Home » जगातला तिसरा मोठा रोपवे आता काशी नगरीमध्ये

जगातला तिसरा मोठा रोपवे आता काशी नगरीमध्ये

by Team Gajawaja
0 comment
Ropeway
Share

उत्तरप्रदेशमध्ये अयोध्या आणि काशी या दोन धार्मिक स्थळांचा विकास मोठ्याप्रमाणात होत आहे. या दोन्ही शहरात वेगवेगळ्या विकास योजना चालू असून त्यामुळे या धार्मिक शहरांचा चेहराच बदलला आहे. या सर्वांचा येथील पर्यटनावरही परिणाम झाला असून या धार्मिक स्थळांना आता भेट देण्यासाठी फक्त देशातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत. आता या सुविधात आणखी भर पडणार असून वाराणसीमध्ये देशातील पहिला आणि जगातील तिसरा सर्वाधिक मोठा रोप वे (Ropeway) होणार आहे. यामुळे काशी विश्वनाथचा प्रवास आता होणार सुलभरितीनं होणार आहे. हा रोप वे (Ropeway) तयार झाल्यानंतर 3.8 किमी अंतर कमी होणार आहे. 2025 मध्ये पूर्ण होणा-या या प्रकल्पासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. हा रोप वे (Ropeway) देशातील इतर धार्मिक स्थळांसाठीही आदर्श ठरणार आहे. पुढे याच धर्तीवर अन्य ठिकाणीही रोपवे बांधण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. रोप वेच्या (Ropeway) ट्रॉलीवर श्री काशी विश्वनाथ धामचे मॉडेल कोरण्यात येणार आहे. यासोबतच काशीचा धर्म, कला आणि संस्कृतीची झलक या सार्वजनिक वाहतुकीत पाहायला मिळणार आहे. रोप वे प्रकल्प दोन वर्षात पूर्ण होणार आहे. कँट स्टेशनवरून रोपवेद्वारे श्री काशी विश्वनाथ मंदिर आणि दशाश्वमेध घाटापर्यंत पोहोचणे सोपे होईल. हा प्रकल्प 644.49 कोटी रुपयांचा आहे.

वाराणसी येथे तयार होणा-या या रोप वेमुळे (Ropeway) बाबा विश्वनाथांच्या काशीला आणखी नवी ओळख मिळणार आहे. देशातील पहिला रोपवे येथे होत आहे. या रोप वेद्वारे (Ropeway) वाराणसी जंक्शन रेल्वे स्टेशन ते गौडौलिया, म्हणजेच काशी विश्वनाथ धाम पर्यंतचा भाविकांचा प्रवास अधिक सुलभ आणि लवकर होणार आहे. कँट ते गोदौलिया हा रोपवेद्वारे प्रवास फक्त 15 मिनिटांचा असेल,  त्यामुळे भाविकांची कितीही गर्दी झाली तरी त्यांना काशि विश्वनाथाचे दर्शन लवकर घेता येणार आहे.  

या रोप वेचा (Ropeway) सर्वात मोठा फायदा म्हणजे वाहतूक कोंडीपासून भाविकांची सुटका होणार आहे. कॅन्ट ते गोदौलिया हे अंतर सुमारे 5 किमी आहे. ऑटो किंवा ई-रिक्षाने गौडलियाला जाण्यासाठी 45 मिनिटे लागतात. शहराचा हा परिसर अत्यंत गजबजलेला असल्याने यामध्ये अनेकवेळा भरही पडते. रोपवे तयार झाल्यानंतर हे अंतर 3.8 किमी इतके कमी होणार आहे. या रोप वेचे (Ropeway) काम आता सुरु होत आहे. रोप वे वाहतुकीची रचना तयार करण्यात आली आहे. हा रोपवे अनेक सुविधांनी सुसज्ज असेल. रोप वेमध्ये 220 केबल कार भाविकांच्या सेवेसाठी असतील.  यासो बतच एकाच वेळी 4500 प्रवासी अप आणि डाऊनमधून प्रवास करू शकतील. त्यावर एकूण 5 स्थानके बांधली जाणार आहेत.  ज्यामध्ये सिगरा, साजन सिनेमा, रथयात्रा, गोडौलिया आणि वाराणसी कॅंट यांचा समावेश असेल. मात्र, चर्च क्रॉसरोडवर बांधण्यात आलेल्या स्टेशनवर प्रवाशांना उतरता येणार नाही. पहिल्या टप्प्यात रोपवे वाराणसी कॅन्ट ते गोदौलिया दरम्यान चालवली जाणार आहे. देशी विदेशी पर्यटकांशिवाय स्थानिक लोकांनाही यातून प्रवास करता येणार आहे.

=======

हे देखील वाचा : रामनवमीसाठी अयोध्यानगरी सजली….

=======

हा रोप वे (Ropeway) भारतातील पहिला आणि जगातील तिसरा मोठा रोप वे असणार आहे. त्यामुळेच त्याचे आंतरराष्ट्रीय महत्त्वही वाढणार आहे. रोप वेची  पायाभरणी पायाभरणी पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. 2025 मध्ये तयार होणा-या या रोपवेनं भारतातील तिर्थस्थळांचं बदलत रुप समोर येणार आहे. भारतातील या पहिल्या रोपवेची  ट्रॉली जमिनीपासून 50 मीटर उंचीवर असेल. एका ट्रॉलीमध्ये 10 प्रवासी बसू शकतात. एका तासात 6000 प्रवासी दोन्ही बाजूंनी प्रवास करू शकतील. 2025 पर्यंत या रोप वेचे बांधकाम पूर्ण होईल. त्यानंतर पर्यटक आणि भाविक बाबा विश्वनाथ आणि आई गंगा यांच्या दारात सहज पोहोचू शकतील आणि आशीर्वाद घेऊ शकतील. आता वाराणसीमध्ये येणा-या भक्तांसाठी या रोप वेच्या  मॉडेलचे संपूर्ण चित्र दाखवण्यात येत आहे. नॅशनल हायवे लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड रोपवे करीत आहे. बोलिव्हियाच्या ला पाझ आणि मेक्सिकोनंतर भारत हा जगातील तिसरा देश असेल, जिथे सार्वजनिक वाहतुकीसाठी रोपवेचा वापर केला जाणार आहे. आगामी काळात काशीच्या विकासात हा रोपवे मैलाचा दगड ठरणार आहे.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.