शेअर बाजारात एकामागून एक येणाऱ्या आयपीओचा धमाका झाल्यामुळे नवीन गुंतवणूकदारांनी विचारलेला “आयपीओ अलॉटमेंट स्टेटस कसं तपासायचं?” हा प्रश्न आठव्या क्रमांकावर आहे.
९. एलन मस्कच्या ‘बिटकॉइन’ संबंधित ट्विटनंतर अनेकजण बिटकॉइनकडे वळले आणि गुगलवर “बिटकॉइनमध्ये गुंतवणूक कशी करायची”, हा प्रश्न सर्च केला.
१०. “मी असा कसा, असा कसा वेगळा”, म्हणत टॉप टेन सर्चच्या How to विभागामध्ये आलेला शेवटचा प्रश्न आहे, “मार्कांची टक्केवारी कशी काढायची?”
म्हणजे काय? (What is)
कुठल्याही गोष्टीचा अर्थ आपल्याला माहित करून घ्यायचा असेल, तर आपण गुगल करतो. तर पाहूया, भारतीयांनी माहिती करून घेतलेल्या टॉप १० गोष्टी कुठल्या आहेत (Top 10 Asked Questions)?
१. कोरोना खालोखाल भारतामध्ये जास्तीत जास्त सर्च झाली ती ‘ब्लॅक फंगस’ या आजाराची माहिती. त्यामुळे “ब्लॅक फंगस म्हणजे काय?” हा प्रश्न पहिल्या क्रमांकावर आहे.
२. ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं गुगल सर्चचं टेक्निक शिक्षकांना माहिती असेलच, पण गुगलनेही हा विभाग जाहीर करून त्याची पोल खोल केली आहे. कारण या यादीमध्ये सर्च झालेला दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे- “What is the factorial of hundred?”
३. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या सत्तांतराबद्दल बातम्या येत असताना नागरिकांनी विचारलेला “तालिबान काय आहे?” हा प्रश्न या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
४. टॉप सर्च ट्रेंडच्या या विभागात चौथ्या क्रमांकाचा प्रश्न म्हणजे, “अफगाणिस्तानात काय झालं आहे?”
५. कोरोना हा आजार आणि त्याच्या उपचारांबद्दल असणारा संभ्रम आणि जास्तीत जास्त माहिती घ्यायची जिज्ञासा व उत्सुकता यामुळे “रेमिडिसीव्हर म्हणजे काय?” हा प्रश्न पाचव्या क्रमांकावर आहे.
६. सहाव्या क्रमांकावर आहे ऑनलाईन परीक्षांचा परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित करणारा प्रश्न – “४ चे वर्गमूळ किती आहे?”
७. सातव्या क्रमांकावर आहे, कोरोनामधील उपचारात वापरण्यात येणाऱ्या स्टिरॉइड्सबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी विचारलेला प्रश्न – “स्टिरॉइड्स म्हणजे काय?”
८. आठव्या क्रमांकावर असणारा प्रश्न थक्क करणारा आहे. कारण नागरिकांनी विचारलेला आठव्या क्रमांकाचा प्रश्न आहे- “टूलकिट (toolkit) म्हणजे काय?”
हे ही वाचा: 2021 मध्ये भारतीय लोकांनी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केलं ? (Google Searches in India)
९. नेटफ्लिक्सवरच्या मूळ कोरियन भाषेमध्ये बनविण्यात आलेल्या ‘स्क्विड गेम’ या सीरिजला इतकी प्रसिद्धी मिळाली की, नागरिकांनी सर्च केलेला “स्क्विड गेम म्हणजे काय?” हा प्रश्न या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा: मेजर ध्यानचंद (Dhyan Chand) यांच्या नावाचा गंमतीदार किस्सा तुम्हाला माहितेय का? वाचा सविस्तर
१०. दहाव्या क्रमांकावर आहे, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची माहिती घेणारा प्रश्न “डेल्टा प्लस व्हेरिएंट काय आहे?”
तर हे होते, भारतीय नागरिकांनी गुगलला विचारलेले प्रश्न. या व्यतिरिक्त गुगल सर्च ट्रेंड्स २०२१ मध्ये अगदी ओव्हरऑल सर्चेस पासून स्पोर्ट्स इव्हेंट्स पर्यंत सर्व गोष्टी जागतिक आणि प्रत्येक देशानुसार वर्गवारी करून गुगलने जाहीर केल्या आहेत.