Thyroid Problem In Women- थायरॉइड अशी एक ग्रंथी आहे जी महिला आणि पुरुषांमध्ये सुद्धा असते. मानवी शरिरात वाढत्या वयाच्या प्रक्रियेत थायरॉइड फार महत्वाची भुमिका बजावते. यामुळे शरिरातील चयापचयन क्रिया सुद्धा नियंत्रित होते आणि हार्मोन्सच्या विकासासाठी त्याची मदत होते. अशातच पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक थायरॉइडची समस्या उद्भवत असल्याचे दिसून येते. तर जाणून घेऊयात याची लक्षण, यापासून कशी सुटका मिळवाल आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दलच अधिक.
थायरॉइड एक एंडोक्राइन ग्लँन्ड आहे जी फुलपाखराच्या आकारासारखी असते. यामधून थायरॉइडचे हार्मोन्स निघतात जे शरिरात मेटाबॉलिज्मला संतुलित करतात. ते आयोडिनच्या मदतीने शरिरात हार्मोन्स तयार करतात. ते दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे वाढणारा आणि दुसरा कमी होणारा थायरॉइड.
थायरॉइडची लक्षण
-शारिरीक व मानसिक विकास मंदावणे
-रक्तवाहिन्यांमध्ये खेचल्यासारखे वाटणे, पाचन क्रिया मंदावणे
-१२ ते १४ वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये शारिरीक वाढ थांबणे
-शरिराचे वजन वाढणे आणि शरिराला सूज सुद्धा येऊ शकते
-विचार आणि बोलण्याची क्रिया मंदावणे
-शरिराचे तापमान कमी होणे, केस गळणे
-थकवा जाणवणे,
-काही वेळेस मासिक पाळी येण्यास समस्या
-चेहऱ्यावर पुरळ, डाग येणे
-स्मरणशक्ती कमी होणे
-चिडचिडपणा होणे, तणाव
-डोळ्यांची समस्या
महिलांना होतात या आजाराच्या शिकार
पुरुषांच्या तुलनेत महिला थायरॉइडच्या शिकार होतात. तणाव आणि नैराश्य यामागील एक मोठे कारण आहे. याच कारणास्तव त्यांच्यामध्ये काही आजार जसे की, लठ्ठपणा, तणाव, कोलेस्ट्रॉल, ऑस्टियोपोरोसिस, मासिक पाळीसाठी समस्या येणे.
थायरॉइड दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय
कमी असेल तर काय खावे?
कमी कॅलरी असणारे आहार, हिरवी गार पान्यांच्या किंवा रंगीत भाज्या, प्रोटीन युक्त खाद्य पदार्थ किंवा सुका मेवा. या सर्वांमध्ये तुम्ही भेंडी, मेथी, पालक, वांग, टोमॅटो, अक्रोड, सुर्यफुलाच्या बिया, ब्रोकली, द्राक्ष, सफरचंद, बीन्स, कोबी.
काय खाऊ नये?
साखरेचे पदार्थ, सोया युक्त खाद्य पदार्थ, जंक फूड, फॅट असणारे पदार्थ.
दधी-दुधाचे सेवन करा
ज्यांना थायरॉइडमुळे समस्या होते त्यांनी दही, दुधाचे सेवन केले पाहिजे. कारण यामध्ये कॅल्शियम, विटामिन्स असतात. (Thyroid Problem In Women)
अख्ख्या धणांचा वापर
एका ग्लास २ चमचे अख्खे धणे रात्रीच्या वेळी भिजून ठेवत सकाळी ते उकळवा. जेव्हा पाण्याचा चतुर्थांश भाग राहिल तेव्हा ते उपाशी पोटी प्या. काही वेळेस त्याच्या गुळण्या केल्या तरीही ठीक होऊ शकते.
हे देखील वाचा- हिमोफिलिया आजार नक्की काय आहे? जाणून घ्या अधिक
फळ आणि भाज्यांचे सेवन
थायरॉइड झालेल्यांनी फळ आणि भाज्यांचा अधिक वापर करावा. कारण यामध्ये अँन्टीऑक्सिटेंड असतात, जे थायरॉइड वाढण्यास रोखतात. भाज्यांमध्ये टोमॅटो, हिरव्या मिर्च्यांचा समावेश करावा. यामुळे थायरॉइ़डची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते.