Home » राजाची समाधी नव्हे तर हा आहे मृत्यूचा सापळा…

राजाची समाधी नव्हे तर हा आहे मृत्यूचा सापळा…

by Team Gajawaja
0 comment
Qin Shi Huang
Share

चीनचा इतिहास हा ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक दृष्टीनं विकसित झाला आहे.  यलो नदीच्या खोऱ्यात चिनी सभ्यता प्रथम उदयास आली.  किन शी हुआंग (Qin Shi Huang) हा किन राजवंशाचा संस्थापक आणि संघटीत चीनचा पहिला सम्राट होता. कीन शी हुआंग यानं चीनवर अखंड सत्ता उपभोगली. किन शी हुआंग हा चीनचा पहिला सम्राट म्हणून ओळखला जातोच, पण त्यासोबत किन शी हुआंग हा अतिशय क्रूर सम्राट म्हणूनही ओळखला गेला. या पहिल्या सम्राटाच्या क्रूरतेचे किस्से एवढे भयानक आहेत की, या सम्राटाला मारण्याचेही अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले. या सम्राटाची एवढी दहशत होती की, या त्याच्या मृत्यूनंतरही त्याची समाधी हे मोठे रहस्य बनून राहिले आहे.  गेल्या अनेक वर्षापासून चीनच्या पहिल्या सम्राटाच्या समाधीचे कुलूप उघडण्यासाठी चीनमध्ये अनेकवेळा प्रयत्न करण्यात आला.  मात्र प्रत्येकवेळी अशी घटना घडली की, किन शी हुआंगची समाधी उघडण्यासाठी पुढे आलेल्या पुरातत्वशास्त्रज्ञही घाबरुन मागे झाले आहेत. किन शी हुआंगची (Qin Shi Huang) समाधी ही मृत्यूचा सापळा ठरली आहे.  नेमके या समाधीमागचे रहस्य काय आहे, हे जाणून घेऊया.  

चीनचा पहिला सम्राट किन शी हुआंगची (Qin Shi Huang) कबर ही हजारो वर्षांपासून चीनमध्ये उत्सुकतेचा विषय झाली आहे.  साधारण 2000 वर्ष ही कीन शी हुआंगची समाधी बंद आहे.  ही समाधी बंद करतांना त्यात  मोठ्या प्रमाणात पारा टाकण्यात आला होता.  पा-याच्या जणू नद्याच या समाधीमध्ये आहेत.  त्यामुळे जो कोणी ही कीन शी हुआंगची समाधी उघडण्याचा प्रयत्न करेल त्याचा मृत्यूच होईल, अशी भीती आहे.  चिनी इतिहासकार सिमा कियान यांनी सम्राटाच्या मृत्यूनंतर सुमारे एक शतकानंतर एक अहवाल लिहिला.  त्यामध्ये अशाप्रकारचा पारा असल्याचा उल्लेख केला आहे.  

मुळात चीनच्या पहिल्या सम्राटाची ही भव्य समाधी शोधली कसे हेही अनोखे आहे.  1974 मध्ये, चीनच्या शानक्सी प्रांतातील शेतक-यांना कीन शी हुआंगच्या या समाधीचा शोध लागला.  शेतात काम करतांना त्यांना  मातीपासून बनवलेल्या मानवी आकृतीचे तुकडे सापडले.  पहिल्यांदा शेतक-यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले.  पण नंतर खोदकाम करतांना असे मानवी आकृतीचे अनेक तुकडे निघू लागले.  तेव्हा या प्रकणाची चौकशी करण्यात आली.  पुरातत्व विभागाच्या एका पथकानं या जागी उत्खलन करायला सुरुवात केली.  आणि मग मिळालं ते सर्व आश्चर्यचकीत करणारं होतं.  या भागात मोठ्या प्रमाणात टेराकोटा मॉडेल्सने भरलेल्या मानवी मुर्ती सापडल्या.  शिवाय सैनिक, युद्ध घोडे, सैनिक अधिकारी यांच्याही  टेराकोटा मातीच्या आकृत्या या भागात सापडल्या.  हळूहळू या मुर्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडल्या की या सर्व भागाला टेराकोटा आर्मी हे नाव पडले.  

221 ते 210 ईसापूर्व काळात चीनवर राज्य करणाऱ्या किन राजवंशाचा पहिला सम्राट किन शी हुआंग याच्या समाधीचे रक्षण करण्यासाठी ही टेराकोटा आर्मी उभारल्याचे स्पष्ट झाले.   याच टेराकोटा आर्मीचा परिसरात चीनचा पहिला सम्राट कीन शी हुआंगची समाधी आहे. मात्र या समाधीला अशापद्धतीनं बंदिस्त केले आहे की 2000 वर्षानंतरही या समाधीला उघडण्याची हिंमत कोणीही करु शकले नाही. या समाधीला उघडण्यासाठी चीनमधील शास्त्रज्ञांनी अतिशय आधुनिक साधनांचा उपयोग केला आहे.  त्यांनी केलेल्या अभ्यासांमध्ये समाधीभोवती पारा खूप जास्त प्रमाणात आहे.  या समाधीच्या संरचनेतील भेगांमधून विषारी घटक बाहेर पडत असल्याचीही माहितीही पुढे आली आहे.  ही समाधी उघडण्याचा प्रयत्न केला तरी यातील पारा हा बाहेर येऊन त्यातून मोठी हानी होईल अशी भीती शास्त्रज्ञांना आहे.  अभ्यासकांनी यंत्रांच्या सहाय्यानं या समाधीचा आतून फोटो काढण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावेळी या समाधीच्या जवळपास गेलेल्या शास्त्रज्ञांना अनेक त्रास झाले.  त्यांच्या त्वचेवर पुरळ आले.  त्यावरुन या समाधीमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी औषधांचा वापर केल्याचेही स्पष्ट झाले आहे. (Qin Shi Huang) 

=========

हे देखील वाचा : टायटॅनिकपेक्षा पाच पटींनी विशाल असणाऱ्या ‘या’ क्रुजची खासियत माहितेय का?

=========

मुळात चीनचा पहिला सम्राट किन शी हुआंग (Qin Shi Huang) हा त्याच्या हुकुमशाहीसाठी प्रसिद्ध होता.  किन शी हुशांग यांनी त्याची सत्ता संपादन करतांना अनेकांवर अत्याचार केले.  अनेक वर्षापूर्वी केलेल्या या अत्याचारांचा आत्ताही उल्लेख झाला तरी भीती वाटते.  221 बीसी मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी, त्याने लढाई करुन चीनचे विखुरलेले भाग जिंकले आणि चीनला एकत्र केले. किन शी हुआंग चीनचा पहिला सम्राट म्हणून सिंहासनावर बसला.  त्याला विरोध करणा-या विद्वांनांची क्रूरपणे हत्या केली.  याच किन शी हुआंगची समाधी आजही चीनमध्ये उत्सुकतेचा विषय ठरली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.